*"खाणे"... जे पोटात कधीच जात नाही.*
मराठी भाषेत खाण्याचे काही विशेष वेगळे प्रकार आहेत.ते प्रत्यक्षात आपल्या पोटापर्यंत कधी पोचतच नाहीत. अशा प्रकारांची आज आपण माहिती घेणार आहोत.*
बऱ्याच वेळा लहानपणी आपण आई-वडील आणि शिक्षकांचा मार खातो!*
पण, आपण शहाणे झालो की शब्दांचा खाल्लेला मार आपल्याला पुरतो.*
*काही व्यक्ती मधून मधून इतरांचा वेळ आणि डोके खातच असतात.*
काही लोक इतरांवर खार खातात.*
तर काही अकारण भाव खात असतात !*
काही विशेष कर्तबगार (!) लोक तर पैसा पण खाऊ शकतात !*
आणि त्यांचे खाणे उघडकीस आले तर लोक त्यांना, "काय माती खाल्लीस" असे म्हणतात.*
आणि शेण खाणे हा एक वेगळाच प्रकार आहे, त्याबाबत काय लिहावे?*
शिव्या तर आपण रोजच कुणाच्या ना कुणाच्या खात असतो.*
पण त्यामुळे आपला जो अपमान होतो तो मात्र खाता येत नाही. तो आणि आलेला राग दोन्ही गिळावे लागतात.*
कधी कधी मात्र उलटे होते. जी व्यक्ती अपमान करते, तिलाच तिचे शब्द गिळावे लागतात.*
काही लोक तर राग आला की दात ओठ पण खातात.*
या खाण्याच्या प्रकारात काही अभक्ष्य भक्षणाचे प्रकार पण आहेत. उदाहरणार्थ जीव खाणे, भेजा खाणे इ.*
बरीच माणसं नको तिथे कच खातात.
काही लोकांच्या मृत्यूचं कारण पण खाणंच असतं, पण त्याला हाय खाणं म्हणतात.*
काही लोक बोलता बोलता शब्द खातात..*तर काही लोक हवा किंवा ऊन खायला बाहेर पडतात.*
विवाहीत पुरुष नियमितपणे खातो, ती म्हणजे आपल्या बायकोची बोलणी...!*
ही मराठी समजावून घेणे म्हणजे बुद्धीला एक प्रकारचे खाद्यच आहे, ज्यामुळे मराठीची लज्जत वाढते !