मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

रविवार, 8 जुलाई 2018

A Beautiful MARATHI Poem !!

*शेवटी तर आपणच दोघं असु*

*जरी भांडलो, रागाराग केला,*
*एकमेकांवर तुटून पडलो,*
*एकमेकांवर दादागिरी करण्यासाठी,*
*शेवटी तर आपणच दोघं असु.*

*जे बोलायचं ते बोल,*
*जे करायचं ते कर,*
*एकमेकांचे चष्मे शोधण्यासाठी,*
*शेवटी तर आपणच दोघं असु.*

*मी रूसलो तर तु मला मनव,*
*तु रुसलीस तर मी तुला मनवीन,*
*एकमेकांचे लाड करण्यासाठी,*
*शेवटी तर आपणच दोघं असु.*

*जेव्हा नजर कमी होईल,*
*स्मरणशक्ती पण कमी होईल,*
*तेव्हा एकमेकांना,*
*एकमेकांमध्ये शोधण्यासाठी,*
*शेवटी तर आपणच दोघं असु.*

*गुडघेदुखी जेव्हा वाढेल,*
*कुठे बाहेर फिरणं ही थांबेल,*
*तेव्हा एकमेकांच्या,*
*पायाची नख कापण्यासाठी,*
*शेवटी तर आपणच दोघं असु.*

*"माझे रिपोर्ट्स अगदी नाॅर्मल आहेत,*
*I am Alright",*
*असं बोलुन एकमेकांना छेडण्यासाठी,*
*शेवटी तर आपणच दोघं असु.*

*जेव्हा आपली साथ सुटेल,*
*अंतिम निरोपाची वेळ येईल,*
*तेव्हा एकमेकांना माफ करण्यासाठी,*
*शेवटी तर आपणच दोघं असु,*

*शेवटी तर फक्त आपणच दोघं असु,                          


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik upanyas Bhoot-Adbhut!(28)

Vishakha got scared she covered her face eyes and ears by the quilt, but the sound of breathing didn’t stop.She didn’t want to disturb her p...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!