मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

गुरुवार, 30 अगस्त 2018

Dharm & Darshan !! MARATHI { GURUDEV DUTT }

 श्री गुरुदेव दत्त

देव वर येणे व खाली जाणे...... महो भाग्यम्.....

श्री नृसिंहसरस्वति दत्त देवस्थान औदुंबर येथे दि.२३/८/१८रोजी रात्रौ १ वाजता देव मंदिरातून वरती नेण्याचा सीहळा संपन्न झाला. हा तसेच दि.२४/८/१८ रोजी सायंकाळी देव परत मंदिरात (खाली)नेण्याचा सोहळा संपन्न झाला. देव वर येणे व खाली जाणे म्हणजे महाराजांच्या पुजार्यांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व  सोहळा आहे.
 
देव वर येणे व खाली जाणे म्हणजे काय ?

औंदुंबर दत्तमंदीर हे कृष्णेच्या प्रवाहा सन्निध आहे.पावसाळ्यात कृष्णेचे पाणी पात्र सोडून वाहू लागते. जस जसे पाणी वाढू लागते तसे मंदीर परिसरात एक अनोखे वातावरण तयार होते.मग लोकांचे अंदाज बांधणे चालू होते.पाणी जसे पात्र सोडून पहिल्यांदा तबकावर येते त्यावेळिचे दृश्य नयनरम्य असते.संथ वाहते कृष्णामाई या उक्तीच्या अगदी विरुध्द कृष्णा अगदी रौद्ररूप धारण करते. तबकावरुन पाणि दर्शन मंडपात प्रवेश करते.नंत पाणी पूर्ण मंदीराला प्रदक्षिणा(वेढा) घालते.नंतर पाणी जस जसे वाढते तसे ते मंराच्या जाळित प्रवेश करते .मग पुजरी लोक गाभार्याच्या उंबरठ्यावर चिखल व विटांचा बांध घालून ठेवतात जेणेकरुन पाणि लगेच गर्भगृहात प्रवेश करु नये.बंधारा अर्धा पाण्याखाली गेल्यानंर सर्व पुजारि मंडळी मंदीरात ओलेत्याने जाउन तो बांध काढतात व सर्व परिवार देवता डोक्यावर घेतात.बांध काढल्याने मुख्य गर्भगृहात पाणीक् क्षणात प्रवेश करते जणू काहि कृष्णेला महाराजांच्या चरणस्पर्शाची ओढच लागलेली असते.गर्भ गृहात पाण्याने प्रवेश केल्यावर पाणी श्रींच्या पादुकांना स्नान घालते .तसेच गर्भगृहभरून पाणीपुन्हा बाहेर येते यावेळि सर्व पुजारी व उपस्थीत मंडळि पर्व स्नान करतात.नंतर परिवार देवता पुजारि डोक्यावर घेउन स्नान करतात व मंदीराला प्रदक्षिणा घालून उत्तरेच्या घाटावरुन देव वर आणतात.नंतर जोपर्यंत पाणी गाभार्याचा उंबरठा सोडून खाली येत नाहि तोपर्यंत पुजा अर्चा परिवार देवतांवर केली जाते व श्री पादुकांना पाण्यातुनच सर्व उपचार दिले जातात.या दिवसात परिवार देवता मंदीराच्या वरति असलेल्या देवघरात असतात.

तर पाणी जसे उतरायला लागले की परत देव खालि नेण्याची तयारी सुरु होते. पाणी उंबरठ्याच्या खाली आल्यावर देव वाजत गाजत खाली नेले जातात. श्रींच्या पादुकेवरील गाळ काढून पादुकांवर षोडषोपचार पुजा केलि जाते.व औषधी काढा पादुकेवर घातला जातो . नंतर उष्णोदकाने स्नान घालू पादुकांना उष्णता लागावी याकरिता मिरपुड व सुंठपुड लावली जाते नंतर धुपारती कैली जाते.पाणी खाली गेल्यावर रात्री अपरात्री सुध्दा कोणत्याही जलचर प्राण्याची भीती न बाळगता पुजारी लोक पाण्यात उतरतात.आणि काढा घालतात.एकभोळि समजुत कि महाराजांना थंडी वाजत आसेल.हे दोन्हि सोहळे रात्रि अपरात्री कधीहि होऊ शकतात .अशी परिस्थीति असेल तर पुजारी रात्रभर डोळ्यात तेल घालून जागै असतात. अशा या अलौकिक सोहळ्याला अनन्य साधारण महत्व आहे.

 श्री गुरुदेव दत्त

|| नमो सदा श्रीगुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ||

|| दत्त दिगंबर दैवत माझे रूधयी माझ्या नित्य स्मरावे ||

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

|| सिद्धांत अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

श्री गुरुदेव दत्त 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik upanyas Bhoot-Adbhut!(29)

  It was the time when , girls schools and boys schools were separate and and due to teenage attraction they used to get attracted towards e...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!