एका गावात धरण फुटिमूळे महापुर येणार असतो. गावप्रमुख गावातील प्रत्येकाला गावाशेजारच्या डोंगरावर म्हणजे उंचावर जाण्यास सांगत असतो.
गावातील लोक त्याप्रमाणे वागतात.
शेवटी गावप्रमुखाच्या व त्याच्या काही साथीदारांच्या लक्षात येते की सर्व लोक डोंगरावर गेलेत. फक्त मंदिराचा पुजारी मंदिरात आहे. गावप्रमुख लगेच एका साथीदाराला मंदिरात जाऊन पुजार्याला आणायला पाठवतो.
तो पूजार्याला सांगतो की, महाराज आता गुढग्यापर्यंत पाणी गावात आलेय. मंदिर सोडा. माझ्याबरोबर चला. गावप्रमुख आणि काही मोजके लोक वेशीवर आपली वाट पहात आहेत. मी देवाची निरपेक्ष सेवा केलेली आहे. माझा देव मला वाचविल असे बोलून त्याला वेशीवर पाठवतो.
वेशीवर येऊन तो घडलेला प्रकार गावप्रमुखाला सांगतो. गावप्रमुख दूसर्या साथीदाराला मंदिरात पाठवतो.
दूसरा साथीदारही हात जोडून पुजार्याला विनवनी करतो. "महाराज पाणी कमरेच्या वर वाढलेय वेळ कमी आहे, चला" तेव्हा तो पूजारी पहील्या सारखेच उत्तर त्याला देतो. आणि त्याला वेशीवर पाठवून देतो. असे अनेकजण पाठवले तरी पूजारी त्याचा हेका सोडत नाही.
शेवटी गावप्रमुख इतर साथीदारांना डोंगरावर पाठवून स्वत: मंदिरात जातो. पूजार्याचे पाय धरून सांगतो की, महाराज गावात मी एकटाच मागे थांबलो आहे. पाणी डोक्याच्या वर वाढलेय. मी पट्टीचा पोहणारा आहे. माझ्याबरोबर चला. पूजारी त्यालाही तेच उत्तर देतो.
नाईलाजाने गावप्रमुख एकटाच त्या महापुरातुन बाहेर येऊन सुरक्षितपणे डोंगरावर जातो.
इकडे पाणी जास्त वाढून मंदिराच्या गाभाऱ्यात शिरते. आणखी वाढत राहाते. पुजारी पाण्यात बुडून मरतो. आणि त्याचा आत्मा वर आकाशात स्वर्ग नरकाच्या प्रवेशद्वारावर येतो. तीथे तो देवाला जाब विचारतो. तूझी एवढी सेवा केली!! काही अपेक्षा ठेवली नाही. तू मला वाचवायला का आला नाही?
तेव्हा देव बोलतो, अरे बाबा! यात माझी काहीच चूक नाही. मी खूप वेळा तूला वाचवायला आलो होतो. शेवटी तुझ्या गावचा प्रमुख होऊन मी आलो होतो. पण तूझा हेकेखोरपणा, हट्टीपणा तूला नडला. तू मला ओळखलं नाहीस. आणि बुडून मेलास. हे तूझ्याच कर्माचेच फळ आहे. असे बोलून देवानं त्या पुजार्याला नरकात पाठवलं.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें