मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

रविवार, 10 दिसंबर 2023

Laughter !! ( Marathi){30}

 


*गीता आपल्या कार नी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती.*


*मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा....*


*मग काय !  गाडी सुसाट !!*




*आणि -*


*अचानक वळणावर एक गाढव आडवं आलं.*


*गीतानी कर्ररररकचू्.न ब्रेक दाबला.*


*वाटलं आता जाऊन धडकतेकी काय ..!!*


*गीतानी डोळे घट्ट मिटून घेतले..*


*आणि....*


*हुश्श.....!!*

:

:

:

:

:....

*गाडी गाढवाच्या अगदी जवळ जाऊन, त्याच्या पुढचं थांबली. अपघात होता होता गीता  वाचली व अशाप्रकारे....*


*"गाढवा पुढे वाचली गीता....."*


*ही म्हण प्रसिद्ध झाली....*


    

           


*नंतर घाबरलेली गीता घरी आली आणि घडलेली सारी कथा आपला नवरा हरीला सांगितली....*


*तिने नवर्‍याकडे हट्टच धरला की ज्या गाढवामुळे माझे प्राण वाचले त्याला पाहुणचारासाठी घरी घेऊनच या.*


*मग बिचारा हरी गाढवाकडे गेला.*


*पण गाढवही हट्टी.  ते काही तयार होईना....*


     *शेवटी...*


*अडलेल्या हरीने गाढवाचे पाय धरले.....*


       *आणि*


*अडला हरी अन् गाढवाचे पाय धरी.....*


*ही म्हण तेव्हापासून प्रसिद्ध झाली.*


         


*शेवटी कसाबसा हरी गाढवाला घरी घेऊन आला....*


*उन्हातून आल्यामुळे गीताने गाढवास बसायला खुर्ची दिली आणि पाणी व गुळाचा तुकडा खावयास दिला....*


*गाढव पाणी गटागटा प्यायला आणि मग गूळ खावयास लागला.*


*पण अचानक काय झाले कळलेच नाही.  गाढव पाण्याच्या गुळण्या करू लागले....* 


*हरीला आणि गीताला हे कोडे आजपर्यंत सुटले....नाही.....*


..

..

*"गाढवाला गुळाची चव काय..?"* 


*ही म्हण यामुळे सगळीकडे व्हायरल झाली.....*नंतर उपास असल्यामुळे थकलेली गीता खाटल्यावर जाऊन झोपली. हरीने तिच्यासाठी वरीचा भात  बनवला.  डायनिंग टेबलवर वाटी भर वरीचा भात  ठेवून त्याने गीताला हाक मारली. गीता काही येईना. तिने हरीला वरीचा भात खाटल्यावर आणून द्यायला सांगितले. तेव्हापासून, *असेल माझा हरी, तर देईल खाटल्या वरी* ही म्हण प्रसिद्ध झाली!



  *मंडळी हसत रहा आनंदी रहा....*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik upanyas Bhoot-Adbhut!(23)

Vishakha was at home. She had a pet parrot in cage. She got it One year ago from a neighbourhood man because one evening it came flying insi...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!