मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

रविवार, 10 मार्च 2024

Dharm & Darshan !! Marathi Katha !!

 *दोन हिरे....

एका व्यापाऱ्याला बाजारात एक छानसा उंट विकत घ्यायचा होता.*

उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरवण्यासाठी उंट विक्रेता व व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली . व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये करार झाला आणि शेवटी त्या व्यापाऱ्याने उंट विकत घेऊन घरी नेला*

घरी पोहोचल्यावर व्यापाऱ्याने आपल्या नोकराला उंटाचे खोगीर काढण्यासाठी बोलावले...*

खोगिराच्या खाली सेवकास एक लहान मखमली पिशवी सापडली ज्यात मौल्यवान हिरे व रत्ने होती.*

नोकर ओरडला, "मालक , तुम्ही एक उंट विकत घेतला, परंतु त्या बरोबर काय विनामूल्य आले आहे. ते पहा"*

व्यापारी देखील आश्चर्यचकित झाला, त्याने आपल्या नोकराच्या हातात हिरे पाहिले. ते सूर्यप्रकाशामध्ये अधिकच चमकत होते.*

व्यापारी म्हणाला:*

"मी उंट खरेदी केला आहे, हिरे नव्हे, मी ते त्वरित परत करतो"*

नोकर मनात विचार करत होता "माझा मालक किती मूर्ख आहे"*

तो म्हणाला: "मालक काय हे? हे कुणालाही कळणार नाही!" तथापि, व्यापाऱ्याने त्याचे ऐकले नाही आणि ताबडतोब बाजारपेठेत जाऊन मखमलीची पिशवी त्या विक्रेत्याला परत केली.*

उंट विक्रेता खूप खूष झाला, म्हणाला, "मी विसरलो होतो की मी माझे मौल्यवान हिरे खोगिराखाली लपवले होते*

आता आपण बक्षीस म्हणून कोणताही एक हिरा घ्या*

व्यापारी म्हणाला,*

"मी उंटासाठी योग्य किंमत दिली आहे म्हणून मला कोणत्याही भेटवस्तू आणि बक्षिसाची आवश्यकता नाही"*

जितका व्यापारी नकार देत होता, तितकाच उंट विकणारा आग्रह धरत होता*

शेवटी, व्यापारी हसला आणि म्हणाला, "खरं तर मी थैली परत देण्याचा निर्णय घेतला तेव्हाच मी दोन मौल्यवान हिरे आधीच माझ्याकडे ठेवले होते."*

हे ऐकल्यानंतर नंतर उंट विक्रेता खूप चिडला आणि त्याने थैली रिकामी करून त्यातील हिरे मोजले*

पण जेव्हा त्याला लक्षात आले की त्याचे सर्व हिरे जसेच्या तसे आहेत अन एकही हिरा कमी झालेला नाही तेव्हा तो म्हणाला, “हे माझे सर्व हिरे आहेत, तर मग तुम्ही ठेवलेले दोन सर्वात मौल्यवान हिरे कोणते?"*

"प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान."*

विक्रेता निःशब्द झाला.*

यापैकी दोन हिरे आपल्याकडे आहेत की नाही हे शोधण्यासाठी आपण स्वतःमध्ये पहावे.*

ज्याच्याकडे हे दोन हिरे आहेत, 'स्वाभिमान अन् प्रामाणिकपणा' तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे...*

आपले हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, तेथून महाभारताची सुरुवात होते*

आणि...*

जेव्हा आपले हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तेथून रामायणाची सुरुवात होते...*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Amazing !!

 The "Titanic Cat" who foresaw the sinking and retrieved her babies before the ship sailed.  . Jenny the cat was the Titanic's...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!