मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

शनिवार, 13 अप्रैल 2024

Marathi Story !

 *आईचा खिसा*


मला लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा की बाबांना कसा खिसा असतो, त्यात ते पेन , सुट्टी नाणी , कधी कधी बंद्या नोटा ठेवतात. तसा आईला खिसा का नसतो?


शाळेची फी भरताना बाबा कसे ऐटीत खिश्यातून काढून फी साठी पैसे देतात,  किंवा प्रगतीपुस्तकावर खिश्यातलं पेन काढून ऐटीत सही करतात. तसा आई जवळ खिसा का नसतो?आणि जर असलाच खिसा, तर नेमका कुठे असतो?


आईला विचारलं की ती फक्त हसायची. तुला भूक लागली असेल ना... असं म्हणून पदर खोचून शिऱ्यासाठी रवा भाजायला घ्यायची. त्या रवा भाजण्याच्या वासावर भुकेशिवाय दुसरं काही सुचत नसे. 


एकदा खेळताना पडल्यावर पायाची जखम पुसायला कापसाचा बोळा मिळाला नाही म्हणून आईने चक्क कॉटनच्या नव्या साडीच्या टोकाने  माझी जखम पुसून काढली आणि मग कपाटातील कैलास जीवन काढून त्यातलं लोण्याच्या गोळ्यासारखं मऊ मलम माझ्या जखमेवर लावलं. मला रात्री लवकर झोप यायची तेव्हा ती घरातली कामं लगबगीने आवरून तिच्या जुन्या साडीचा काठ घडी करून,  मला दिव्याच्या उजेडाने त्रास होऊ नये म्हणून माझ्या डोळ्यावर मांडायची आणि मला त्या साडीसारखीच अगदी तलम निद्रा यायची.


कुठे बाहेर जाताना बाबा खिशातून पैसे काढून रेल्वेची तिकीटं काढायचे आणि आई मात्र खिडकीतून झूं झूं करत येणारा वारा माझ्या कानाला झोंबतो  म्हणून माझ्या कानाकेसांभोवती आपला पदर गुंडाळून घ्यायची. तेव्हाही माझं लक्ष खिडकीतल्या बाहेरच्या दृष्याबरोबरच बाबांच्या खिश्याकडे असायचं. मोठा झाल्यावर मीसुद्धा बाबांसारखा खिसा शिवून घेऊन त्यात वेगवेगळ्या वस्तू ठेवणार हे मी ठरवून ठेवलं होतं.


 नेमकी तेव्हाच आई पदराच्या टोकाला गुंडाळून ठेवलेली गोळी (मला तहान लागली असताना) हळूच माझ्या जिभेवर ठेवायची. तृषा पूर्ण शांत व्हायची. कधी खेळताना सर्व मुलं बॉल आणण्यासाठी वर्गणी काढत.अशा           वेळी आई तिच्या पदरात बांधलेला रुपया दोन रुपया काढून देत असे आणि वर अजून एखादा रुपया देऊन "उन्हं फार आहेत. पेपरमिंट खा चघळायला"  म्हणून सांगत असे. 


मित्र म्हणत तुझी आई खूप छान आहे रे, तेव्हा माझी कॉलर टाईट होत असे. आईकडे खिसा नसतानाही बाबांपेक्षा जास्त गोष्टी तिच्याकडे कशा हा प्रश्न मला थोडा मोठा होत असताना पडू लागला. 


आणि एक दिवस माझं मलाच उत्तर सापडून गेलं. आईकडे खिसा असतो, पण त्या खिशाला चौकट नसते. तो खिसा म्हणजे आईचा पदर असतो, जो कायम मुलांसाठी सुखं बांधून ठेवत असतो. 


*तो आईचा, आपल्या मुलांसाठी कधीही न रिक्त होणारा खिसा असतो.* 


 *आईचा खिसा.*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller (23) Apradh!!

  You’re completed all the students came back and college routine started regularly.Rana and gang was suspicious about both love birds but c...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!