मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

शनिवार, 24 अगस्त 2024

Dharm & Darshan !! Rahu !! ( Marathi )




*राहू बाबत अत्यंत आगळा वेगळा विशेष लेख*


*सदस्य हो राहू ग्रह वरती आपली जी लेखमाला चालू आहे त्यामध्ये आज राहूची काही अधिक माहिती बघूया. भारतीय ज्योतिष शास्त्र मध्ये राहू आणि केतूला इतर ग्रहांसारखेच महत्त्व दिलेलं आहे खरे तर हे छेदनबिंदू आहेत राहु ग्रह ला इंग्रजीत नॉर्थ नोडव केतू ग्रह ला साउथ नोड म्हणतात. म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्या परिक्रमा मार्गात एकमेकाला छेद जातो तिथे हे दोन्ही ग्रह स्थीत आहेत. आपणा सर्वांना माहित आहेच की दोन शक्तींच्या टक्करी मधून तिसरी जास्त प्रबळ शक्ती उत्पन्न होत असते तशीच काहीशी स्थिती राहू केतू या ग्रहांची झालेली आहे. काही अत्यंत प्राचीन ज्योतिष शास्त्री यांनी केवळ सात ग्रह वर आधारित  फलदेश करत असताना त्यांना लक्षात आलं की ही व्यक्तींच्या जीवनात अकस्मात काही विचित्र घटना घडत आहेत आणि त्या या सात ग्रह ंच्या मर्यादेच्या बाहेर आहेत त्यावेळी संशोधन अंती राहू केतू यांना छायाबिंदू म्हणून छायाग्रह म्हणून मान्यता देऊन त्यांच्या फलादेशांवरती अधिक संशोधन करून नवग्रहांची कल्पना पुढे आली. राहु ग्रह खूपच गुढ रहस्यमय ग्रह आहे. त्याचे वर्णन धुरासारखे केले गेले आहे तेही निळा रंगाचा धूर म्हणजे राहू राहू हा वनचर सांगितला आहे राहूची वात प्रकृती सांगितली आहे. म्हणजे राहू मध्ये वात प्रधानता आहे. कदाचित यामुळेच शनी सारखा राहू ही म्हण किंवा हा समज दृढ झाला असावा. मेडिकल एस्ट्रोलॉजी म्हणून एक ज्योतिषशास्त्राची शाखा आहे त्यात ग्रहांवरून त्या ग्रहांच्या स्थानांवरून जातक ला होणाऱ्या रोगराईचा अंदाज बांधला जातो. मेडिकल स्ट्रॉंग मध्ये माझा काही विशेष अभ्यास नाही पण जेवढे वाचले आहे किंवा जे माहित आहे त्यावरून सांगू शकतो की राहू ला शरीरात पोट आणि पिंढऱ्यांमध्ये स्थान दिले आहे आणि राहूचे रोग म्हणले तर अनिद्रा, उदररोग, मस्तिष्क रोग, वेड लागणे असे सांगितले जाते. राहू चा सूर्याची अनिष्ट संबंध येत असेल तर हृदयरोग होण्याची शक्यता खूप जास्त असते. काहीजणांनी राहू हा रेस्पिरेटरी सिस्टिम म्हणजे श्वसन तंत्र वरती पण प्रभाव टाकतो असे सांगितले आहे तज्ञांनी याबाबतीत अधिक माहिती द्यावी पत्रिकेत राहू तीन कार्य करत असतो राहू हा  ज्या ग्रहांसोबत बसतो त्या ग्रहाची पूर्ण शक्ती संपवून टाकतो. राहू ज्या भाव मध्ये असेल त्या भाव मध्ये अत्याधिक संघर्ष केल्यानंतर त्या भावचे उत्तम फळ देत असतो. इतर सर्व ग्रह सूर्य बरोबर अस्त होतात पण राहू मात्र सूर्य लाच ग्रासून टाकतो. दुसरे काम राहू हे करतो की त्या ग्रहाची पूर्ण शक्ती स्वतःकडे घेतो. राहू पूर्णपणे वाईट आहे का तर असे अजिबात नाही ज्यावेळी जातकाची कर्म चांगली असतात शुभ असतात त्यावेळी त्या शुभ कामाचे फळ म्हणून राहूच अपरिमित धनसंपत्ती देतो. याबाबतीत मी एक अगदी जिवंत आणि पटणारे उदाहरण देतो अंबानी परिवार आजच्या घडीला भारतातील अत्यंत प्रसिद्ध आणि श्रीमंत तसेच भारतातीलच नव्हे तर प्रदेशातील ही मोठ्या मोठ्या राजनेत्या, अभिनेत्या आणि सर्वच प्रसिद्ध मंडळींवर प्रभाव ठेवून असणारे कुटुंब आहे. राहू ग्रहनेच त्यांना एवढी अपार धनसंपत्ती आणि प्रभाव दिला आहे असे मला ठाम वाटते. हे का वाटते ह्याचे कारण सांगतो प्रत्येक ग्रह हा कुठल्या न कुठल्या तरी पशु  संदर्भात जोडलेला  आहे. जसे सूर्यग्रह हा घोडा या प्राण्याची संबंधित आहे, चंद्रग्रह हरीन सोबत संबंधित आहे, मंगळ ग्रह माकडाची संबंधित आहे, बुध ग्रह पोपटा सोबत संबंधित आहे, गुरु ग्रह गायींशी संबंधित आहे, शुक्र हा ससा या प्राण्याची संबंधित आहे, शनि हा कावळा आणि रेडा याच्याशी संबंधित आहे, तसेच राहू ग्रह हा हत्ती या प्राणी संबंधित आहे आणि केतू हा कुत्र्याशी संबंधित आहे. जगदंबे ने कृपा केली तर मी नक्की प्राणी आणि नवग्रह याबाबतीत एक स्वतंत्र लेख लिहीन पण आत्ताच आपल्या राहू या विषयावरती आपण ठाम राहू आणि अंबानी कुटुंब आणि राहू आणि हत्ती यांचा कसा आणि का संबंध आहे? अनंत अंबानी चेच लग्न एवढ्या थाटामाटाने आणि एवढे विश्व प्रसिद्ध होणे सारखे का झाले असावे? अंबानी परिवार मध्ये आधी पण सौ नीता मुकेश अंबानी यांच्या मुलाची आणि मुलीची लग्न झाली ती मात्र एवढी गाजली नाही त्यावेळी पण त्यांनी मोठ थाटमाट केलं होतं पण या दोन लग्न पेक्षा अनंत अंबानी याचा लग्नात कित्येक पट मोठा खर्च आणि विश्व प्रसिद्धी का झाली असेल? याबाबतीत मी अधिक खुलासा इथेच करतो. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या प्री-वेडिंग मध्ये एक त्यांचे प्री-वेडिंग जामनगर येथे झाले आणि त्यावेळी बातमी वाचायला मिळाली की तिथे त्यांनी हजारो हेक्टर जंगल तयार केले आहे आणि त्या जंगलात विशेष करून हत्ती करता खूप चांगली सोय त्यांनी केली आहे. अनंत अंबानी यांनी तिथे खूप सेवा दिली आहे. हत्तींना अत्यंत उत्तम प्रतीचे खाद्य अनंत अंबानी आणि परिवार देत आहे हे वाचले आणि त्याचवेळी माझ्या लक्षात आले की अरे यांच्या प्रचंड श्रीमंतीचे यांच्या प्रचंड प्रभावाचे काय कारण असावे. सदस्य हो विचार करा अगदी प्राचीन काळापासून राजे लोक कशावरती बसणे पसंत करत होते तर हत्ती वरतीच बसणे पसंत करत होते. देवांचा राजा इंद्र यांचे वाहन काय आहे तर ऐरावत हत्तीच आहे. अंबानी परिवार अत्यंत मोठ्या प्रमाणावर हत्तीची सेवा करत आहे. अजून एक लक्षात घ्या अनंत अंबानी यांना दम्याचा फार मोठा विकार आहे. मी वरती लिहिले आहे की राहू हा रेस्पिरेटरी म्हणजे श्वसन तंत्र वरती पण फार प्रभाव टाकतो. त्यामुळे त्यांच्या आजारपणाच्या दृष्टीने त्यांनी इतर कोणतीही जनावरे अगदी गाईसारखा अत्यंत पवित्र पशुवर् पण त्यांनी इतका खर्च केला नाही. अर्थात केवळ त्यांनी हत्तीवर खर्च केला म्हणून ते इतके श्रीमंत आहेत असे नाही तर इतरही त्यांचे दानधर्म पूजापाठ, आणि त्याच् पेक्षा खूप महत्त्वाचे म्हणजे या सर्वांसोबत त्यांचे अक्कल हुशारीने चालवलेले नित्य व्यवहार त्यांची मेहनत ही  आहेच पण ग्रहांचा आणि त्या संबंधित सर्वच वस्तू मग ते पशु असो, रत्न असो ,दान करायचा वस्तू असो, रंग असो त या सर्वांचा प्रभाव पडत असतो. प्रत्येक ग्रह हा कुठल्या ना कुठल्या पशु संदर्भात जोडला आहे राहू हा मांजर कुलाचे प्राणी मुख्यता मांजर आणि हत्ती या दोन पासून सोबत जोडला गेला आहे. राहू वाईट असेल आणि जर तुम्ही मांजर पाळली असेल तर अजून राहू त्रास देईल. मांजर अशी पण काली जादू ची प्रतीक आहे. आपल्याकडेच नाही तर अगदी पाश्चिमात देशात पण सिनेमात पण मांजर ही सैतानाची वाहक दाखवली आहे. राहू चा संबंध पण काळी जादू सोबत आहेराहू चा त्रास मिटवायचा असेल तर हत्तीची सेवा ही खूप आवश्यक असते. तुम्हाला अजून एक हत्ती आणि राहू आणि राजसत्ता याचे  संबंध कसे आहेत हे अगदी प्रॅक्टिकल उदाहरण देतो. दक्षिण भारतात अत्यंत गाजलेल्या सिने कलाकार अभिनेत्री जय ललिता यांनी केरळ मधील गुरु वायुर मंदिरात हत्ती दान दिला होता. आणि त्यानंतर काही काळातच त्यांना परत मुख्यमंत्री पद मिळाले संशोधक जिज्ञास व्यक्तींनी गुरुवायुर मंदिरात जाऊन खातर जमा करावी किंवा त्या वेळचे न्यूज पेपर तपासावेत. राहू हा ग्रह आणि राजनीति याची अत्यंत घनिष्ठ सांगड आहे. गाजलेले सर्व राजनेते हे राहू ग्रह च्या प्रभावामुळे गाजले याची मी एक मोठी यादीच देऊ शकतो. असो दान संदर्भात एक गोष्ट इथे अगदी आवर्जून सांगतो ग्रह तुमचा शुभ कारक असेल तर त्या ग्रहाचे दान देऊ नये उलट त्या वस्तू एका विशिष्ट प्रमाणात ग्रहण कराव्यात धारण कराव्यात आणि तो ग्रह जर तुम्हाला अशुभ  असेल तर त्या ग्रहाची दाने त्या ग्रहाच्या वस्तू अधिकात अधिक प्रमाणात दान कराव्यात म्हणजे त्या ग्रहाची अशुभता तुमच्या पासून दूर जात राहते. राहू विषयक थोडीशी अधिक माहिती आपण उद्या पण बघूया आणि मग पुढे त्याचे स्थान परत्वे फल पण बघूया.*



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller ( 224) Apradh !!

Nirmal received the phone call from Sanjay Sharma that they were going  to Australia because of some urgency. Nirmal couldn’t speak and he f...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!