*थोडं हसुया !!
*काही अतिसुंदर (?) विचार*
1: अंगात दम असणं चांगलं,
पण तो *सारखा लागणं* अत्यंत वाईट
2: तारुण्यात न घसरलेला पाय उतारवयात नक्की घसरतो...
*बाथरूममध्ये......!*
3: कुणी उशिरापर्यंत झोपलेलं मी बघूच शकत नाही,
म्हणून *मीच रोज उशिरा* उठतो....
4: भांडण करताना ते विकोपाला जाणार नसेल तर ते करण्यात *काहीच अर्थ* नाही....
5: मराठी माणसांनी मराठीतूनच *"कॉन्व्हरसेशन"* केले पाहिजे....
6: स्वर्गात जायचे असेल तर आईचे पाय दाबून झोपत जा.. मग ती आई तुमची असो वा *तुमच्या पोरांची....*
7: काही लोक खरेदीला गेल्यावर कधीच डिस्काउंट मागत नाहीत. फक्त दुकानातून *बाहेर जायची ॲक्टिंग* करतात.
8: रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. *नाक मात्र नक्की मोकळं* होत..
9: तुम्ही कितीही महागातली सुपरफास्ट बाईक मुलांना घेऊन दिली तरी.. ती *ॲक्टिवाच्या मागेच* चालणार..
10: कुंडली खरं तर सासू अन् सुनेची जुळली पाहिजे. मुलगा बिचारा कुणाशीही *Adjust* करून घेतो..
11: लग्नात मुलीचे मामा अन् नवरी सोबत असलेली करवली.. या दोघांच्या *attitude ची बरोबरी* कोणीच करू शकत नाही..
12: जिथे मारामारी करणं शक्य नाही.. तिथे *टोमणे* तरी मारूनच यायचं.. सोडायचं नाही अजिबात..
13: पोट आणि Ego कमी असेल तर.. माणूस कोणालाही *मिठी मारू* शकतो..
14: गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.. *"तिकडे सरक"* हा शब्द कसा काय ऐकू जातो..?
15: जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखाद्या दिवशी *फरशी पुसून बघा..*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें