मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

शुक्रवार, 15 मई 2026

Laughter ( Marathi)

 

विरंगुळा:

1) सकाळी सकाळी बायको चा हसरा चेहरा बघा. दिवस मस्त जातो.

* पु ल देशपांडे 

** मग बायको कुणाची पण असो 

2) डॉक्टर :- हा बोला,  कुठं दुखतंय..? ....

पेशंट : फी कमीकरणार असाल तर सांगतो. ...  नाहीतर शोधा....

3) पुण्यात हल्ली खूप चहाची दुकाने निघालीत.......:

येवले चहा......:

सायबा चहा......:

कडक चहा......:

हरमन चहा......

मायेचा चहा.......:

प्रेमाचा चहा.....

मी एका पुणेकराला सहज प्रश्न विचारला.......

सगळ्यात कोणता चहा चांगला ? ? ?

तर तो म्हणाला......फुकटचा चहा...... 

5) नवरा : मला आज पर्यंत समजलेले नाही की, टी व्ही वर दररोज नवनवीन रेसिपीचा कार्यक्रम बघून सुद्धा घरी खिचडीच का होते ???? 

बायको : हेल्दी आहे ते...सगळे जसे किंगफिशरचे कँलेडर बघून घरात कालनिर्णयच लावतात ना...

आगदी तस्सेच असते हे सुद्धा..

6) एक देशस्थ जाम वैतागला होता. त्याला विचारलं काय झालं तर म्हणतो ह्या कोकणस्थ लोकांचं एक काही धड नसतं - 

रानडे कर्वे रोडवर राहतात 

कर्वे फडके रस्त्यावर राहतात 

फडके लेले आळीत राहतात 

लेले सेनापती बापट रस्त्यावर राहतात 

बापट दांडेकर पुलाजवळ राहतात 

दांडेकर गोखले नगरला राहतात 

गोखले भांडारकर रोड वर राहतात 

आणि भांडारकर रानडे रस्त्यावर राहतात 

अरे आपापल्या गल्लीत रहा ना कुणीतरी .

7) You can't outsmart a Punekar:-

मुंबईकर: तुमच्याकडे गणपती किती दिवस बसतो 

पुणेकर: दिड दिवस !!! 

मुंबईकर:किती हा चिकटपणा ?? 

पुणेकर: तुमच्याकडे किती दिवस बसतो ??? 

मुंबईकर : दहा दिवस 

पुणेकर :  गणपती कशाची देवता आहे ?? 

मुंबईकर : बुद्धीची !!! 

पुणेकर : मग बरोबर आहे.....आम्हाला दिड दिवस पुरतो. 

8) दुकानदार - साहेब, काय देऊ?

ग्राहक - होणाऱ्या बायकोच्या कुत्र्यासाठी केक द्या.

दुकानदार - बांधून देऊ की इथेच खाणार? 

9) मुंबईत समुद्राजवळ रहाणाऱ्यांनी कृपया धोतर व टोपी घालू नये. वादळ घुसलं तर पॅराशुट होईल! 

10) पुण्यातील सोसायटीच्या बाहेर लागलेली पाटी 

IIअतिथि देवो भव II 

परंतु देवांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपापली पुष्पक विमाने सोसायटीच्या बाहेर पार्क करावी...

11) मुलगा- मी तुमच्या मुलीवर 10 वर्षांपासून प्रेम करतोय 

पुणेरी वडील - मग आता काय पेन्शन मागायला आलायस ??

 

12) भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना

पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?

भिकारी : हो आहे ना साहेब

पुणेकर : मग आधी ते खर्च कर. भिकारचोट कुठला.

13) स्थळ :- सदाशिव पेठ

गिऱ्हाईक : “हियरिंग एड चे यंत्र केवढ्याला?” 

दुकानदार :-“वीस रुपयापासून पाच हजार रुपये पर्यंत आहेत.” 

गिऱ्हाईक :- “वीस रुपयांचे बघू.” 

दुकानदार:-  “हे घ्या...

कानात एक बटण आणि कानातून शर्टाच्या खिशात एक वायरचा तुकडा सोडायचा...." 

गिऱ्हाईक :- “हे कसं काम करतं?” 

दुकानदार  :- “काहीच काम करत नाही. पण ते बघून सगळे जण तुमच्याशी मोठ्याने बोलायला लागतात...... 

पुण्यात सर्वात जास्त खप असलेलं, हेच एकमेव यंत्र आहे..

15) कधी विचार केला: M सरळ आणि W उलटे का लिहितो?

कारण Men सरळ आणि Women उलटा विचार करतात काल ही कथा थेट माझ्यासोबत घडली ……

16) काल मी लिफ्टने वर जात होतो, त्यावेळी एका बाईने लहान मुलासह लिफ्टमध्ये प्रवेश केला .. !!

मी लिफ्टचे बटण दाबले आणि विचारले: "दुसरा की तिसरा"?

बाईंनी रागाने म्हटले, "आत्या आहे मी याची" 


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Laughter ( Marathi)

  विरंगुळा: 1) सकाळी सकाळी बायको चा हसरा चेहरा बघा. दिवस मस्त जातो. * पु ल देशपांडे  ** मग बायको कुणाची पण असो  2) डॉक्टर :- हा बोला,  कुठं ...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!