मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

रविवार, 2 अगस्त 2026

Amazing !! Marathi ( Paan )

 हे तर आक्रित च आहे. 

******************

निसर्गाच्या सानिध्यात पानांना समजून घेण्यासाठी. 

     पानं.    


काही पानं खुडायची असतात. (चहा)

काही पानं वाढायची असतात. (केळी)

काही पानं चिरायची असतात. (कोथिंबीर)

काही पानं शिजवायची असतात.

(पालक, मेथी)

काही पानं तळायची असतात.

(अळू, कढीपत्ता)

काही पानं खायची व रंगवायची असतात. 

(नागवेल, विडा)

काही पानं कुटायची असतात.(पुदिना)

काही पानं लुटायची असतात.(आपटा)

काही पानं पुरायची असतात.

(पालापाचोळा कंपोस्ट)

काही पानं जपायची असतात.(पिंपळ)

काही पानं तोरणात सजवायची असतात.(आंबा)

काही पानं केसांत माळायची असतात.(केवडा)

काही पान वाहायची असतात. (बेल)

काही पानं मानाची असतात.(नागवेली)

काही पानं खमंग फोडणी साठी असतात.

(कढीपत्ता)

काही पानं शेवटी सोबती येतात.(कडबा)

काही पानं हातावर रंगवण्यासाठी असतात.(मेंदी)

काही पानं नैवेद्याच्या परिपूर्णते साठी असतात.(तुळस)

काही पानं फक्त स्वादासाठी असतात.(पुदिना)

काही पानं मसाल्यासाठी असतात.

(तेजपत्ता/तमालपत्र)

काही पानं सुशोभिकरणासाठी असतात.

(नारळाच्या झावळ्या,केळीची पाने)

काही पानं पत्रावळी बनविण्यासाठी असतात.(पळस)

काही पानं तल्लफ भागविणारी असतात.(तंबाखू)

काही पानं सत्यनारायण पूजे साठी उपयुक्त असतात.(कर्दळी)

काही पानं गणपतीला आवडतात.(आघाडा,हराळी)

काही पानं जेवण बनवण्यासाठी असतात. (केळी,फणस)


आणि आपल्यासाठी

काही पानं भरायची असतात.(वही)

काही पानं खेळायची असतात (पत्ते)

काही पानं जोडायची असतात. (पुरवणी)

काही पानं लपवायची असतात. (प्रगती पुस्तक !)

काही पान तोंडाला पुसायची असतात. (आश्वासन)

काही पानं उलटायची असतात.(भूतकाळ/ दुःखाचे क्षण)

तर काही नवीन पानं उघडायची असतात.(उद्याची आशा/भविष्यकाळ)


 *थोडक्यात काय, तर पानोपानी आनंदी आनंद..* .!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Amazing !! Marathi ( Paan )

 हे तर आक्रित च आहे.  ****************** निसर्गाच्या सानिध्यात पानांना समजून घेण्यासाठी.       पानं.     काही पानं खुडायची असतात. (चहा) काही...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!