मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

गुरुवार, 1 अक्टूबर 2026

Laughter! ( Marathi )

 *"थोडं हसूयात"*

*Mobile चे ringtone सुद्धा*

*जबाबदारीने ठेवावे लागतात*

*तसेच नको त्या ठिकाणी*

 *ते वाजू नयेत*

*याची काळजी घ्यावी लागते...*

*परवा एका प्रेतयात्रेला गेलो होतो, तिथे एकाचा फोन वाजला*

*अकेले अकेले कहां जा रहे हो*

*हमे साथ लेलो*

 *जहाँ जा रहे हो l*

*कंस, व्यास आणि कर्ण*

*हे तिघेजण महाभारतातून*

*भूमितीत गेले की,*

*भूमितीतून महाभारतात आले.* 

...*हे माहित नाही, पण*

*एक मात्र खरं की*

*भूमितीतले मार्क कळले*

*की घरी महाभारत घडायचं.*

 *माझी बायको*

*हॉस्पिटलमध्ये आहे*

*असे सांगून एकजण*

*गेले ३ महिने माझ्याकडून पैसे घेतोय.*

*काय आजार आहे म्हणुन,*

*काल हॉस्पिटलला गेलो*

*तर समजले,*

*त्याची बायको "नर्स"  आहे.*

*रोज "अडानी"च्या*

*वाढत्या मालमत्तेच्या बातम्या बघून बघुन आई मला म्हणाली...*

*बघ जरा नालायका*

 *अडाणी असून पैसे कमवतोय,*

*तुझा तर एवढे शिकुन पण*

*काही उपयोग नाही...मुडद्या...!*

 मित्र - *अरे! किती वेळ फोन करतोय*

*फोन का उचलत नाहीस?*

मी : ( *हलक्या आवाजात*)  *लेक्चरमध्ये आहे*

मित्र - *कुठे आहे लेक्चर?*

*विषय काय आहे?*

मी - *लेक्चर घरीच आहे* *मीच विषय आहे

एक गर्विष्ठ शास्त्रज्ञ - *तुम्ही मला देव दाखवा*

पुणेकर - *तुम्ही मला ऑक्सिजन दाखवा*

*शास्त्रज्ञ - थोडा वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन काय आहे ते कळेल*

पुणेकर - *तुम्ही थोडा जास्त वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला देव दिसेल.*

*कॉलेज मध्ये एक सुंदर मुलगी*

*एका तरुणाकडे आली*

 *आणि म्हणाली*

*"Hi I'm Anushka,*

*1st Year Arts, & you!!"*

*युवक (गर्वाने) "मी माझ्या मुलाची फीस भरायला आलोय"*

*Moral....*

नेहमी *फक्त आईच संतूर मॉम नसते बाप पण उरलेला* साबण वापरतो।

*पितळीच्या वाटीला*

 *कितीही घासा*

*ती सोन्याची होत नाही.*

*हे वाक्य कुणीतरी*

*ब्युटी पार्लरच्या बोर्डाखाली लिहून पळून गेलं राव!*

*गणिताचे शिक्षक स्टाफरूममधे रिकाम्या डब्यात चपाती बुडवून खात होते...*

*मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात तर काहीच नाही...*

*गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला 'एक्स'  मानल आहे..!*

*सासू (सुनेला) : अगं उठ, तो बघ सूर्य पण उठला.*

*सून : तेवढंच दिसतं तुम्हाला ! तो माझ्या आधी झोपतो ते नाही दिसत...*

*बायको - अहो ऐकता का ???.... पाटलांच्या मुलीला गणितात १०० पैकी ९९ मार्क्स मिळाले.*

नवरा - वाह... मग एक मार्क कुठे गेला???*

*बायको - आपला कार्टा घेऊन आलाय!*

*यजमान : आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो*

*पुणेकर : वा , तरीच छान थंड होता. . .*






कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Laughter! ( Marathi )

 *"थोडं हसूयात"* *Mobile चे ringtone सुद्धा* *जबाबदारीने ठेवावे लागतात* *तसेच नको त्या ठिकाणी*  *ते वाजू नयेत* *याची काळजी घ्यावी ...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!