*हसू या थोडंस*...
१) *जीवन काय आहे?*
१ ते १०वयात: "वय किती?"
१० ते २० वयात: "मार्क्स किती?"
२० ते ३० वयात: "कमाई किती?"
३० ते ४० वयात: "मुलं किती?"
४० ते ५० वयात: "संपत्ती किती?"
५० ते ६० वयात: "बीपी, शुगर किती?"
६० ते ७० वयात: "पेन्शन किती?"
....७० वयानंतर: "अजून किती?"
२) *आपले संस्कार आपण कधीच विसरायचे नाहीत.*
काल रात्री 2 वाजता मला शिंक आली.
तरीही मी जवळ झोपलेल्या 3 जणांना उठवून "सॉरी" म्हटलं.
३) विद्यार्थी :- "गुरुजी, मला सांगा, माझं मूल्यमापन मी कसं करु ? माझ्यात काय कमतरता आहे, ते कसं शोधू?"
गुरुजी : "तू लग्न कर !
मग तुझी बायको तुझ्यातच काय, तुझ्या आख्ख्या खानदानात काय कमतरता आहे, ते बरोब्बर शोधून काढेल !"
४) तेलात तळलेले समोसे खाणे लोकांना आवडतं.
ते अशुद्ध पाण्याने भरलेली पाणीपुरी खातात.
फुटपाथ वर धूळ उडलेली भजीपाव खातात.
कोक आणि पेप्सीचे विष पैसे खर्च करून पोटात उतरवतात.
सिगारेट फुंकतात, तंबाखू आणि मावा खाउन पिचकारी मारतात.
दारू तर पाण्यासारखी पितात.
पण...
डॉक्टरांनी औषधे लिहून दिली की विचारतात ....,
"साहेब काही साईड ईफेक्ट तर नाही ना होणार?"
५) नवऱ्यांना वाटतं बायकोला काही कळत नाही.
आणि
बायकांना वाटतं नवऱ्याला काही कळत नाही.
आणि अशाप्रकारे....,
दोन्ही 'ढ' व्यक्ती वर्षानुवर्ष एकत्र राहतात.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें