मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

मंगलवार, 17 सितंबर 2024

Dharm & Darshan !! Gammat Avyavanchi !! ( Marathi)

 *अवयवांची गंमत....

०१. जिभेचे वजन खूप हलके असते पण तिचा तोल सांभाळणे खूप कठीण असते. 

०२. जीवन जगायचं पावलांप्रमाणे. प्रथम पडणार्‍या पावलाला गर्व नसतो, आणि मागे पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमीपणा नसतो. 

०३. पाठ मजबूत ठेवा. कारण शाब्बासकी किंवा धोका पाठीमागूनच मिळणार आहे.

०४. माणसाने घमेंडीत एवढे उडू नये. एक दिवस जमिनीवरच पाठ ठेवायची असते हे विसरु नये. 

०५. सगळ्यात सुंदर नातं हे डोळ्यांचं. एकत्र मिटतात, उघडतात, रडतात आणि एकत्र झोपतात पण एकमेकांना न पाहता. 

०६. नातं हे हात आणि डोळ्यांप्रमाणेपण असावं. कारण हाताला लागलं की डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर हात डोळे पुसतात. 

०७. एकदा हाताने पायांना विचारले, तुझ्यावर सगळे डोके ठेवतात तो अधिकार मला का नाही, त्यावर पाय हसून म्हणाले यासाठी जमिनीवर असावं लागतं, हवेत नाही.

०८. दुःखात बोटं अश्रू पुसतात तर आनंदात तीच बोटं टाळ्या वाजवतात, आपले अवयवच असे वागतात तर दुनियेकडून काय अपेक्षा ठेवायची !

०९. जगातील सुंदर जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य पण ते एकत्र कधीच नसतात, पण जेव्हा एकत्र येतात तो सगळ्यात सुंदर क्षण असतो. 

१०. एकदा देवाच्या पायावरची फुले गळ्यातील फुलांना म्हणाली, तुम्ही असं कोणतं पुण्य केलं म्हणून देवाच्या गळ्यात आहात? त्यावर हारातील फुले म्हणाली त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते. 

११. कान नावाचा घातक अवयव जे ऐकतो तेच डोळ्यांना बघायला लावतो.

१२. या जगात चपलेशिवाय योग्य जोडीदार कोणीच नाही. कारण एक हरवली की दुसऱ्याचं जीवन तिथेच संपते.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller ( 132)Apradh !!

The Asthana family reached by bus to the Police station first as it was an official work. They straight way reached to Mr. P. L.Sharma , he ...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!