मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

बुधवार, 18 सितंबर 2024

Dharm & Darshan !! Marathi gyan !!

 *"टवळी" ही शिवी नाही, मग आहे तरी काय ?*


... हा आमच्या आजी-पणजीच्या तोंडी असणारा एक ग्रामीण शिवी-सदृश् शब्द....*"'टवळी"'... बऱ्याच दिवसातून ऐकला आणि कुतुहल जागृत झालं..*


*टवळी म्हणजे काय..!*

*माहीतीचा शोध घेतला..* 

*पूर्वी घरातील वेगवेगळ्या वस्तूंना अथवा देवघरातील वस्तूंना अनेक नावे होती.(मराठी भाषा ही खूप प्रगल्भ आहे.)*

*जुन्या काळामध्ये घरामध्ये प्रकाश देणाऱ्या वस्तू या शक्यतो स्त्रीलिंगी असत. उदाहरणार्थ - पणती, चिमणी, मशाल, समई, चुड, आरती तर काही पुल्लिंगी सुद्धा असत टेंबा, पलिता, भुत्या, कंदील, बोळा, काकडा, जावळा...*

*पूर्वी वापरले जाणारे "दिवटी" आणि "टवळी"* हे सुद्धा दिव्याचे प्रकार आहेत. 

देवघरात असते ती *" दिवटी"* तर शेज घरात अथवा माजघरात असते ती *"टवळी."* 

*दिवटी ही एका जागी स्थिर असते, तर टवळी हवी तशी उजेडासाठी फिरवता येते.* कधी ती घरात, दारात, गोठ्यात, पडवीत नेता येते म्हणजे "टवळी" उजेडासाठी सर्वत्र फिरते *म्हणून गावभर फिरणाऱ्या एखाद्या स्त्रीला किंवा मुलीला टवळी म्हणू लागले.* 

*तर घरात बसणारी दिवटी*. पुरुष-गटातील काम न करणाऱ्या पुरुषाला.. जो आडदांड आहे अशाला किंवा काही वेळा वंशाच्या दिव्याला सुद्धा दिवटा म्हणतात. 

*टवळीप्रमाणे टवळाही असतो.*

गावातील प्रकाशासाठी वापरला जाणारा वेटोळ्याचा दिवा, ज्याची वात खूप मोठी असते, ती लवकर पेटत नाही, त्याला पेटवण्यासाठी खूप उशीर लागतो, त्याच्यावरून ही एक म्हण पडली.... एखादी व्यक्ती घरात उशिरा आली की घरचे लोक म्हणायचे *"आला टवळ्याला वात लावून"* (म्हणजेच खूप उशिरा आलास.)                                       

तर तात्पर्य हेच की, 

*टवळा व टवळी ही शिवी नसून प्रकाशासाठी वापरला जाणारा व विविध ठिकाणांवर फिरवला जाणारा दिव्याचा प्रकार आहे.*      

        

  

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller ( 132)Apradh !!

The Asthana family reached by bus to the Police station first as it was an official work. They straight way reached to Mr. P. L.Sharma , he ...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!