मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

मंगलवार, 3 सितंबर 2024

Dharm & Darshan !! Krishna -Arjun !! ( Marathi )

 *"काय चुकलं" हे शोधायला हवं,*

 *पण आपण मात्र "कुणाचं चुकलं" हेच शोधत राहतो......*   

 कृष्णाने समोरच्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला......


हे सगळे सोने गावकरयांमध्ये वाटून टाक

अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.


लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की...


मी प्रत्येक गावकरयांला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.

लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.


पुढे अर्जुन छाती काढून चालत होता.


मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते. 


दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते.


अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता.


पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.


लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.


आता अर्जून अगदी दमून गेला होता.


पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. 


शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!


आता यापुढे मी काम करू शकत नाही. 

मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की.......


या दोन सोन्याच्या टेकडया आहेत त्या तू लोकांना दानI करून टाकायच्या......

लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकरयांना बोलवले आणि सांगितले की.....


या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत. 


एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला.


लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जून चकित होऊन पाहात बसला.


हा विचार आपल्या मनात का आला नाही.....


या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला. कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला..... 


अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास.....!


तू गर्वाने प्रत्येक.......

गावक-याला सोने वाटू लागलास.


जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास.....!  


कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते.


त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.


आपले कुणी कौतुक करतंय.....

गुणगान गातंय......

हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.

व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.

देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे.....

शुभेच्छा द्याव्यात..... धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे.....

म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते.

कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे.............


"काय चुकलं" हे शोधायला हवं,

 पण आपण मात्र "कुणाचं चुकलं" हेच शोधत राहतो......

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Deepaavali !!

 दीपावली में लक्ष्मी और गणेश की पूजा का रहस्य! प्रायः लोगों के मन में प्रश्न उठता की दीपावली में बजाय लक्ष्मी और नारायण के युगल पूजा के गणेश...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!