कुंभमेळा का होतो!?
अगस्ती ऋषी नी दिलेल्या शापामुळे देव लोक शक्तीहिन झाले व मग पुढे अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशाने समुद्र मंथन ही संकल्पना पुढे आली.....l
समुद्र मंथन हे बारा दिवस चालले ते बारा दिवस म्हणजे पृथ्वीवरील बारा वर्ष होतात.....
अमृत प्राप्त झाले वर ते दानवापासून लपवून ठेवण्यासाठी देवांनी अमृतकुंभ घेऊन पलायन केले....
या पलायना दरम्यान ते ज्या ठिकाणी लपले ते चार ठिकाण म्हणजे
हरी द्वार,प्रयाग ,उज्जैन
व नाशिक.....
या ठिकाणी हेl अमृतकुंभ ठेवल्या गेल्याने या चार स्थानांना महत्व प्राप्त झाले....
ते या चार ठिकाणी ज्या वेळी थांबले त्या वेळी असणारे ग्रह योगावर पुढे कुंभमेळा भरु लागले...
रवी, चंद्र व गुरु
हे गोचर मध्ये विशिष्ट पद्धतीने योग जुळून येतो त्या त्या योगावर त्या ठिकाणी कुंभ मेळा कधी सहा वर्ष तर कधी बारा वर्ष तर कधी १४४ वर्षांनी हे योग येत असतात
आता
जर असा योग सहा वर्षांनी आला तर त्यास अर्धकुंभ मेळा भरतो
जर असा योग बारा वर्षांनी आला तर तो पुर्ण कुंभ भरतो
आणि असा योग जर १४४ वर्षांनी आला तर तो महाकुंभ मेळा भरतो
अता येणारा वर्षातील प्रयाग येथील जो कुंभमेळा भरत आहे तो महाकुंभ मेळा आहे....
आणि हा १४४ वर्षांनी आला आहे....
आता या पुढे हा योग २२ व्या शतकात येणार आहे
आपले भाग्य की आपल्या आयुष्यात महाकुंभ मेळ्यचे आयोजन होत आहे
हा योग आपल्या आयुष्यात येणं म्हणजे खुप च भाग्यवान....
आणि तेही प्रयाग या स्थळी
प्रयाग ला एवढे महत्व का तर ब्रम्हदेवाने सृष्टी जेव्हा निर्माण केली तेव्हा
प्रथम यज्ञ प्रयाग येथे केला होता..
प्र म्हणजे प्रथम व याग म्हणजे यज्ञ म्हणून त्यास प्रयाग हे नाव पडले....
या त्रिवेणी संगमात जर आपण या कुंभ पर्वकाळात स्नान केलं तर मोक्षप्राप्ती होते, कळतनकळत केलेली पापे नष्ट होतात.....
मोठं मोठ्या तपस्वी, साधूसंत यांनी स्नान करून पवित्र झालेल्या जलात आपण स्नान केल्यास तेच सिद्धी व साधनेचे फळ मिळते....
हा कुंभमेळ्याचा पर् काळ एक महिना जरी असला तरी वर्षभर आपण तिथे जाऊन स्नान केले तरी चालते....
गर्दी च्या वेळी जाऊन त्रास करून घेण्या पेक्षा नंतर गेलेलं बरं....
खरंतर त्या पर्वकाळात तपस्वी, साधूसंत यांचाच मान व अधीकार असतो...
आपण गर्दी करुन त्यांचे कार्यात अडथळा निर्माण करु नये......
दुरुन त्यांचे दर्शन घ्यावे
वेळ मिळेल तेव्हा संगमात स्नान संध्या करावी.....
पर्वकाळात.... पिंडदान श्राद्धकर्म करण्याने पितरांना देखील मोक्षप्राप्ती होते
तर आशा या सुवर्णसंधी
म्हणा किंवा अमृत संधी म्हणा याचा आवश्य लाभ घ्यावा व उपकृत व्हावे....
♾️♾️♾️♾️
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें