मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

गुरुवार, 23 जनवरी 2025

Dharm & Darshan !! Aai ( Marathi)

 *तिच्या निमित्ताने......


तुम्ही कधी एकटे असताना 

शांतपणे बसून विचार केला आहे का?

...... तिनं तुमच्यासाठी काय केले आहे याचा ?


ती तासंतास स्वयंपाक घरात 

काही बाही बनवत असते...

आणि तुम्ही काही सेकंदात ते फस्त करता ...


कधीतरी ती उन्हात काहीतरी वाळवते...

तर कधी पाण्यात काही तरी भिजवते ...

कधी चटपटीत मसालेदार..

कधी कधी गुळापेक्षाही गोड...

तर कधी तिखटांबटगोड चवींचं...


मेथीच्या पराठ्यात, गाजराच्या हलव्यात, 

भोपळ्याच्या भरीतात, जवसाच्या चटणीत, 

बारीक चिरलेल्या कोथिंबीरीत तर कधी 

वेलदोड्याच्या टरफलात ...


आपण फक्त सजलेली डीश पाहतो...

आणि ताव मारतो.... पण आपल्याला दिसत नाही...


स्वयंपाकघरातली उष्णता,

हातावर गरम तेलाचा शिडकावा,

अंगावर आलेली गरम वाफ, 

कापलेल्या खुणा,

पायांना येणारी सूज,

पांढरे होणारे केस..

आणि थकत चाललेलं तिचं गात्र.... 

ती जाणवू देत नाही....


त्या छोट्याश्या स्वयंपाकघरात कधीतरी नीट बघा... तुम्हाला तिच दिसेल..... 

ओट्याचा आधार घेऊन उभी असेल! 


वर्षानुवर्षे काय बदललेलं आहे... 

काही दात सरकले असतील...

काही केस गळून पडले असतील...

तुमच्या घराचं घरामध्ये रुपांतर करताना 

काही सुरकुत्या ही आल्या असतील..... 


तिचा नाकावर येणारा चष्मा, 

हातात वळणारा लाडू, 

गोल गरगरीत पोळी लाटताना 

व्यस्त असणारी तिची नजर ...

आजही ती तेच करतेय...

गेली अनेक वर्षे ती तेच ते करतेय, 

आणि तुम्हाला बघताच मग विचारेल..... 

"काय हवंय ?"...


हे सर्व कुठून आणते माहीत नाही...

किती आणते कुणास ठाऊक...

कशात किती काय काय घालते....

पुरवून उरवते मात्र! 

कधीतरी विचार करा ...

आजवर तिनं जे काही केलं असेल...

ते तुम्ही नक्कीच करू शकणार नाही...


तिच्या मनातल्या काही अव्यक्त भावना आणि दडपलेल्या इच्छा कधी पाहील्याचं आठवतय,

ज्या आपल्याला दिसत नाहीत..


कारण न दिसणाऱ्या गोष्टी पाहणे 

आपल्या साठी महत्त्वाचे नसते कधी...

रादर.... तसा चष्मा आपल्या कडे नसतो, 


कधी तिच्या अनुपस्थितीत...

जेव्हा  दोन बिस्किटं अन् तिनंच केलेला चहा 

हातात घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर येऊन 

कोचावर स्वतःला झोकुन देतो ,


तेव्हा मग तिचेच शब्द, 

विचार करायला भाग पाडतात... 

'काय हवय ? 

कारण एवढ्या वर्षात तिनं 

फक्त अन्न शिजवलेलं नसतं ...

तर  घरपण तयार केलेलं असतं ...

स्वतःला झिजवून...


बनवायला तास लागतात हो .....


संपूर्ण घर उभं केलय तिनं...

रात्रंदिवस मेहनत करून.

तुम्ही एकदा यादी बनवता का? 

तिनं काय केले आहे याची ?


यादी बनवता येणार नाही

प्रयत्न केला तरी ..

पण चश्मा नक्कीच बदलू शकतो आपण!

*सर्व गृह लक्ष्मीना सादर समर्पित* 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Today’s Tip !! ( ONE ) Woman Woman!!

 Today’s Tip !! Woman Woman !!  I personally feel , every woman her self is a Live monument of big struggle right from the beginning. Man an...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!