मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

गुरुवार, 23 जनवरी 2025

Dharm & Darshan !! Shraddh Paksh !! ( Marathi )

 *|| पिंडी ते ब्रह्मांडी ||*

हिंदू धर्म संस्कृतीला लाभलेलं देणं म्हणजेच हिंदू धर्मातील सणवार पण हेच सणवार कधी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तर कधी बंधुत्व आणि प्रेमाचं प्रकटीकरण करण्यासाठी साजरे केले जातात. श्रावणातल्या सणासुदीची रीघ आणि गणेशोत्सवाची धामधूम संपली की, आपल्या पूर्वजांची आठवण काढणारा हा पितृ पंधरवडयाचा कालावधी सुरू होतो. हा पितृपक्षाचा काळ, त्यात केलं जाणारं पूर्वजांचं शास्त्रोक्त स्मरण, पितृपक्षाच्या अखेरच्या दिनी येणारी सर्वपित्री अमावस्या आणि तिचं महत्त्व यावर टाकलेला हा प्रकाशझोत.

*पितृपक्ष पंधरा दिवसच का असतो ?*

श्रावण महिन्यातली सणाची लगबग संपली की, पितृपक्षाला सुरुवात होते. गणरायाचं विसर्जन झालं की, भाद्रपद पौर्णिमेला हा पंधरवडा सुरू होतो आणि या पंधरावडयाचा कालावधी भाद्रपद अमावस्येला समाप्त होतो. या पक्षाला म्हाळाचा महिना किंवा तर्पणाचा महिना म्हणूनही ओळखले जाते. हा पक्ष पंधरा दिवस ठेवण्यामागे एक गहन शास्त्र दडलं आहे.

आपण आपल्या लोकांशी प्रेमभावनेनं वागावं म्हणून सणासुदीचा घाट पूर्वजांनी घालून दिला आहे. खरं तर सर्वपित्री हा मृतांसाठी आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी राखून ठेवलेला काळ आहे. प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही शास्त्रीय कारण असतं, त्याचप्रमाणे या पंधरा दिवसांमागे अनेक गूढ कारणं असलेली पाहायला मिळतात.

मनुष्याला मनुष्यदेह मिळवण्यासाठी फार सायास करावे लागतात. पण मनुष्य जन्माला येऊनही काही जणांना मनुष्यदेहाचं सार्थक करता येत नाही. काही जणांच्या भावना, कल्पना पूर्ण करण्यासाठी त्यांचं आयुष्य कमी पडतं आणि काही कारणामुळे अशांना जगायला खूपच कमी कालावधी मिळतो. अशांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छाआकांक्षा पूर्ण व्हाव्यात आणि गत:प्राण झालेल्या आपल्या नातेवाइकांना मोक्ष मिळावा, म्हणून आपल्या कित्येक पिढय़ांपूर्वीपासून हा पितृ पंधरावडा हयात नसलेल्यांसाठी खास राखून ठेवला असल्याचे काही जुन्या जाणकारांचे म्हणणे आहे.

सर्वपित्री अमावस्या हा कालावधी पंधरा दिवस का, हा प्रश्न अनेकांना पडलेला असतोच. वर्षभर लोकांची आठवण न काढता याच पंधरा दिवसांत कर्मकांडाचे आणि मृत्यूनंतरचे विधी आणि श्राद्ध का केलं जातं, हा राहून राहून पडणारा प्रश्न सर्वानांच भेडसावत असेल खरं तर या मागे एक दंतकथा ऐकायला मिळते की, एकदा एका वशिष्ठ गोत्र असलेल्या ब्राह्मणांच्या पित्यांचा मृत्यू झाला.

खरं तर श्रावण महिन्यातच या वृद्ध ब्राह्मणाची अवस्था हालाकीची होती, पण देवाच्या भक्तीमुळे त्यांने श्रावणासारख्या पवित्र महिन्यात आपले प्राण सोडले नाहीत. पण श्रावणानंतरच्या पहिल्याच पौर्णिमेला त्याचा देहांत झाला आणि ही गोष्ट तो ब्राह्मणाचा मुलगा पचवू शकला नाही. पित्यावरील अपार प्रेमामुळे तो अगदी खुळसटासारखं वागू लागला आणि देवालाच धारेवर धरू लागला.

त्या वृद्ध ब्राह्मणांच्या मुलांने त्यांच्या पित्याला जिवंत करण्यासाठी याग केला. परंतु देवाने त्याला सांगितले की, ‘‘तुझ्या पित्यांचा काळ इतकाच होता. यापुढे त्याच्या यातना तुला सहन झाल्या नसत्या म्हणूनच त्याने स्वत: देहत्याग केला आहे.

आता तू याग यज्ञ करणं सोडून दे आणि पित्याला मरणोत्तर गती मिळण्यासाठी त्याचं विधिवत श्राद्ध घाल. आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ करून येणा-या अमावस्येला पशुपक्ष्यांना घाल. हा विधी केल्यामुळे तुझ्या वडिलांबरोबरच त्यांच्या बरोबरील २१ कुळांतील लोकांना मोक्षगती मिळण्यास मदत होईल.

तुझ्या या पंधरा दिवसांच्या यज्ञामुळे येथून पुढे कोणीही या पंधरावडयात यज्ञयाग करणार नाही आणि फक्त श्राद्ध आणि गत:प्राण झालेल्या लोकांसाठीच हा पंधरावडा ओळखला जाईल. या पंधरावडयात कोणतंही शुभ करू नकोस आणि आपल्या केस, दाढीचे मुंडण करू नकोस असं सांगून देवांनी प्रस्थान केलं. खरं तर या दंतकथेमुळेच पंधरा दिवसच श्राद्ध केलं जातं असा समज आहे. ज्या कोणाला आपल्या पूर्वजांची स्वर्गारोहण तिथी माहीत नसेल तर त्यांनी याच महिन्यात सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध घातले तरी चालते.

या पंधरा दिवसाचा शास्त्रशुद्ध संबंध आहे कारण, जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे असे संतरचनेत जागोजागी पाहायला मिळते.

*|| पिंडी ते ब्रह्मांडी ||*

मनुष्य देहाची रचना भगवंताने इतकी विचारपूर्वक केली आहे की, प्रत्येक सणावारांचा आणि प्रत्येक शास्त्राचा संबंध मानवी शरीराशी पाहायला मिळतो. सर्वपित्री अमावस्येचा मानवी शरीराशी संबंध लावायचाच म्हणाल तर एक संबंध लावता येईल तो म्हणजे आपल्या छातीच्या बरगडयामध्ये असणा-या हृदयाचा.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, याचा सर्वपित्री अमावस्येशी काय संबंध, पण फार बारकाईनं निरीक्षण केलं तर आपल्याला ही कळेल की, चौदा बरगडयामध्ये एक हृदय देवाने ठेवलं आहे. खरं तर या चौदा बरगडया आणि हृदयाचं एकत्र मोजमाप आणि सर्वपित्री अमावस्येच्या कथेचा संबंध पाहिला तर फार जवळचाच आहे.

कारण हृदयानं निवृत्ती घेतली तर माणसाला मरणाला सामोरं जावं लागतं आणि सर्वपित्री अमावस्येचा विधी केला नाही तर काही वंशपरंपरागत संकटाना तोंड द्यावे लागतं, असा काही तर्क लावता येतो. पण सर्वपित्री अमावस्या केलीच पाहिजे असे शास्त्रात कुठेच पाहायला मिळत नाही, असे नाही. सर्वपित्री श्राद्ध करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

* श्राद्ध का केले जाते ?*

गरुड पुराणाच्या मते, एखादी व्यक्ती गत:प्राण झाली की, त्याचे यमलोकाकडे प्रयाण सुरू होते. व्यक्तीचा देहांत झाल्यावर १३ दिवसांनी त्याचं प्रस्थान यमलोकाकडे होतं असा समज आहे. त्या तेरा दिवसांनंतर शास्त्रशुद्ध विधी केल्या जातात आणि या १३ दिवसानंतर यमलोकी जाण्यासाठी आत्मा सज्ज असतो आणि यमलोकाकडे पोहाचायला किमान १७ दिवस लागतात.

यमलोकी पोहोचल्यानंतर यमपुरीतील न्यायालयात हजेरी लावण्यासाठी यमलोकाच्या माध्यमातूनच प्रवास करावा लागतो. आणि या प्रवासासाठी या आत्म्याला ११ महिने लागतात. या ११ महिन्यांत त्याला अन्न, पाणी मिळत नसल्यामुळे हा विधी केला जातो असे मत आहे. यामुळेच मृत्यूनंतर एक वर्षाच्या आत हा विधी करणं महत्त्वाचं असतं.

*महाभारतातील आख्यायिका*

महाभारतातील कर्ण आपल्या सर्वाना माहीत असेलच, कर्णासारखा दाता आणि दानशूर व्यक्ती पृथ्वीवर पुन्हा जन्माला येणार नाही, कर्णाच्या दानशूरपणाच्या कथा- कहाण्या आपण लहानपणापासूनच ऐकत आहोत. महाभारताच्या रणांगणावर लढत असतानादेखील मरता मरता एका वृद्ध ब्राह्मणाला आपला सोन्याचा दात त्यानं दान केला होता अशी कथा आपण ऐकली असेलच.

महाभारताच्या रणांगणावर लढत असताना कर्णाला गतप्राण व्हावे लागले आणि जेव्हा तो गतप्राण झाला तेव्हा त्यांच्या आत्म्याचे प्रस्थान स्वर्गाकडे झाले. यानंतर दानशूर कर्ण इंद्रासमोर उभा होता. तेव्हा इंद्राने त्याला अन्न म्हणून सोने खायला दिले. यावर कर्ण म्हणाला, ‘‘इंद्रदेव तुम्ही माझी थट्टा करत आहात का? मी भुकेनं व्याकुळ झालो असताना तुम्ही सोने का थाळीत वाढत आहात.’’

यावर इंद्र म्हणाले की, ‘‘कर्णा आयुष्यभर गरज पडलेल्या प्रत्येकाला तू मदत केलीस. कधीही तुझ्या दारातून कुणीही रित्या हातानं गेलं नाही. पण आयुष्यभर तू धनाचेचं दान केलेस आणि तुझ्या पूर्वजांच्या स्मृतीत कधीही अन्नदान केलं नाहीस, त्यामुळेच मी तुला हे सोनं खायला घालतो आहे.’’ या प्रसंगाने कर्णाचे डोळे उघडले आणि त्याने इंद्राकडे अन्नदान करण्यासाठी मुदत मागितली.

यावर इंद्राने त्याला सांगितले की, सूर्य जेव्हा तूळ राशी सोडून वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि पूर्णचंद्र भुतलावर दिसेल अशा वेळेस हे अन्नदान केलेस तर ते पूर्णत्वास जाईल. त्याचप्रकारे इंद्राने कर्णाला पंधरा दिवस पृथ्वीवर पाठवलं आणि या पंधरा दिवसांत त्यानं पूर्वजांसाठी अन्नदान केलं. यामुळे कर्णासोबत त्यांच्या मागील तीन पिढय़ांना मृत्यूउत्तर गती मिळाली, यामुळेच सर्वपित्री अमावस्येचा पंधरावडा राखून ठेवल्याचे दिसून येते.

*सर्वपित्री अमावस्या करण्यामागचं कारण*

पूर्वजांनी प्रत्येक सणाला एक विशेष महत्त्व दिलं आहे. हा पंधरवडा हा काहीसा अशुभ मानला जात असला तरी यामागे चांगलं आणि खरंच हितकारक कारण दडलं आहे. वर्षभरात माणसाच्या हातून अनेक चांगली-वाईट कर्म घडत असतात.

या चांगल्या-वाईट कामाच्या कचाटयातून सुटण्याकरता पूर्वजांचं निमित्त करून दान-धर्म केला जातो. काही संताच्या अभंगात आपल्याला सहज स्पष्टपणे दिसून येते की, अन्नदानासारखे चांगले दान या भूतलावर नाही कारण अन्नदान केलं तर भोजन करणा-या व्यक्तीचा आत्मा तृप्त होतो आणि हे अन्न ग्रहण करणारे इतर या अन्नदानामुळे सुखी, समाधानी असतात.

असे केल्याने सगळ्या पापांचा अंत झाला, असे मानलं जातं. बहुतेक हीच गोष्ट लक्षात घेऊन आपल्या पूर्वजांनी आपला विचार करत त्यांच्या आठवणींच्या निमित्ताने आपल्या पदरी पुण्य पडावे, यासाठी या पितृपक्षात श्राद्ध करण्याचा घाट घातलेला दिसतो.

*सर्वपित्री अमावस्येमधील तिथी आणि त्याचं महत्त्व*

सर्वपित्री अमावस्या भाद्रपद पौर्णिमेला सुरू होते आणि भाद्रपद अमावस्येला संपते यामध्ये १५ दिवस आहेत. या पंधरा दिवसांत १५ तिथी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं साज-या केल्या जातात. भाद्रपद पौर्णिमेला पौर्णिमा श्राद्ध किंवा प्रतिपदा श्राद्ध म्हणतात.

जी व्यक्ती प्रतिपदेला किंवा पौर्णिमेला जगाचा निरोप घेते, अशा व्यक्तीच्या स्मृतीत या दिवशी अन्नदान केल्यास त्याची फलप्राप्ती होते असा समज आहे. प्रतिपदेनंतर द्वितिया, आणि तृतीया श्राद्धाचे दिवस येतात. या तिथी वर ज्याचं निधन झालं आहे अशा लोकांना द्वितिया आणि तृतीया दिवशी श्राद्ध आणि तर्पण केल्यास ते फलित होते.

चतुर्थी आणि पंचमी श्राद्धाला एक विशेष महत्त्व आहे. कारण याच श्राद्धाला ‘भरणीश्राद्ध’ देखील म्हणतात. या श्राद्धामध्ये जे अविवाहित लोक मृत्यू पावले आहेत किंवा ज्यांना जगण्याची इच्छा असताना देखील काही आजारांच्या कारणामुळे त्यांना जग सोडावं लागलं ज्याच्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत अशा तरुण किंवा वृद्ध व्यक्तीच्या स्मरणार्थ हे पिंडदान केलं जातं, ज्यावेळेस आपल्याला मृताची तारीख किंवा तिथी माहीत नसते त्यावेळेस बहुतांश लोक भरणी नक्षत्रावर श्राद्ध करताना दिसतात.

खरं तर चतुर्थी आणि पंचमीच्या श्राद्धाला भरणी नक्षत्र असल्यामुळे या श्राद्धाला ‘भरणीश्राद्ध’ ही म्हटलं जातं. या दिवशी घातलेलं श्राद्ध गयेमध्ये श्राद्ध केल्याप्रमाणे आहे. पंचमी श्राद्धानंतर षष्ठी आणि सप्तमीला लोकांच्या मृत्यूप्रमाणे श्राद्ध घातलं जातं यासाठी विशेष महत्त्व नाही, पण जर कोणी षष्ठी आणि सप्तमीला निधन पावला असेल तर यासाठी हे दिवस उत्तम आहेत.

अष्टमीला कमी प्रमाणात श्राद्ध घातली जातात कारण अष्टमीला पुराणकाळापासूनच एक विशेष महत्त्व आहे. अष्टमीला शुभ तिथी मानली जाते यामुळे कमी प्रमाणात श्राद्ध या दिवशी पाहायला मिळतात आणि अष्टमीला निधन पावलेल्या व्यक्तीना जर या दिवशी पिंडदान केले तर त्यांना मोक्षाची गती मिळते.

या श्राद्धाच्या दिवसात नवमी तिथीला वेगळचं महत्त्व आहे. कारण या तिथीलाच ‘अविधा नवमी’ म्हणतात. अविधा नवमी नावातच अर्थ सांगून जाते. लग्नानंतर ज्या व्यक्तीची पत्नी किंवा पती निधन पावतो, अशा व्यक्तीच्या आठवणीसाठी अविधा नवमीचा घाट घातलेला दिसतो. ज्या व्यक्तीच्या आईचे, पत्नीचे किंवा इतर सदस्याचे निधन नवमीला झाले असल्यास हा अविधा नवमी श्राद्ध करावं लागतं.

आईसाठी घातलेल्या या श्राद्धाला ‘मातृश्राद्ध’ असं नामाभिधान प्राप्त झालं आहे. यानंतर येणा-या दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथीवर मृत झालेल्या लोकांसाठी हे दिवस राखून ठेवलेले दिसतात. त्रयोदशी श्राद्धाला वेगळचं महत्त्व आहे कारण मरणानंतर तेरा दिवसांनी मनुष्याचा मरणोत्तर प्रवास सुरू होतो आणि यामूळेच या तिथीला एक वेगळं नाव देण्यात आलं आहे. ते म्हणजे ‘काकबली’.

कारण मृत्यूनंतर पिंडाला ते-याव्या दिवशी कावळा शिवला तर मृत झालेल्या व्यक्तीला सद्गती मिळाली असं समजलं जातं. त्यामुळे त्रयोदशीला श्राद्ध घातल्यावर ज्याच्या पिंडाला कावळा शिवेल त्याला मोक्ष मिळतोच, असा पूर्वापार चालत आलेला समज आहे. त्यामुळे या दिवशीच्या श्राद्धाला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.

या श्राद्धाला ‘मघाश्राद्ध’ देखील म्हटलं जातं. कारण या दिवशी मघा नक्षत्र चंद्र लग्नात असते आणि मघा नक्षत्रामुळे याला ‘मघाश्राद्ध’ म्हणून संबोधलं जातं. यानंतर चर्तुदशीला येणा-या तिथीला ‘चतुर्दशी श्राद्ध’ किंवा ‘चौदस श्राद्ध’ म्हणून ओळखलं जातं. या श्राद्धामध्ये ज्या लोकांचा पाण्यात बुडून किंवा अग्नीचा सामना करताना किंवा अपघाती मृत्यू झाला असेल किंवा ज्याने स्वत: आत्महत्या केली असेल. किंवा एखाद्या वैर भावनेतून कोणा व्यक्तीचा खूण किंवा हत्या झाली असेल अशा व्यक्तीसाठी हा तिथी राखून ठेवलेला दिसतो.

यामध्ये जर कोणी चतुर्दशीला मृत झाले असेल तर त्याचं ही श्राद्ध करता येतं. यानंतर येणारी तिथी म्हणजे अमावस्या या तिथीला ‘सर्वपित्री अमावस्या’ म्हटलं जातं. या तिथीवर अनेक जणांची श्राद्ध केली जातात.

कारण काही कारणास्तव तिथिगत श्राद्ध घालता येत नसतं तर काही वेळेस तिथीच्या नक्षत्राचा चंद्रप्रवेश श्राद्धासाठी उत्तम नसतो तर काही जणांना पूर्वजांची मृत्यू तिथी माहीत नसते तर काही जण कौटुंबिक सुखासाठी प्रथमच श्राद्धाचा घाट घालताना दिसतात, यासाठी हा दिवस उत्तम मानला आहे. या दिवशी श्राद्ध घातले असता, ते पूर्वजांपर्यंत पोहोचतं असा जनमानसाचा समज आहे. या तिथीला ‘मोक्षतिथी श्राद्ध’ही म्हटलं जातं आणि यामुळेच या दिवशी श्राद्ध केले असता पूर्वजांना मोक्ष गती मिळते.

*पिंडदानाला कावळाच का ?*

मृत्यूनंतर तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केलं जातं. पिंडदान प्रक्रियेत कावळा या पक्ष्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण मनुष्य आणि कावळा यामध्ये निसर्गत: भरपूर साम्य आहे. कावळ्याला अशुभ पक्षी जरी मानलं असलं तरी पिंडदानासारख्या कामाला त्याचं शुभ असण्याचं महत्त्व पटतं. मनुष्य आणि कावळा हे दोन्ही समरूप असल्यामुळे कावळा या पक्ष्यांचा पिंडाला स्पर्श होणे अनिवार्य मानलं आहे.

मृत्यूनंतरच्या प्रवासासाठी मनुष्य आत्म्याला काही त्रास होऊ नये म्हणून कावळा पिंडाला शिवणं गरजेचं आहे. कावळा हा पक्षी देवता आणि मनुष्य प्राण्यामधला दुवा आहे. काहीवेळेस घराच्या छपरावर कावळा ओरडू लागला तर पाहुणे घरी येणारं असा संदेश तो आपला देत असल्याचे आपल्याला कळतं लोकांना कावळ्यांची भाषा थोडीफार कळते त्यामुळे मृत लोकाचं प्रतीक म्हणून कावळा हा पक्षी पिंडाला स्पर्श करतो. स्वत: माऊली ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी कावळ्याशी संवाद साधताना म्हणतात.

पैल तो गे काऊ कोकताहे |

शकुन गे माये सांगताहे ||

उड उड रे काऊ |

तुझे सोन्यानं मढवीन पाऊ || 

पाहूणे पंढरी राऊ। घरा कैयेती ||

वरील अभंगात माऊली कावळ्याला विचारत आहेत की, अरे पैलतीरावर बसून तो ओरडत आहेस. हा जणू माझ्यासाठी शुभशकुनच आहे. मला माहीत आहे की, पंढरीचा राजा माझ्याकडे पाहुणा म्हणून येणार आहे. हेच तू जीवाच्या आकांताने मला सांगतो आहेस. जर पंढरीराज माझ्या घरी आले तर तुझ्या पायाला सोनं लावीन आणि तुला नानाविध भोजन घालीन अशाप्रकारे हा मनुष्य आणि पक्ष्यामधला संवाद माऊलीनी रेखाटला आहे.

मनुष्य मृत झाल्यानंतर मोक्षासाठी धडपडत असतो आणि हाच मोक्षाचा आणि स्वर्गाचा दरवाजा या आत्म्यासाठी खुला करून देण्यासाठी कावळा मदत करतो. मृत्यूनंतर आत्मा कशाचंही भक्षण करू शकत नाही त्यामुळे त्या मनुष्य प्राण्याचं प्रतीक मानून हा पिंडदान विधी केला जातो आणि यामुळे मृत आत्म्यास गती मिळते.

हिंदू धर्म संस्कृतीअनुसार मनुष्याच्या मृत्यूनंतर पुढील तेरा दिवस अन्नासाठी चूल पेटवली जात नाही. यामुळेच कावळ्याला तांदळाच्या पिठाचा दुधात भिजवलेला गोळा पिंड म्हणून भरवला जातो. खरं तर या दिवसात चूल पेटवायची नसल्यामुळे रात्री तांदूळ दुधात भिजवून गव्हाच्या पिठात कालवून त्याचा गोळा केला जातो आणि याच गोळ्याला पिंड मानलं जातं. मृत्यूनंतर घरात शांती राहावी याकरता चूल पेटवली जात नाही आणि त्यामुळेच हा तांदळाच्या पिठाचा गोळा पिंड म्हणून कावळ्याला अर्पण केला जातो.

प्रत्येक मृत व्यक्तीचे श्राद्ध होईल अन् तिला सद्गती मिळेल, अशी पद्धत हिंदु धर्मात श्राद्ध करण्याच्या अधिकाराच्या संदर्भात सांगितली आहे. मुलगा (उपनयन न झालेलाही), मुलगी, नातू, पणतू, पत्नी, संपत्तीत वाटेकरी असणार्‍या मुलीचा मुलगा, सख्खा भाऊ, पुतण्या, चुलत भावाचा मुलगा, वडील, आई, सून, थोरल्या आणि धाकट्या बहिणीची मुले, मामा, सपिंड (सात पिढ्यांपर्यंतचे कुळातील कोणीही), समानोदक (सात पिढ्यांनंतरचे गोत्रातील कोणीही), शिष्य, उपाध्याय, मित्र, जावई या क्रमाने पहिला नसेल, तर दुसर्‍याने श्राद्ध करावे. एखाद्या मृत व्यक्तीचे कोणीही नसल्यास तिचे श्राद्ध करण्याचे कर्तव्य राजाचे असते, असेही धर्मात सांगितले आहे.

यावरून हे लक्षात येते की, श्राद्धविधी अमुक एक व्यक्ती करू शकत नाही; म्हणून केला नाही, असे कोणालाही म्हणायची संधी हिंदु धर्म देत नाही ! हिंदु धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, जो प्रत्येक व्यक्तीची तिच्या मृत्यूनंतरही काळजी घेतो !*|| पिंडी ते ब्रह्मांडी ||*

यावरून हे लक्षात येते की, श्राद्धविधी अमुक एक व्यक्ती करू शकत नाही; म्हणून केला नाही, असे कोणालाही म्हणायची संधी हिंदु धर्म देत नाही ! हिंदु धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, जो प्रत्येक व्यक्तीची तिच्या मृत्यूनंतरही काळजी घेतो !

संंकलक -पं वेणुगोपाल जिल्ला पंतुलू

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Senior Citizens !!

 “ SENIOR CITIZENS'”   *𝑴𝑰𝑵𝑰𝑴𝑰𝒁𝑬:*   1. 𝑺𝒂𝒍𝒕.   2. 𝑺𝒖𝒈𝒂𝒓.   3. 𝑩𝒍𝒆𝒂𝒄𝒉𝒆𝒅 𝒇𝒍𝒐𝒖𝒓.   4. 𝑫𝒂𝒊𝒓𝒚 𝒑𝒓𝒐𝒅𝒖...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!