एकदा ग्वाल्हेर येथील गोपालाचार्यांचे एक शिष्य प.प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे दर्शनास आले .एक रात्री महाराज एकटे असता त्यांनी विचारले , " महाराज ! आपण संयासाश्रमी असता मूर्ती पूजा का करता ? "याचा शास्त्राधार कुठे आहे ?आपण गायत्री जप करतो पण मूर्तीपूजेवर आपला बिलकुल विश्वास नाही ! ". त्यावर महाराज म्हणाले , " शास्त्रीबुवा ! निर्गुण उपासनेचा अधिकार आहे ज्याने मिळविला त्याने सगुण उपासना केलीच पाहिजे असे नाही . आपल्या अधिकार मोठा असल्याने आपणाला मूर्तीपूजा करण्याची कारण नाही . पण ही मूर्तीच आम्हाला सोडून जात नाही .मग आम्ही पूजा करावी की नाही ते आता तुम्हीच सांगा. ".त्यावर शास्त्रीबुवा म्हणाले , " आपणच मूर्तीला सोडून द्या म्हणजे झाले ." त्यावर , " बरे तसे करू " असे म्हणून महाराजांनी समारोप केला. पुढे एके दिवशी महाराज शास्त्रीबुवांना घेऊन गंगेवर गेले व बरोबर नेलेली दत्तमूर्ती गंगेच्या प्रवाहात ठेवून ते तीरावर आले. इतक्यात चमत्कार असा दिसून आला की , जल्प्रवाहात समर्पण केलेली ती अंगुष्टप्रमाण मूर्ती महाराजांचे समोर येऊन तयार ! हे पाहिल्याबरोबर शास्त्रीबुवांचा निर्गुनोपासनेबधल असलेला अहंकार लयला जाऊन ते सगुणोपासना करू लागले.
मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts
- nirupamalekhika.blogspot.com
- I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Today’s tip!! Third Person !!
When we were in school we had learnt in grammar Hindi English or in Sanskrit about the third person. That is he she or it are third persons....
Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!
-
वर्णनामार्थ सन्धानां रसानां छंद सामपि मंगला नाम कर्तारौ वनडे वाणी विनायकौ भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वास रुचिनौ याभ्यां विना न पश्...
-
*अलक* => *अति लघु कथा* अलक..१. आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ ...
-
गंगा सिंधु सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू ,महेन्द्र तनया चर्मण्वती वेदिका क्षिप्रा वैत्रवती महासुरनदि ख्याता जया गंडकी पूर...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें