मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

गुरुवार, 27 फ़रवरी 2025

Laughter !! Marathi !!

 बँकेकडून लोन SANCTION झालं. मॅनेजरनं डीडी हातात धरून माझ्यापुढं हात केला..

.मी कृतज्ञतेनं त्यांना मराठीत म्हटलं : “मी तुमचे ऋण कधीच फेडू शकणार नाही.”

.मॅनेजरने डीडी परत ड्रॉवरमध्ये ठेवला.

*मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!* 

मराठी कॉफ़ी फेस्ट..

कळवलेलं कळलं हे`

कळवलेल्याला कळवलं

की कळवलेलं कळलं

हे कळवलेल्याला कळेल.

न कळलेलं कळण्यासाठी कळवलेल्याला कळवले की कळवलेल्याला कळलेलं न कळलेल्याला कळेल.`कळलं तर कळवा.....

`मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

*पु.ल. - ' व्हता ' बरोबर की 'होता '?*

*श्रोता - अर्थात 'होता', 'व्हता' चूक.*

*पु.ल. - 'व्हता' चूक तर 'नव्हता' कुठून आलं?* 

          *असो, एवढं सोपं नाही ते...* 

 *मराठी  दिनाच्या शुभेच्छा* 

*आज मराठी भाषा दिन निमित्ताने*

ळळळळळळळळळळ*

*'ळ'* हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी...!!!

आणि 

म्हणूनच ह्या भाषेच्या समृद्धतेचा आम्हाला गर्व आहे!

*'ळ' अक्षर नसेल तर?*

*पळणार कसे...*

*वळणार कसे...*

*दुसर्‍यावर जळणार कसे!*

भजी तळणार कशी?*

*सौंदर्यावर भाळणार कसे?*

पोरं-टोरं तळयात-मळ्यात खेळणार कशी..?*

*तीळगूळ कसा खाणार?*

*टाळे कसे लावणार ?*

*बाळाला वाळे कसे घालणार....!*

*खुळखुळा कसा देणार?*

*घड्याळ नाही तर  सकाळी डोळे कसे उघडणार ?*

*घड्याळ बंद पडले तर पळ कोण मोजणार?*

*वेळ पाळणार कशी ?*

*मने जुळणार कशी ?*

खिळे कोण ठोकणार ?*

*तळे भरणार कसे ?*

नदी सागरला मिळणार कशी........!!*

*मनातली जखम भळाभळा वाहणार कशी?*

हिवाळा, उन्हाळा, पावसाळा....*

*नाही उन्हाच्या झळा*

*नाही त्या निळ्या*

*आभाळातून पागोळ्या खळाखळा....*!

*कळी कशी खुलणार ?*

*गालाला खळी कशी पडणार ?*

*फळा, शाळा मैत्रिणींच्या  गळ्यात गळा....*

*सगळे सारखे, कोण निराळा?*

*दिवाळी, होळी सणाचे काय......?*

*कडबोळी,पुरणपोळी  ओवाळणी पण नाही ?*

*तुम्ही काय चिंचपोकळीला रहाता ?*

*भोळा सांब ,*

*सावळा श्याम*

*जपमाळ नसेल तर  कुठून रामनाम ?*

*मातीची ढेकळे नांगरणार कोण?*

*ढवळे पवळे बैल जोततील कोण?*

*पन्हाळ्याची थंड हवा खाणार कोण ?*

*निळे आकाश, पिवळा चाफा...*

*माळ्याच्या कष्टाने फळा फुलांनी बहरलेला मळा !*

नारळ, केळ, जांभूळ, आवळा,*

*नवर्‍याला बावळट बोलणार कसे*

काळा कावळा,  पांढरा बगळा*

*ओवळ्या बकुळीचा गजरा माळावा कसा*

*अळी मिळी गुपचिळी, बसेल कशी दांतखिळी?*

*नाही भेळ,*

*नाही मिसळ,*

*नाही जळजळ*

*नाही मळमळ*

*नाही तारुण्याची सळसळ*

*पोळ्या लाटल्या जाणार नाहीत.....*

*टाळ्या आता वाजणार नाहीत.....!*

*जुळी तीळी होणार नाहीत.......!!*

बाळंतविडे बनणार नाहीत......!!*

*तळमळ कळकळ वाटणार नाही....!!*

*काळजी कसलीच उरणार नाही...!!!*

*पाठबळ कुणाचे मिळणार नाही*

*सगळेच बळ निघून जाईल,*

*काळ आला होता पण वेळ आली नव्हती*

*पण काहीच कळेनासे होईल 'ळ' शिवाय !*


 *फूल्ल* घेतली आहेस ना मग संपव ती"

"नको जाणार नाही आई"

"मग *क्वाँर्टर* तरी घे"

मी डोकाऊन आश्चर्याने पाहिले.एका *इंग्लिश मिडियमच्या* मुलाला त्याची आई चतकोर पोळी तरी खा असा आग्रह करत होती.

अशा सर्व *मम्यांना* मराठी भाषादिनाच्या हार्दिक शुभेच्छा   

आपल्या घरी आलेल्या मैत्रिणींसमोर, 

रूबाबाने आपल्याला इंग्लिश 

बोलता येते हे 

दाखविण्यासाठी सुनिल ने

घरच्या कुत्र्याला बिस्कीट दिले 

आणि म्हणाला,

टेक… टॉमी, टेक'.._


आणि *टॉमी जाऊन भिंतीला टेकला.*

    टॉमील मराठी भाषेचा अभिमान होता..*”मराठी भाषा दिना”* च्या हार्दिक शुभेच्छा

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller (128) Apradh !!

They reached at the platform on time and caught the train. Somesh Gaur came to see them off. After coming back Delhi they didn’t get time ev...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!