मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

बुधवार, 18 फ़रवरी 2026

Limited Edition !! ( Marathi)

 सध्या वय ६० +/- वर्षे असलेल्या सर्व लोकांना देवानं खूप काही भरभरून दिलं आहे. 

आपल्या पिढीला विधात्याचे विशेष आशीर्वाद प्राप्त आहेत..*

आपण कधी जीव खाऊन पळत शाळेतून क्लासेसना गेलो नाही.

शाळा सुटल्यावर छान रमत गमत, खेळत घरी गेलो आहोत..

आपण आपल्या खर्‍या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो - नेट फ्रेंड्स सोबत नाही.

तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे आपल्यासाठी सेफ होते - आपल्याला कधी बिसलेरी घ्यवी लागली नाही..

आपण चार जणांत एकाच ग्लासातून उसाचा रस प्यायलो - पण आजारी नाही पडलो..

आपण रोज पोटभर भात खाऊनही कधी जाड, स्थुल नाही झालो..

आपण कितीदा अनवाणी फिरलो - तरी कधी पायांना दुखापत झाली नाही..

आपल्याला निरोगी राहण्यासाठी कधी कॅल्शिअम घ्यावे लागले नाही..

आपली खेळणी आपणच बनवली - दोन रिकाम्या काडेपेट्या सुध्दा आपल्यासाठी गाडी, फोन किंवा पिस्तूल बनायच्या..

आपला भरपुर वेळ आपल्या पालकांसोबत आनंदाने गेला..

आपल्या जवळ मोबाइल, फेसबुक फ्रेंड, काँप्युटर, इंटरनेट वगैरे नव्हते - कारण आपल्या जवळ खरेखुरे मित्र-मैत्रिणी होते..

आपण मित्रमैत्रिणींच्या घरी कधीही जायचो, खेळायचो, तिथेच जेवायचोही - आपण कधी फोन करुन येऊ का म्हणून विचारले नाही..

आपण एक अद्भुत रसायन आहोत. कारण आपणच आहोत एक अशी पिढी, ज्यांनी आपल्या पालकांच्या आज्ञा पाळल्या आणि तरी खूप मस्तीही केली...

आपण भले स्पेशल नसु पण 'लिमिटेड एडिशन' तर नक्कीच आहोत..!!!

आपली एकच पिढी अशी आहे, ज्यांनी कमी श्रीमंतीत बालपणाचा मनमुराद आस्वाद घेतला, खरे तारूण्य अनुभवले - आणि आता उतार वयात आधुनिक विज्ञानाचाही आनंद घेत आहोत ...

आपणच फक्त "कमतरतेतली गंमत आणि मुबलकतेतली जंमत" अनुभवली..

आणि शेवटी.....

आठवतंय का....आपण 'मदर्स, फादर्स डे' कधी साजरा केल्याचं ??

नाही........ना ?

*कारण आई वडीलच आपलं जग होतं....*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller (256) Apradh !!

Next day Somesh Gaur went to Brajesh Shukla’s  house , it was luckily closing day if the market . The whole family was at home. Brajesh Shuk...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!