मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

शनिवार, 7 मार्च 2026

Laughter !! ( Marathi )

1. *आजकाल टिव्ही वर एवढे देवांचे प्रोग्रॅम लागत आहेत की रात्री झोपताना टीव्हीकडे पाय करून झोपायला पण भीती वाटते, पाप लागेल की काय?*

2.*हरवलेलं प्रेम एक वेळा परत मिळेल पण गाडी पुसायचा फडका कधीच परत मिळणार नाही. फडकी चोर साले*

3.*मोबाईल वापराचा आता इतका अतिरेक झालाय, परवा  शेजारी बसलेला एक जण पेपरमधील चित्र बघता बघता अचानक २ बोटांनी झूम करायचा प्रयत्न करायला लागला होता*

4.*आमच्याकडे एक कामगार  आहे त्याच्या कामात चूक काढली की त्याचे नेहमीचे वाक्य, “साहेब लय बारीक बघितलं की बाईला पण मिशा दिसत्यात”*

5.*बायका फार नशीबवान असतात कारण*

*त्यांना बायका नसतात*

6.*हे एक गोष्ट खरी आहे हा… जगात सर्व माणसांची वेगवेगळी नावे आहेत पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो, “ए* *माकडा” तेव्हा १५ पैकी १२ जण तरी मागे वळून पाहणारच*

7.*बाबा : आजपर्यंत तु असं काही काम केलंस का ज्याने माझी मान वर होईल?*

*मुलगा : एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच?*

8.*लहान असताना झोपेत हसलो की आई म्हणायची सटवाई खेळवते आणि आता हसलो तर बायको म्हणते कोणती सटवी खेळवते*

9.*मुलगी : तुझी आठवण येतेय*

*मुलगा : अजून पगार झाला नाही*

*मुलगी : अच्छा चल बाय  नंतर बोलू*

10.*तुमचा बेस्ट फ्रेंड जर चुकिच्या मुलीच्या प्रेमात पडला असेल तर त्याला अडवू नका*

*कारण अक्कल बदाम खाल्ल्याने नाही धोका खाल्याने येते*

11.*त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या. ज्या सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या*

*– सर आज तुम्ही गृहपाठ चेक करणार होता ना?*

12.*काय दिवस आलेत… चौथी पाचवीची पोरं प्रेमाच्या गप्पा मारतायंत..*

*आणि तरुण पोर pokemon पकडत फिरतायंत*

13.*समस्त स्त्री जातीला पडलेला एक गहन प्रश्न – पुरुष तर कधीच उपवास करत नाहीत तरीही त्यांना आपल्या सारख्या चांगल्या बायका कशा मिळतात??*

14.*सर्वच आईवडिलांचा सर्वात सुंदर डायलॉग – डोकं तर खूप आहे त्याला पण तो अभ्यासच करत नाही*

15.*ज्यांचे पुण्य अपार असते … त्यांच्या बायकोचे माहेर किमान 500 किलोमीटर दूर असते*

16.*लग्नाच्या वरातीत कितीही नाचणारे तीस मार खान येउद्यात*

*हवा फक्त त्याचीच होते जो झोपून नागीण डान्स करतो.*

27.*भारत सरकारचा नवीन नियम*

*ज्यांचा मोबाईल कँमेरा २ मेगा पिक्सेल आहे अशांना दारिद्र* *रेषेखालील घोषित करण्यात येईल*

18.*तुम्हाला माहित आहे काय पॉपकॉर्न कढईत ठेवल्यावर उड्या का मारतात?*

*स्वतः गरम कढईत बसून पहा, मग आपोआप समजेल*

19.*बायकांना खुश ठेवणे खूप मुश्किल आहे*

*पुरुषांचे काय…. बायका दिसल्या की खुश होतात*

20.*व्यायाम करणे,  ह्याने तुमच्या आयुष्यात काही वर्ष नक्की वाढतील*

*पण लक्षात ठेवा की ही वर्षे तुमच्या* *म्हातारपणातली वाढणार आहेत, तरुणपणातली नव्हे*

21.*बासुंदीचा फुल फॉर्म सापडला : बाई सुंदर दिसते*

22.*ATM मधून २०० रुपये निघताना इतका आवाज होतो की असं वाटतं की चुकून ४-५ हजार निघतात की काय…*

23.*चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देवमाणूस* *आणि जो कधी चुकतच* 

 *नाही तो बायकोच्या माहेरचा माणूस*


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik upanyas Bhoot-Adbhut !! (3)

Whenever  Chandan Singh visited the village riding on his white horse, people of the village and surrounding villages, respected him bowling...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!