मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

मंगलवार, 5 सितंबर 2017

Aamhi Doghe !! { Marathi Kavita By Unknown }

आम्ही दोघे
मुलगी आमची युरोपात असते
आणि मुलगा यूएस मध्ये असतो
इथे मात्र आम्ही दोघेच असतो
जावई आॅफिसात राब राब राबतो
सुनेचा ही कामाने पिट्टया पडतो
मदतीला या मदतीला या
दोघांचाही आग्रह असतो
चतुराईने टाळतो कारण
इथे मात्र आम्ही एन्जाॅय करत असतो !
हिच्या खूप हाॅबीज आहेत
दुपारचा वेळ तिचा तिकडे जातो
मला कसलीच आवड नाही
मी राहिलेल्या झोपा पूर्ण करून धेतो..
कारण आम्ही दोघेच असतो !
संध्याकाळी आम्ही सिनेमाला जातो
येताना बाहेरच जेवून येतो
बिल्डिंगमागे सूर्य डुबतो
मग आम्ही वाईनचे ग्लासेस काढतो
कारण आम्ही दोघेच असतो !
एकदा मुलाचा फोन येतो
एकदा मुलीचा फोन येतो
वेळ नाही अशी तक्रार करतात
आमचाही उर भरून येतो
तुम्हीही नंतर एन्जाॅय कराल
असा त्यांना धीर देतो
कारण आम्ही दोघेच असतो !
नव्या नवलाईन जाऊनही आलो
स्वच्छ सुंदर सगळं पाहूनही आलो
इकडचं - तिकडचं
दोन्ही जगं एन्जाॅय करतो
कारण आम्ही दोघेच असतो !
नाही जबाबदारी नाही कसलीच इथे
आणि नाही कसली तक्रार तिथे
नाही कसली अडचण सुखाची
सेकंड हनीमून एन्जॅाय करतो
कारण आम्ही दोघेच असतो !
भांडण तंटे आमचे खूप होतात
नसते तिला स्मरण नि मला आठवण
खरे तर काहीच नसते वादाचे कारण
वाद विसरून चीअर्स करतो
कारण आम्ही दोघेच असतो !
तिला चिकन बिर्याणी आवडते
ती ही ठराविकच हाॅटेलात मिळते
नेहमीच ती मिळते असे नाही
पण ती आली की मी नक्की आणतो
घरच्या स्वैपाकाची कटकट नाही
कारण आम्ही दोघेच असतो !
मरणाच्या गोष्टी आम्ही करत नाही
पार्ट्या करतो ट्रिपा काढतो
हाताशी आता पैसे आहेत
वेळ अन मित्रही भरपूर आहेत
मुलांच्यामुळे अडकायचे दिवस संपले
हे जाणून मनोमनी खूश होतो
कारण आम्ही दोघेच असतो
मुलांना हेवा वाटायला नको
त्यांच्यापासून ही मौजमस्ती लपवून ठेवतो
संगममताने तीही हसते .. साथ देऊन मीही हसतो
कारण आम्ही दोघेच असतो !
कारण आम्ही दोघेच असतो !!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavaahik crime thriller (178) Apradh !!

Nirmal stayed there just for ten minutes and then went out. He was feeling hungry so he went to the restaurant and ordered a good delicious ...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!