ळ अक्षर नसेल तर पळ वळ मळ जळ तळ
ह्या क्रिया कशा करणार ?
तीळगूळ कसा खाणार ?
टाळे कसे लावणार ?
बाळाला वाळे कसे घालनार ?
चाळे कसे करणार ?
घ डया ळ नाही तर
सकाळी डोळे कसे उघड़ण।र ?
वेळ पाळण।र कशी ?
मने जु ळ ण।र कशी ?
तळे भरणार कसे ?
नदी सागरला मिळणार कशी ?
हिवाळा उन्हाळा पावसाळा
नाही उन्हाच्या झळा
नाही पागोळ्या
कळी कशी खुलण।र ?
गालाला खळी कशी पडणार ?
फळा शाळा मैत्रिणींच्या गळ्यात गळा
सगळे सारखे कोण निराळ।?
दिवाळी होळी सण।चे काय ?
कड़बोळी पुरणपोळी ओवाळणी पण नाही ?
भोळा साम्ब सावळा श्याम
जपमाळ नसेल तर कुठून रामनाम ?
मातीची ढेकळे नांगरनार कोण
ढवळे पवळे बैल जोततील कोण
निळे आकाश , पिवळ। चाफा
फळा फुलानी बहरलेला
नारळ केळ जाम्बूळ आँवळ।
काळ। कावळा पांढरा बगळा
ओवळी बकुळी वासाची फुले
गजरा माळणे होईल पारखे
अळी मिळी गूप चीळी
बसेल कशी दांतखिळी
नाही भेळ नाही मिसळ
नाही जळजळ नाही मळमळ
पोळ्या लाटल्या जाणार नाहीत
टाळ्या आता वजनार नाहीत
जुळी तीळी होणार नाहीत
बाळन्तविडे बनणार नाहीत
तळमळ कळकळ वाटण।र नाही
का ळ जी कसलीच उरण।र नाही
पाठबळ कुणाचे मिळण।र नाही
सगळेच बळ निघून जाईल
आणि काहीच कळेनासे होईल 'ळ' शिवाय !
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें