मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

मंगलवार, 30 जनवरी 2018

Konkanasth & Deshsth !! ( MARATHI )

कोकणस्थांची कविता

मी आहे ब्राह्मण कोकणस्थ
आम्ही कधीच बसत नाही स्वस्थ

रीतीरीवाजांमध्ये आमचा नंबर आहे
आमचीच पालखी प्रत्येक जण वाहे
बचतीचा मार्गच आम्हा डोहे
आम्ही कधीच नसतो अस्ताव्यस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!१!!



वंशपरंपरा आम्ही दांडीवर कपडे टाकतो
पण त्याचा क्रम कधीच बदलत नसतो
बदलला तर आम्ही लगेच पिसाळतो
दुस-या जातीची सून आली तर होतो त्रस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!2!!



एका काडीनेच गॅस पेटवितो
लगेच दुस-या गॅससाठी विझवून ठेवितो
वरण-भाताशिवाय आम्ही जेवत नसतो
त्यानेच जेवण होते मस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!3!!



लोकमान्य आमच्यातच जन्माला आले
सर्व क्रांतिकारक आमचेच झाले
स्त्रियांना अण्णासाहेबांनीच उद्धरले
साधू न होता राहावे नेहमी व्यस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!4!!



दादासाहेब फाळक्यांनी चित्रपटसृष्टीचा पाया घातला
राजा परांजपे यांनी देशभर पसरविला
माधुरीने त्यावर कळस चढविला
असे क्षेत्र नाही जेथे पोहोचत नाही अमुचा हस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!5!!



भांडणात आम्ही कमी नाही
तत्वांसाठी आमचे आयुष्य जाई
वाट्यांमध्ये झाडूची सुद्धा विभागणी होई
त्यासाठी आम्ही होत नाही त्रस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!६!!



लाचारी करून होत नाही दीन
व्यवहार करताना नडतो अभिमान
नेहमी असते आमची ताठ मान
खर्चावर असते आमची गस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!७!!



गॅस सिलेंडर वर तारीख लिहितो
आधी संपला तर उपास घडतो
तोच आमचा एकादशीचा दिवस असतो
उपासाचे कधीच खात नाही जास्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!८!!



महिन्याची पेपर रद्दी लावलेली असते
वाण्याला तागडीची गरजच नसते
त्याच पैशातून भिशी चालत असते
पै पैसा करून आम्ही घेतो खस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!९!!



चोव्वीस कॅरेट शिवाय सोने नाही घेत
पेठे-गाडगीळांशिवाय दुसरे दुकान नाही पाहत
दागिन्यांत आमची असते सर्वांवर मात
आता नाही वापरत तांबे-पितळ-जस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!१०!

 काय बरोबर ना ?

आम्ही देशस्थ
जग जरी म्हणत असले कितीही बेशिस्त
तरी देखील अभिमानी ..आम्ही देशस्थ

नसतो कधी जेवणाला वेळ अथवा नियम
अतिथीच्या तृप्तीसाठी राखुन असतो संयम
व्यवहारापेक्षा माणुसकीला असतो व्रतस्थ
मी आहे ब्राह्मण देशस्थ

निर्जीव कपडे जरी घरात कुठेही पडलेले
कपड्यांपेक्षा नातेबंध असतात सांभाळलेले
गदारोळात नात्यांच्या जरी होतो त्रस्त
मी आहे ब्राह्मण देशस्थ

चहा झाला असेल ना? असे विचारत नाही
चहासाठी आलेला जेवण करूनच जाई
अघळ पघळ गप्पांमधे नेहमी आम्ही व्यस्त
मी आहे ब्राह्मण देशस्थ

ज्वारी झाली महाग तरी भाकरी चुकत नाही
वरणभातावर भागवण्याची आमची परंपरा नाही
चटण्या भाज्या असल्यावरच जेवण लागते मस्त
मी आहे ब्राह्मण देशस्थ

लग्न कार्य असतो आमचा महीनाभरचा खेळ
नसते कुठले बजेट ,ना हिशोब , ताळ मेळ
उसने देता घेता नसते काळजी  किंवा खंत
मी आहे ब्राह्मण देशस्थ

ग्यास जरी संपला तरी उपाशी रहात नाही
अडचणीला देशस्थाचाच शेजार धाउन येई
वसुधैव कुटुंबावर असते नेहमीच भीस्त
मी आहे ब्राह्मण देशस्थ

"आला सण की घाल पुरण" अशी आमची रीत
पोळीवरती डावभर तूप .,,आम्ही नाही भीत!
हौसे पुढे कुठे असते महाग आणी स्वस्त?
मी आहे ब्राह्मण देशस्थ

सोने कसले घेता? जपतो सोन्यासारखे क्षण
पैसा प्रतीष्ठेपेक्षा  मोलाचे समोरच्याचे मन
अंत्ययात्रेची गर्दी सांगे..आम्ही किती श्रीमंत!
मी आहे ब्राह्मण देशस्थ

गदिमांच्या शब्दांसाठी फडक्यांच्या चाली
चितळ्यांना मोठं करते देशस्थाचीच थाळी
आमची इन्फोसीस सांभाळते किती कोकणस्थ!
मी आहे ब्राह्मण देशस्थ

ऋषी मुनींची परंपरा रक्तामधे खेळते
आर्यधर्माचे बाळकडू गर्भामधेच मिळते
देशस्थातच जन्मा येती किती संत महंत!
मी आहे ब्राह्मण देशस्थ

भाषा आमची माउलींची जणू इंद्रायणी
भक्ती प्याली नाथाघरच्या हौदामधले पाणी
ठामपणा शिकवत राही ..रामदासांचे ग्रंथ
मी आहे ब्राह्मण देशस्थ

क्रांतीकारक काय फक्त कोकणात जन्मा येतात?
फासावरले राजगुरू .काय तुमचे काका लागतात?
नथुरामाचे रामायण ...काय सांगू जास्त?
मी आहे ब्राह्मण देशस्थ

कर्वे जसे मोठे तसे... आमटेही महान!
माधूरीला झाकोळेल..  गंधर्वांची शान!
तरी देखील माजवत नाही  कुठले आम्ही प्रस्थ
मी आहे ब्राह्मण देशस्थ

वसिष्ठांच्या छाटीला तर सूर्याइतकी दिप्ती
कमंडलूत समुद्र त्यांच्या धरणी कुबडीवरती
सागराचे प्राशन करी आमच्यातला अगस्त्य

मी आहे ब्राह्मण देशस्थ
मी आहे ब्राह्मण देशस्थ

तरी आम्हीं सर्व एकच आहोत
असो आम्ही कोकणस्थ किंवा देशस्थ आमचा परिचय होतो ब्राम्हण म्हणूनच
जय परशुराम

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller ( 206)

Dehradoon ‘s Dayal Singh’s jewellery shop was suspicious for many days but tere was no proof but now Raghavan got the Witness and so he sent...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!