*#१*
तीसेक वर्षापूर्वी भांडणातून आईवडिलांनी आणि भावांनी त्याला नेसत्या वस्त्रानिशी बाहेर काढले. एकदिड वर्षात त्याचा जम बसल्यावर, घडलेले मागे टाकत, तो पेढे घेऊन घरी गेला. सर्वांना धक्का होता तो. दारालगतच्या खुर्चीवर बसला होता. त्यानंतर दर महिन्यात, एक तारखेला कोणीही न बोलावता तो पेढे घेऊन जायचा.
आज त्याचा विशीतला मुलगा बरोबर होता..निघताना एवढंच म्हणाला " नात्यांचे EMI भरायला त्याला घेऊन आलोय.."
*#२*
निरोप समारंभाच्या कार्यक्रमात तिने सर्वात प्रथम मोठ्या जावेचे आभार मानले. त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर तिने निर्धास्तपणे नोकरी केली होती. निवृत्तीनंतर दोघी जावा जग फिरायला जाणार होत्या. जावेने खर्चाचा आकडा विचारल्यावर ही हळूच म्हणाली, " कसला खर्च वहिनी? नात्याचा EMI भरते आहे!!"
*#३*
सुलू मावशी वय झाले म्हणून काम सोडतायत, हे समजल्यावर चैतन्यला वाईट वाटले. परदेशातून त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. त्याने आठवण ठेवली याचा सुलू मावशींना आनंद झाला..खरा आनंद तर एक तारखेला झाला जेव्हा पगाराइतकी रक्कम त्याने मावशींच्या खात्यात जमा केलेली समजली. " मावशी, पेन्शन सुरू झाली..निवांत रहा" असे ऐकताच त्यांचे डोळे झरू लागले.. "मावशी, आईबाबा नोकरीला गेल्यावर मला कधी एकटं पडू दिले नाहीत, अमाप प्रेम केलंत त्याचा EMI भरतोय असे समजा.." मावशींना EMI कळले नाही पण मुलगा चांगला निघाल्याचा अभिमान मात्र वाटला..
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें