मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

सोमवार, 12 फ़रवरी 2024

Dharm & Darshan !! Alipt ( Marathi)


*अलिप्त*

*जमलं तर ठीक, नुकसान मात्र नाही...*

*अलिप्त होणे, Disconnect with somebody..... धक्का बसला ना , पण खरं आहे..... पटणार  नाही काहींना, आयुष्यात वेळ आली की Detach होणंच  योग्य........*


*असं म्हणतात, साठी नंतर ही प्रक्रिया सुरु करावी. अलिप्त म्हणजे*    *separation नाही, aloof नाही, कुठलीही गोष्ट मनाला लावून न घेणे..... ज्या गोष्टी जशा आहेत, त्याचा स्वीकार करणे, खोटी आशा बाळगू नये......*


*एक लक्षात असावे, माणसाचा स्वभाव बदलत नाही, स्वभावाला औषध नाही, खरं आहे..... त्याचा मोठया मनाने स्वीकार करावा, ते बदलण्याचा प्रयत्न पण करू नये......*

 

*Detach....*

*मुलगा /मुलगी परदेशी आहेत.... हो.. त्यांची सारखी भेट होणार नाही, प्रत्यक्ष होणं शक्य नाही, हे मनाला सांगणे..... अलिप्त......*

 

*आपली स्थावार जंगम Property, खूप  कष्टाने उभी केलेली, मान्य..... पण आता उपभोग घेण्याची शक्ती नाही, आसक्ती नाही, त्यावर शांतपणे विचार करून निर्णय घेणे....Disconnect*


*आपल्या घरामध्ये खूप वस्तू असतात, कधी Marketing tricks मुळे तर कधी पत्नीचा, मुलांचा आग्रह... खरं सांगा अशा कित्येक वस्तू आपल्या घरात असतात, खरं आहे ना.... आपण वापरत  नाही पण जपून ठेवतो, May be emotional attachment.....भांडी असंख्य, Dinner sets, काचेचे वेगवेगळे glasses, Mugs, अगणित वाट्या, पेले इत्यादी....*

 

*कल्पना करा, लग्नानंतर छोट्या घरात संसार झाला ना, आता घर मोठं आहे, खूप साधने आहेत, पण माणसं दोन... काय करायचं... अशा वेळी Detach होणंच महत्वाचं....*

 

*हे झालं निर्जिव वस्तूंबद्दल.. आता सजीव माणसं चेक करू या.......*

 

*काही वर्षांपूर्वी कोणाच्याही आयुष्यात आपण डोकावणे, स्वाभाविक होतं, कारण व्यक्ती वेगळ्या होत्या, सगळं स्वच्छ मोकळ्या आकाशासारखं होतं.... आज परिस्थिती बदलली आहे मित्रांनो, विचार share होत नाही, कोणी सल्ला मागत नाही, काही न पटणाऱ्या गोष्टी विचारता येत नाही.... Detach....*


*रिक्त होण्यात सुख आहे मित्रांनो, दुःखाला delete करायला यायला पाहिजे, खूप कठीण आहे मान्य, मग पूढे नाही जाऊ शकत .......*

 

*अशा वेळी कृष्णाचे चिंतन करावे... त्याने कधीही मागे वळून बघितलं नाही.... कधी वाटलं नसेल का कृष्णाला की देवकीला घट्ट मिठी मारावी आणि चार क्षण तिच्या कुशीत घालवावे... कधी गोकुळात जाऊन गोपिकांच्या घागरी फोडाव्या, मनसोक्त बासरीच्या मंद आवाजात सगळं विसरून जावं........ मान्य आहे, कृष्ण परम परमेश्वर होता... आपण कृष्ण होऊ शकत नाही.. अशक्य... आयुष्यात जर कधी अलिप्त व्हायचं असेल तर कृष्ण आठवा.... तो स्फूर्ती देईल........*

 

*मुलं लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात रमतात... काय गैर आहे, काही नाही, ते जर त्यांचे कर्तव्य पार पाडीत असतील तर तक्रारीला जागा नसावी.... पण माझं ऐकावं हा हट्ट बरा नाही... निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकाची वेगळी असते, मान्य, पण जबरदस्ती नको..... लागू द्या एखादी ठेच... शिकेल मुलगा/मुलगी...*


*लहानपणी आई म्हणायची, तुला कळणार नाही आता, एकदा बाप झालास की कळेल..... इतक्या साध्या भाषेत एवढं मोठं तत्वज्ञान आईच सांगू शकते..... अलिप्त होण्यात सुख आहे.... पाऊस पडल्यानंतर नीरभ्र आकाशासारखं मन स्वच्छ होईल.*

 

*वाईट भावना, वाईट विचार कोलमडून जातील आणि स्वछंद आनंदाचा अनुभव प्राप्त होईल... मनात प्रेम, सहानुभूती नक्कीच राहील, पण गुंतणे नाही....*

 

*जिथे व्यक्ती गुंतते, तिथे राग, लोभ येणार.... हे मळभ दूर झाले की सर्व छान, स्वच्छ, निर्मळ........*..


*बघा प्रयत्न करून,जमलं तर ठीक....*

*नुकसान मात्र नाही.*                                    

                                                       

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Amazing !!

 *Wonderful facts of the life!* *If a cat crosses the road it is said to be bad omen. But most accidents take place when dogs cross the road...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!