नवरा बायकोचं भांडण होतं,
मग न जेवताच दोघे ऑफिस ला जातात.
कधी नव्हे ते बायको पुढाकार घेऊन व्हाट्सअप चॅटिंग करते;
बायको:- "sorry"
नवरा:- ठीक आहे
बायको:- jevalas ka ?
नवरा : जेवतो.
बायको :- "Mi Hatti ahe ka re , tula kay vattay"
नवरा :- "नाही गं, थोड आहारावर नियंत्रण कर बस, आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊन डायट प्लॅन घेऊ. उगाच स्वतःला हत्ती म्हणून घेऊ नकोस, एवढी पण जाड नाहीस तू."
बायको:- "हत्ती नाही, "मी हट्टी आहे का रे" असं विचारलं, माकडतोंड्या थांब बघतेच घरी आल्यावर .........."
मराठी शब्द मराठीतच *टाईप* करा.
*पु.ल. - ' व्हता ' बरोबर की 'होता '?*
*श्रोता - अर्थात 'होता', 'व्हता' चूक.*
*पु.ल. - 'व्हता' चूक तर 'नव्हता' कुठून आलं?*
*असो, एवढं सोपं नाही ते...*
*गोड गावरान मराठी*
*"मीबी गेलतो"* हे कोणत्याही आफ्रिकन महिलेचे नाव नाही
*हे नगरला गेल्यावर कळेल !*
*"उबाका बस्की"* हे कुठल्याही रशियन माणसाचे नाव नाही,
*हे सांगलीत गेल्यावर कळेल !*
*"शायना झालाकाबे"* हे कुठल्या जर्मन बाईचे नाव नाही,
*हे नागपूरला गेल्यावर कळतं!*
*"अस्का कराईलीस"* हे कुठल्याही ग्रीक माणसाचे नाव नाही,
*हे कोल्हापूरात गेल्यावर कळेल !*
*"च्यापी फुकून"* हे कुठल्याही जपानी मुलीचे नाव नाही,
*हे आपल्याला लातुरला गेल्यावर कळतं!*
आणि *'गो बाय बस'* हे इंग्लिश वाक्य नाही,
*हे मालवणला गेल्यावरच कळेल!*
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे *'यु का मी'* चीनी माणसाचं नांव नाही *हे खान्देशात (जळगाव, धुळयाला) गेल्यावर कळेल!*
*बँकेकडून लोन SANCTION झालं. मॅनेजरनं डीडी हातात धरून माझ्यापुढं हात केला..*
.
.
*मी कृतज्ञतेनं त्यांना मराठीत म्हटलं : _“मी तुमचे ऋण कधीच फेडू शकणार नाही.”_*
.
.
*मॅनेजरने डीडी परत ड्रॉवरमध्ये ठेवला.*
*विलक्षण श्रीमंत मराठी भाषा*......
*रस्ता - मार्ग*
* जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.
* जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.
*खरं - सत्य*
* बोलणं खरं असतं.
* सत्याला सोबत पुरावा जोडावा लागतो.
*घसरडं - निसरडं*
* पडून झालं की घसरडं.
* सावरता येतं ते निसरडं.
*अंधार - काळोख*
* विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.
* निसर्गात जाणवतो तो काळोख.
*पडणं - धडपडणं*
* पडणं हे अनिवार्य.
* धडपडणं हे कदाचित सावरणं.
*पाहणं - बघणं*
* आपण स्वत:हून पाहतो.
* दुसऱ्यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.
*पळणं - धावणं*
* पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.
* ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.
*झाडं - वृक्ष*
* जे माणसांकडून लावलं जातं ते झाड.
* जो आधीपासूनच असतो तो वृक्ष.
*खेळणं - बागडणं*
* जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.
* जे मुक्त असतं ते बागडणं.
*ढग - मेघ*
* जे वाऱ्याने ढकलले जातात ते ढग.
* जे नक्की बरसतात ते मेघ.
*रिकामा - मोकळा*
* वेळ जो दुसऱ्याकडे असतो तो रिकामा.
* आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.
*निवांत - शांत*
*कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा.
* काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा.
*आवाज - नाद*
* जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज.
* जो घ॔टेचा होतो तो नाद.
*झोका - हिंदोळा*
* जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका.
* जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा.
*स्मित- हसणं*
* मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित.
* जे लोकां समोर दाखवावं लागतं ते हसणं.
*अतिथी - पाहुणा*
* जो यावा यावा असा वाटतो तो अतिथी.
* जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो पाहुणा.
*घोटाळा - भानगड*
* जो अचानक नकळत होतो तो घोटाळा.
* जी नियोजनबद्ध पद्धतीने होते ती भानगड.
*आभाळ- आकाश*
भरून येतं ते आभाळ.
निरभ्र असत ते आकाश.
आहे की नाही आपली अमृताशीही पैजा जिंकणारी ही मातृभाषा,अतिशय श्रीमंत!!!!
*थोडी शाब्दिक गंमत आहे…*
*" खळ खलखून हसा ,आठवले म्हणून पाठवले "*
एक वेलांटी सरकली,
पिताकडून पतीकडे आली.
एक काना सरकला,
राम ची रमा झाली.
दोन काना जोडले,
शरद ची शारदा झाली.
एक मात्रा सरकली,
खेर ची खरे झाली.
एक अक्षर घटले,
आठवले ची आठले झाली.
एक अक्षर बदलले, अन्
मालू ची शालू झाली.
कर्वे ची बर्वे झाली.
अत्रे ची छत्रे झाली.
गानू ची भानू झाली.
कानडे ची रानडे झाली.
लग्नानंतर नांवच उलटे केले,
निलिमाची मालिनी झाली.
पदोन्नती झाली,
प्रधान ची राजे झाली.
राणे ची रावराणे झाली.
देसाई ची सरदेसाई झाली.
अष्टपुत्रे ची दशपुत्रे झाली.
झुरळाला भिणारी ती,
दैवयोगाने वाघमारे झाली.
लेकराला कुरवाळीत,
पुढे लेकुरवाळी झाली.
*एक पिढी सरकली,*
*सुनेची सासू झाली !!*
आली ना मजा? काय!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें