मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

बुधवार, 17 अप्रैल 2024

Dharm & Darshan !! Seva Ani Ahankar !! {MARATHI }

 श्रीराम समर्थ

सेवा आणि अहंकार

*रावणाशी युद्धाच्या दरम्यान प्रभु श्री रामचंद्रांच्या सैन्यासाठी लागणारी रसद अन्नसामग्रीतले पीठ एकदा संपले होते.*

 *श्री राम हनुमंताला म्हणाले चित्रकूट पर्वतावर जा तिथे तुला अन्नपुर्णामाता दळण दळत असल्याचा आवाज येईल. तीच्या कडून आपल्या सैन्यासाठी पीठ घेऊन ये. हनुमंतांनी श्री रामाना विचारले,पण अन्नपुर्णामाता मला कशी काय ओळखणार ?*

*श्री राम म्हणाले ओळख म्हणून ही माझी अंगठी तीला दे आणि त्यांनी स्वतःची अंगठी हनुमंतांना दिली.*

*हनुमंत पर्वतावर पोहोचले, त्यांच्या मनात विचार आला मी जर पीठ नेले नाही तर श्री रामांच्या सैन्याची काय अवस्था होईल, शेवटी माझ्या शिवाय *प्रभु श्री रामचंद्रांचे कोणतेही काम होणे अशक्यच. हनुमंताना अहंकाराने ग्रासले.*

*एका मोठ्या गुहेतून जात्यावर दळण्याचा आवाज येत होता. त्या गुहेवर एक भली मोठी दगडाची शिळा होती. त्या गुहेसमोर जाऊन हनुमंतांनी अन्नपुर्णामातेला हाक मारली, म्हणाले माते मी प्रभु श्री रामचंद्रांचा सेवक हनुमंत, मला त्यांनी तुमच्याकडून सैन्यासाठी पीठ आणण्यासाठी पाठविले आहे. गुहेतून अन्नपुर्णामातेचा आवाज आला,*

 *हे हनुमंता !* 

*गुहेवरची शिळा बाजूला करून आत ये. हनुमंत आपल्या शेपटीने शिळा बाजूला करू लागले, शिळा काही जागची हलेना. मग दोन्ही हातांनी शिळा बाजुला करायला लागले तरी शिळा काही तसूभरही हलली नाही. मग शरीरातील सर्व शक्तीनीशी जोर लावून शिळा बाजुला करायचा प्रयत्न करू लागले, घामाघूम झाले, काही केल्या शिळा बाजुला काही सरकत नव्हती. हनुमंतांच्या मनात विचार आला मोठे मोठे पर्वत उचलण्याची शक्ती माझ्यात असून देखील हा एवढासा यत्किंचित दगड मला बाजूला करता आला नाही.* 

*शेवटी हार मानून हनुमंत म्हणाले, "माते, ही गुहेवरची शिळा काही मला बाजूला करता येत नाही."*

*अन्नपुर्णामातेने विचारले, हनुमंता तू अहंकार केलास का?*

*तर हनुमंत म्हणाले, "होय माते ! मला आता त्याचा *पश्र्चाताप होतो आहे."*

*अन्नपुर्णामाता म्हणाली, तुला पश्र्चाताप होतो आहे ना? मग आता पुन्हा एकदा शिळा बाजुला करायचा प्रयत्न कर.*

*अन्नपुर्णामातेने सांगितल्याप्रमाणे हनुमंतांनी शिळा बाजुला करायचा प्रयत्न केला, तर काय शिळा अलगद बाजूला सरकली.*

*गुहेमध्ये आत गेल्यावर हनुमंतांनी अन्नपुर्णामातेला प्रभु श्री रामचंद्रांनी दिलेली अंगठी दाखवली, अन्नपुर्णामाता म्हणाली, "त्या पलीकडे तो कोपरा आहे ना तीथे ही अंगठी टाक आणि तुला हवे तेवढे पीठ घेऊन जा.*

*हनुमंतअंगठी ठेवायला गेले, पहातात तर काय तिथे अगणित अंगठी मुद्रांचा डोंगरच जणू खच पडला होता. हे पाहून हनुमंतांनी अन्नपुर्णामातेला विचारले "माते, हा इथे अंगठी मुद्रांचा खच कसा काय ?*

*अन्नपुर्णामाता म्हणाली, "अरे हनुमंता, प्रभुंनी तुझ्यासारखे कित्येक हनुमंत कित्येकदा माझ्याकडे अंगठी घेऊन पाठविले तेव्हापासूनच्या आहेत त्या मुद्रा अंगठ्या"*

*हे ऐकल्यावर मात्र *हनुमंतांचा गर्व पुर्णपणे नाहीसा झाला.*

*सद्गुरूंची सेवा करताना कुठल्या गोष्टीचा अहंकार नसावा.*

*मी करतो म्हणून सेवा होते, हा भ्रम आहे. परमेश्वर प्रत्येक कार्यासाठी कोणा न कोणाची निवड करतो. आपण असलो नसलो तरी ते कार्य ठरलेलंच असतं व ते कोणा न कोणाच्या हातून घडतचं. त्यामुळे सेवेची जी संधी मिळाली आहे तेचं भाग्य माना व संधीचं सोनं करा. अहंकार युक्त, दिखावटी केलेली सगळी सेवा व्यर्थ आहे.*

*राम कृष्ण हरी*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharm & Darshan !! Datta Mandir , Indore !!

 यह चित्र इंदौर के प्राचीन दत्त मंदिर का है इस मंदिर से शिवाजी और उनके गुरु रामदास जी का भी संबंध रहा है। यह मंदिर संजय सेतु के नजदीक है। इं...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!