मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

शनिवार, 13 अप्रैल 2024

Laughter !Marathi

 *थोडं हसुया


 *काही अतिसुंदर(?) विचार* 


1: अंगात दम असणं चांगलं,

पण तो सारखा लागणं अत्यंत वाईट


2: तारुण्यात न घसरलेला पाय उतारवयात नक्की घसरतो...

 बाथरूममध्ये......!


3: कुणी उशिरापर्यंत झोपलेलं मी बघूच शकत नाही,

म्हणून मीच रोज उशिरा उठतो....


4:  भांडण करताना ते विकोपाला जाणार नसेल तर ते करण्यात काहीच अर्थ नाही....


5:  मराठी माणसांनी मराठीतूनच "कॉन्व्हरसेशन" केले पाहिजे....


6: स्वर्गात जायचे असेल तर आईचे पाय दाबून झोपत जा.. मग ती आई तुमची असो वा तुमच्या पोरांची..


7: काही लोक खरेदीला गेल्यावर कधीच डिस्काउंट मागत नाहीत. फक्त दुकानातून बाहेर जायची ॲक्टिंग करतात.


8: रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होत..


9:  तुम्ही कितीही महागातली सुपरफास्ट बाईक मुलांना घेऊन दिली तरी.. ती ॲक्टिवा च्या मागेच चालणार..


10: कुंडली  खरं तर सासू अन् सुनेची जुळली पाहिजे. मुलगा  बिचारा कुणाशीही adjust करून घेतो..


11: लग्नात मुलीचे मामा अन् नवरी सोबत असलेली करवली.. या दोघांच्या attitude ची बरोबरी कोणीच करू शकत नाही..


12: जिथे मारामारी करणं शक्य नाही.. तिथे टोमणे तरी मारूनच यायचं.. सोडायचं नाही अजिबात..


13: पोट आणि Ego कमी असेल तर.. माणूस कोणालाही मिठी मारू शकतो.. 


14: गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.. "तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..? 


15: जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

A famous story !!

  The love triangle and murder of passion that rocked Bombay of the sixties! It was one of the most sensational murder cases in the history ...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!