मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

सोमवार, 27 मई 2024

Dharm & Darshan !! Chamatkar !! ( Marathi)

 *त्या लहानशा मुलीने तिच्या बचत बॉक्समधून सर्व नाणी काढुन फ्रॉकच्या खिशात टाकली व शेजारच्या केमिस्टच्या दुकानाच्या पाय-या चढली.*

  *ती काउंटर समोर उभी राहिली व औषध मागु लागली. पण तिची  काउंटरपेक्षा उंची कमी असल्यामुळे तिच्याकडे केमिस्टचे लक्ष गेले नाही. काउंटर वर गर्दी होती त्यामुळे कोणाचेही लक्ष तिच्याकडे गेले नाही..* *केमिस्टचा मित्र अमेरिकेहुन आला होता त्याच्याशी बोलण्यात केमिस्ट व्यस्त होता.*

  *त्या छोट्याश्या मुलीने खिशातून एक नाणें काढून काउंटरवर आपटले. त्याचा आवाज ऐकुन सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. तिची युक्ती कामी आली.*            *केमिस्ट तिच्याकडे आला ,  कौतुकाने व प्रेमाने म्हणाला , काय पाहिजे तुला बेटा..?*

   *"मला चमत्कार पाहिजे"*

       *केमिस्टला तिचे बोलणे न कळल्याने त्याने पुन्हा विचारले.... बेटा तुला काय पाहिजे... ?*

*ती पुन्हा म्हणाली,  मला चमत्कार पाहिजे..**केमिस्ट तिला म्हणाला , बेटा इथे चमत्कार मिळत नाही...* 


*ती पुन्हा म्हणाली, इथे जर औषध मिळतं तर चमत्कार सुद्धा इथेच मिळेल..!*


         *केमिस्टने विचारले  ,  बेटा तुला हे कोणी सांगितले?*

*तेंव्हा ती छोटी मुलगी बोबड्या शब्दात म्हणाली..*


       *माझ्या भावाच्या डोक्यात ट्युमर झाला आहे. पप्पांनी आईला सांगितलं की डॉक्टरांनी चार लाख रुपये भरायला सांगितले आहेत, जर वेळेवर उपचार नाही झाले तर एखादा चमत्कारच त्याला वाचवू शकेल. माझे पप्पा रडत रडत आईला सांगत होते की, आपल्याकडे पैसे नाहीत. विकायला दागिने किंवा इस्टेट ही नाही. सर्व पैसे औषधोपचार करण्यात आधीच खर्च झालेत...*


        *त्या छोट्याश्या मुलीचे व केमिस्ट चे संभाषण ऐकून तो परदेशी पाहुणा तिच्या जवळ आला व म्हणाला, तु किती पैसे आणलेत चमत्कार घेण्यासाठी...?*


         *तिने आपली  छोटी मुठ उघडली व सर्व नाणी त्या पाहुण्याच्या हातावर ठेवली . त्याने ती मोजली. ते एकवीस रुपये पन्नास पैसे होते.* 


          *तो पाहुणा त्या निष्पाप व निरागस बालिकेकडे पाहुन हसला व म्हणाला...*

  *बेटा, तु चमत्कार विकत घेतलास....*

*चल, मला तुझ्या भावाकडे घेऊन चल..*

*तो पाहुणा ,जो आपल्या केमिस्ट मित्राला भेटायला अमेरिकेहुन आला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून न्यूयॉर्कचा प्रसिद्ध न्यूरोसर्जन* *"डॉ.जॉर्ज अँडरसन" होता.* 

  *त्या सर्जनने  मुलीच्या भावाची सर्जरी एकवीस रुपये पन्नास पैशात केली व तो मुलगा मृत्यूच्या दाढेतुन बाहेर काढला..*

   *सर्जरी झाल्यानंतर हॉस्पीटल मधुन बाहेर पडताना  डॉ.जॉर्ज ने मुलीला उचलून घेतले व म्हणाला  ......   बेटा, कोण म्हणतो चमत्कार विकत मिळत नाही..?*

   *जरुर मिळतो...जरुर मिळतो..*

*ती छोटी बालिका मोठ्या श्रद्धेने चमत्कार विकत घेण्यासाठी केमिस्टकडे गेली होती..*

  *निसर्गाने तिचे प्रयत्न, तिचे सत्कर्म,तिची श्रद्धा खरी ठरविली.*

*जर नियत साफ व उद्देश चांगला असेल तर कोणत्या ना कोणत्या रुपात निसर्ग तुमची मदत करतो..*

   *हाच आस्थेचा चमत्कार आहे.* 

*जर ही पोस्ट वाचून तुम्ही गदगद् झाला असाल, आणि तुम्हची ही  इतरांसाठी समर्पण भावना आसेल, तर निसर्ग तुमच्या कडुनही असा चमत्कार घडविलच..*

*आपल्याबरोबर आपल्या सहवासातील इतर व्यक्तिंचे जीवन आपल्या प्रयत्नामुळे बहरले तर त्या आनंदाचे सोने झाल्याशिवाय रहात नाही.*

 *निसर्ग हा सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे.*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller ( 224) Apradh !!

Nirmal received the phone call from Sanjay Sharma that they were going  to Australia because of some urgency. Nirmal couldn’t speak and he f...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!