*देवादिदेव महादेव यांनी सांगितलेला राम नामाचा महिमा...*
एके दिवशी महादेवाला विनाकारण कोणाला तरी नमस्कार करीत असतांना पाहून पार्वतीने मोठ्या आश्चर्याने महादेवांना विचारले, की *हे देवा! दररोज तुम्ही कुणाला नमस्कार करीत असता?*
*महादेव उत्तरले, "हे देवी, जो कुणी एकवेळ रामनाम घेईल त्याला मी तीन वेळा प्रणाम करीत असतो.*
*पार्वतीने एक वेळा महादेवांना विचारले, "देवा! तुम्ही स्मशानात कशाला जात असता आणि तेथील चिताभस्म अंगाला का फासून घेत असता?"*
महादेव तिला लगेच स्मशानात घेऊन गेले. तेथे नुकतेच एक शव अंत्य संस्कारासाठी मृताच्या नातेवाईकांनी आणले होते. आणतांना 'राम नाम सत्य है' म्हणत म्हणतच ते लोक त्या शवास स्मशानात घेऊन आले होते.
*महादेव म्हणाले, "पार्वती, या स्मशानात लोक जेव्हा मृत व्यक्तीच्या शवास अंत्यक्रियेसाठी म्हणून घेऊन येतात, तेव्हा रामनाम घेत घेतच येतात. आणि परंपरेच्या निमित्ताने का असेना, हे सगळे लोक स्मशानात येतांना मला अंत्यंत प्रिय असलेलं रामनाम घेतच येतात आणि मला अत्यंत प्रिय असलेले हे रामनाम ऐकायलाच मी नित्य स्मशानात येत असतो. तसेच इतक्या साऱ्या लोकांना रामनाम घेण्याचे निमित्त मिळवून देणाऱ्या त्या शवाचा मी सन्मान करीत असतो आणि चितेत भस्म होऊन त्या शवाची झालेली राख मी माझ्या अंगाला फासत असतो. रामनाम घेणाऱ्याबद्दल माझ्या मनांत इतकं प्रेम आहे."*
_______
एकदा महादेव कैलासावर पोहोचले आणि त्यांनी पार्वतीला भोजन मागितले. पार्वती विष्णू सहस्त्रनाम म्हणत होती. ती म्हणाली, *"देवा, अजून माझे विष्णू सहस्त्रनाम म्हणून झालेले नाही. कृपया थोडे थांबावे."*
*महादेव म्हणाले, की याला तर वेळही भरपूर लागेल आणि तुला त्रासही अधिक होईल. म्हणून संत मंडळी जसे सहस्रनामाला लहान करून लघु नाम घेतात तसेच तूही कर._____*
*पार्वती हात जोडून म्हणाली, "देवन, संत मंडळी हे कसे करतात हे आपण मला देखील सांगावे. मलाही त्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे."____*
*त्यावर महादेव म्हणाले, "तू केवळ एक वेळा रामनाम घे, तुला भगवंताची एक सहस्र नांवे घेण्याचे पुण्य लाभेल. एकच रामनाम एक हजार दिव्य नावांच्या बरोबरीचे आहे."________*
*पार्वतीने मग तसेच केले.*
*पार्वत्युवाच -*
*केनोपायेन लघुना विष्णोर्नाम सहस्रकं?*
*पठ्यते पण्डितैर्नित्यम् श्रोतुमिच्छाम्यहं प्रभो।।*
*ईश्वर उवाच-*
*श्री रामरामेति रामेति, रमे रामे मनोरमे।*
*सहस्र नाम तत्तुल्यम् रामनाम वरानने।।*
*हे राम नाम सर्वच संकटांचे निवारण करणारे, सर्वच प्रकारची संपदा प्रदान करणारे, साऱ्या विश्वाला विश्रांती / शांती देणारे आहे. आणि म्हणूनच हे नाम मला नित्य वंदनीय आहे._________*
*आपदामपहर्तारम् दातारम् सर्वसंपदाम्।*
*लोकाभिरामम् श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम्।।*
*॥ श्री राम जय राम जय जय राम ॥*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें