मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

शनिवार, 1 जून 2024

After age of 55 — Marathi !! { Saujanya}

 वयाच्या 55 वर्षापुढील सर्वांनी खालील दहा कृती टाळाव्यात: डॉ.श्रीकांत काळे

काळे हॉस्पिटल अकोला.

1.  जीने चढू नका, गरजच असेल तर FCआधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे.

2.  आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा.

3.  आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा.

4.  आपला पायजमा उभ्याने  न घालता बसून घाला.

5.  झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका तर डाव्या अगर उजव्या कुशीवर वळून उठा.

6.  उलटे चालू नका त्याने गंभीर इजा होऊ शकते.

8.  खाली वाकून जड वस्तू उचलू नका तर आधी गुडघ्यात वाकून मग उचला.

9.  झोपेतून उठताना जलद न उठता प्रथम काही मिनिटे शांत बसून मग उठा.

10.  संडासला जोर लावू नका नैसर्गिक होऊ द्या.अजून महत्त्वाचे नेहमी कृतिशील रहा व सकारात्मक विचार ठेवा कारण आयुष्यभर काबाडकष्ट केल्यानंतर आता खरे जीवन आनंदी जगण्याची वेळ आहे.

  वरचेवर मित्रांच्या संपर्कात जरूर रहा मनसोक्त पैसे ,वेळ खर्च करा

  आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल,  तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही.

  मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ?  आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपणास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत.

  आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका.  कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ? 

       जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल ...!

  तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका.  त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या.  स्वतःचे भविष्य घडवू द्या.  त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका .

  मुलांवर प्रेम करा त्यांची काळजी घ्या,  त्यांना भेटवस्तुही द्या.  मात्र काही खर्च स्वतःवर स्वतःच्या आवडी निवडीवर करा

 जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा

  आपल्या आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत.  पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही .

  या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल.

  तुमच्याकडे कितीही एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ?           

तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते !

  एक दिवस आनंदा शिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात  एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात हे लक्षात असू द्या.

  आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत.

    सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे, उदात्त आहे त्याकडे पहा.  त्याची जपणूक करा

  आणी हो,  तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका त्यांना जपा,  हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणी इतरांनाही हवेहवेसे वाटाल.

 मित्र नसतील तर

तुम्ही नक्कीच एकटे आणी एकाकी पडाल.

   त्यासाठी रोज व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्कात रहा हसा, हसवत रहा मुक्त दाद द्या

        म्हणूनच म्हणतो आयुष्य खुप कमी आहे ते आनंदाने जगा ...

प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा..!

  क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका..!

 संकटे ही क्षणभंगुर आहेत

त्यांचा सामना करा..!

  डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो पण ....

  काळाच्या पडद्या आड गेलेले "जीवलग" परत कधीच दिसत नाहीत ....


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller ( 143) Apradh !!

Next day all the members of both families woke up early and started getting ready. There was no beautiful parlour system for bride’s make up...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!