मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

शुक्रवार, 19 जुलाई 2024

Laughter !( Marathi )

 आई ही आई असते

*आयझॅक-न्यूटनची आई* : पण खायच्या आधी ते सफरचंद स्वच्छ धुतलंस तरी का??

*आर्किमिडीजची आई* : गाढवा! रस्त्यावर नागडा पळत जायला लाज वाटली नाही का? आणि ही पोरगी, युरेका, आहे तरी कोण?

*एडिसनची आई* : अर्थात मला फार अभिमान वाटतो तुझा, इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावल्याबद्दल. पण आता घालव तो दिवा आणि झोप मुकाट्यानं!

*जेम्स वॅटची आई* : सारखं झाकण उडताना आणि पडताना बघत राहिलास, तर तो भात करपेल की रे टोणग्या! गॅस बंद कर आधी तो!

*ग्रॅहम बेलची आई* : ह्या डबड्याचा शोध लावलास ते ठीक. पण याद राख, पोरी बाळींनी रात्रीअपरात्री फोन केले तर मला चालणार नाही!

*मोनालीसाची आई* : तुझ्या दातांच्या क्लिपांवर इतका खर्च करून शेवटी असं मोजकंच हसलीस होय!

*गॅलेलियोची आई* : मेल्या! तुझ्या त्या टेलेस्कोपचा उपयोगच काय, जर त्यातून माझं मिलानोमधलं माहेर दिसत नसेल तर??

*कोलंबसची आई* : कुठे ही जा, कितीही फिर, पण घरी एक चार ओळींचं पत्र खरडायला बिघडतं काय म्हणते मी?!

*मायकल अँजेलोची आई* : इतर पोरांसारखा भिंतीवर रेघोट्या मार रे. ते छतावरचे राडे साफ करायला कंबरडं मोडतंय की माझं!

*बिल गेट्सची आई* : दिवसभर त्या कॉम्प्युटरला चिकटून असतोस, हरकत नाही. पण अडल्ट साईट बघताना दिसलास तर माझ्याशी गाठ आहे, सांगून ठेवते!

*फॅरेनहाइटची आई* : त्या उकळत्या पाण्याशी खेळत बसलास तर मी चहा कधी टाकणार?!

*अलबर्ट आईनस्टाइनची आई* : कॉलेजचा ग्रुप फोटो आहे बाळा. जरा डोक्याला स्टायलिंग जेल वगैरे काहीतरी लाव की!

 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller (221) Apradh !!

Nirmal came back to his home. He conveyed the Sunita Aunty’s message to his mother Parvati Devi. They didn’t have any options except breakin...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!