शाळेत असताना टीचर कडून हातावर छडी पडल्यावर मी नेहमी माझ्या हाफ पँट वर हात पुसून दुसरा हात पुढे करत असे....मी हातावरील छडीची घाण पुसत असे.
मी साफसफाईच्या बाबतीत खूप जागरूक होतो.
माझ्या शालेय दिवसांमध्ये, माझे शिक्षक बर्याचदा माझ्या आई वडिलांना घेऊन यायला सांगत असत , कारण ते काहीही direct मला सांगायला घाबरत असत...
मी जे काही लिहायचो ते वाचायला माझ्या शिक्षकांना खूप आवडत असे. माझं हस्ताक्षर त्यांना खूप आवडत असे त्याच कारणास्तव बराचवेळी ते मला एकच उत्तर 10 वेळा लिहून आणायला सांगत असत...
कितीतरी वेळेस शिक्षक मला न विचारता त्यांचा किमती खडू माझ्या दिशेने कॅच पकडण्यासाठी फेकत असत...
उद्देश एकच होता की मी चांगला fielder बनावा.
परीक्षेच्या वेळी बहुतेक वेळा मला 3-4 शिक्षक Z टाइप सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंच च्या आजुबाजूला पूर्ण exam. संपेपर्यंत उभे राहत असत.
कितीतरी वेळा मला बेंच वर उभं करून मला सन्मानित करण्यात येत असे,
कारण बाकी मुलांना मी व्यवस्थित दिसून त्यांनी माझ्याकडून प्रेरणा घ्यावी आणि मला वर्गातले सर्व विद्यार्थी व्यवस्थित दिसायला हवेत हा मुख्य उद्देश असायचा शिक्षकांचा.
शिक्षकांना माझ्या आरोग्याची विशेष काळजी होती
माझ्या शरीराला vitamin D आणि भरपूर ऑक्सिजन असलेली मोकळी हवा मिळवी ह्यासाठी मला बर्याच वेळा सकाळच्या कोवळ्या उन्हात उभा करत असत व मैदानाला 5 फेर्या मारायला सांगितल्या जात असत.
त्यावेळी बाकी मुलं मात्र वर्गात घाम पुसत असत व कोंडलेल्या वर्गात गुदमरून शिकत असत.
मी इतर मुलांपेक्षा हुशार असल्याने माझे बहुतेक सगळे शिक्षक मला नेहमी म्हणत असत....
तू शाळेत का येतोस? ...तुला ह्याची गरज नाहिये...
वाह !!! काय ते सोनेरी दिवस होते !
अजूनही आठवतात मला !!
याला म्हणतात positive thinking.
असा सन्मान कोणा कोणाच्या वाट्याला आलाय
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें