एक बाई आपल्या हातात एक जाडजूड हातोडी घेऊन तिच्या मुलाच्या शाळेत येऊन मोठ्या आवाजात चौकशी करत होती *”जोशी मास्तर कुटं हायेत?”*
शिपाई हादरलाच. त्यानं तिला विचारलं “ते कशाला हवेत तुम्हाला?”
बाई: *कशाला म्हणजे काय? त्यांच्याच वर्गात माझा मुलगा शिकतोय ना, कुटंय त्यांचा वर्ग?*
शिपायाने बाईला तिथंच उभं करून लगबगीने धावत जाऊन जोशी मास्तरांना सांगितलं, *'एक बाई हातोडी घेऊन तुम्हाला शोधत शाळेत आलीय.'*
जोशी मास्तर थरथर कापत हेडमास्तरांकडे धावले. *"काहीही करा आणि मला त्या जगदंबेपासून वाचवा, ती हातोडी घेवून मला शोधत आलीय."*
हेडमास्तर त्या बाईसमोर आले आणि शक्य तितक्या मृदु आवाजात तिला विचारलं, *"काय झालंय? आणि तुम्ही का जोशी मास्तरांना शोधत आला आहात? शांत व्हा जरा…"*
बाई: *"मी शांतच हाय मास्तर…!"*
हेडमास्तर: *"तुम्हाला जोशी मास्तर का हवेत, मला सांगा काय प्रकार आहे?"*
*बाई: "अवं, प्रकार वगैरे काय नाय, माझा मुलगा त्यांच्या वर्गात शिकतो म्हणून मला त्यांच्या वर्गात जायचंय…" पुन्हा एकदा हातातली हातोडी नाचवत बाई बोलली.*
हेडमास्तर: *"हो, तुमचं म्हणणं समजलं. पण तुम्हाला त्यांच्या वर्गात का जायचंय?"*
*बाई: का म्हंजे? अवं, माझा मुलगा त्या बाकावर बसतो मला त्या बाकाचा खिळा ठोकायचाय. गेल्या तीन दिवसात त्यो तिसरी चड्डी फाडून घरी आलाय. त्यो खिळा ठोकल्याबिगर म्या घरी जाणार नाही…*
*अशी असते बरं आईची माया, प्रेम आणि काळजी!*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें