*"थोडं हसूयात"*
*माझी बायको
*हॉस्पिटलमध्ये आहे
*असे सांगून एकजण
*गेले ३ महिने माझ्याकडून
*पैसे घेतोय.
*काय आजार आहे म्हणुन,
*काल हॉस्पिटलला गेलो
*तर समजले,
*त्याची बायको "नर्स" आहे
*रोज "अडानी"च्या
*वाढत्या मालमत्तेच्या बातम्या बघून बघुन आई मला म्हणाली...
*बघ जरा नालायका
*अडाणी असून पैसे कमवतोय,
*तुझा तर एवढे शिकुन पण
*काही उपयोग नाही...मुडद्या...!
मित्र - *अरे! किती वेळ फोन करतोय
*फोन का उचलत नाहीस?
मी : ( *हलक्या आवाजात*) *लेक्चरमध्ये आहे
मित्र - *कुठे आहे लेक्चर?
*विषय काय आहे?
मी - *लेक्चर घरीच आहे
*मीच विषय आहे
एक गर्विष्ठ शास्त्रज्ञ - *तुम्ही मला देव दाखवा
पुणेकर - *तुम्ही मला ऑक्सिजन दाखवा
शास्त्रज्ञ - थोडा वेळ *श्वास रोखून धरा म्हणजे *तुम्हाला ऑक्सिजन काय आहे*ते कळेल
पुणेकर - *तुम्ही थोडा जास्त वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला देव दिसेल.
*कॉलेज मध्ये एक सुंदर मुलगी
*एका तरुणाकडे आली
*आणि म्हणाली
*"Hi I'm Anushka* ,
*1st Year Arts, & you!!"*
युवक ( *गर्वाने*) *"मी माझ्या मुलाची फीस भरायला आलोय"*
*Moral....
नेहमी *फक्त आईच *संतूर मॉम नसते *बाप पण *उरलेला* साबण वापरतो।
*पितळीच्या वाटीला
*कितीही घासा
*ती सोन्याची होत नाही.
हे वाक्य *कुणीतरी
*ब्युटी पार्लरच्या बोर्डाखाली लिहून
*पळून गेलं राव!
गणिताचे शिक्षक स्टाफरूममधे रिकाम्या डब्यात चपाती बुडवून खात होते...
मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात
तर काहीच नाही...
गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला 'एक्स' मानल आहे..!
सासू (सुनेला) : अगं उठ, तो बघ सूर्य पण उठला.
सून : तेवढंच दिसतं तुम्हाला ! तो माझ्या आधी झोपतो ते नाही दिसत..
बायको - अहो ऐकता का ???.... पाटलांच्या मुलीला गणितात १०० पैकी ९९ मार्क्स मिळाले
नवरा - वाह... मग एक मार्क कुठे गेला???
बायको - आपला कार्टा घेऊन आलाय!
एका मैत्रिणीची बायपास झाली तिला दुसऱ्या मैत्रिणीने मेसेज केला,...
Ata tula udya marayala harakat nahi.
बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं.
कारण तिनं वाचलं..
आता तुला उद्या मरायला हरकत नाही.
परंतु मूळ मेसेज होता..
आता तुला *उड्या मारायला* हरकत नाही!!
म्हणून मराठी नेहमी मराठीतूनच लिहावे
अन्यथा अर्थाचा अनर्थ होतो.
यजमान : आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो
पुणेकर : वा , तरीच छान थंड होता. . .
किमान शब्दात कमाल अपमान
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें