मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

गुरुवार, 5 सितंबर 2024

Vilakshan Marathi Language !!

 *विलक्षण  मराठी  भाषा......* *छंदश्रीमंत* .....


*रस्ता - मार्ग*

* जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.

* जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.


*खरं - सत्य*

*  बोलणं खरं असतं.

* सत्याला  सोबत पुरावा जोडावा लागतो.


*घसरडं - निसरडं*

* पडून झालं की घसरडं.

* सावरता येतं ते निसरडं.


*अंधार - काळोख*

* विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.

* निसर्गात जाणवतो तो काळोख.


*पडणं - धडपडणं*

* पडणं हे अनिवार्य.

* धडपडणं हे कदाचित सावरणं.


*पाहणं - बघणं*

* आपण स्वत:हून पाहतो.

* दुसऱ्यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.


*पळणं - धावणं*

* पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.

* ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.


*झाडं - वृक्ष*

* जे माणसांकडून लावलं जातं ते झाडं.

* जो आधीपासूनच  असतो तो वृक्ष.


*खेळणं - बागडणं*

* जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.

* जे मुक्त असतं ते बागडणं.


*ढग - मेघ*

* जे वाऱ्याने ढकलले जातात ते ढग.

* जे नक्की बरसतात ते मेघ.


*रिकामा - मोकळा*

 वेळ जो दुसऱ्याकडे असतो तो रिकामा. 

* आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.


*निवांत - शांत*

कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा.

* काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा.


*आवाज - नाद*

* जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज.

* जो घ॔टेचा होतो तो नाद.


*झोका - हिंदोळा*

* जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका. 

* जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा.


*स्मितं - हसणं*

* मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित.

* जे लोकां समोर दाखवावं लागतं ते हसणं.


*अतिथी - पाहुणा*

* जो यावा यावा असा वाटतो तो अतिथी.

* जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो पाहुणा.


*घोटाळा - भानगड*

* जो अचानक नकळत होतो तो घोटाळा.

* जी नियोजनबद्ध पद्धतीने होते ती भानगड.


 *आभाळ- आकाश* 

भरून येत ते आभाळ.

निरभ्र असत ते आकाश.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller (26)Apradh !!

  It was morning Vineeta woke up first , “ Didi ! Didi !! She called Nikita , Bathroom’s door was opened. She went to the kitchen then Mom D...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!