मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

बुधवार, 21 फ़रवरी 2018

EK KAVITA !! " AAJ CHI MHATARI "{ MARATHI }




आजची म्हातारी
वय माझं 60-70,
म्हणजे काही जास्त नाही !
तुम्ही खुशाल समजा वृद्ध,
मंजूरीची गरज नाही!
देठाला मी अजून हिरवे,
भले केस पांढरे करडे!
Skin वर नक्षी थोडी,
पान कदाचित थोडे पिवळे!
लांब केस काय करायचेत,
पांढरा bob रुबाबदार!
Facial manicure करून घेते,
चाल अजून टेचदार!
कपडे जशी गरज तसे,
जीन्स घालते फिरताना!
लग्ना कार्यात मिरवते नेसुन,
कांजीवरम मोजका दागिना!
नातवंडांच्या friends मध्ये,
मी ही घालते डोक्यावर hood!
त्यांच्या कानगोष्टीत मी,
त्यांची "secret cool dud"!
वाट बघते कधी होतील
दात माझें थोडे सैल,
Implant करून मला,
हसून बघायचंय माधुरी style!
पार्टीत घालून cocktel dress,
जाते नवर्याचा हात धरून!
मी माझ्या घोळक्यात,
तो त्याच्या मित्रात जातो मिसळून!
नजर त्याची होऊन पुरुषी,
एखादी उघडी पाठ न्याहाळे!
मी अलगद पकडून तिला,
हळूच डोळे मिचकावते!
तो ही हसतो ओशाळे,
गाल नवर्‍याचे लालमलाल
"तू चल घरी, मग बघते",
मी धमकी देते खुशाल!
योगा, diet, गरजेची औषधे,
क्वचित कधी junck food!
सांभाळून स्वतःची जबाबदारी ही,
मी असते सदा cool!
घेऊन जायला यम राहील,
जेव्हा येऊन उभा दारी,
मी म्हणेन,"वा देवा!
antic look तुमचा लैच भारी!
म्हणाल तेव्हा निघू आपण,
फक्त नको तो काळा रेडा!
स्वर्गापर्यंत मला आपली,
ghost rider च्या bike ने च सोडा"

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller ( 201) Apradh!!

Raghavan called Ramanna and asked him to arrest both, one more 13 years boy was working there named Chhotu but he is absent today and his ro...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!