मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

शुक्रवार, 23 फ़रवरी 2018

Life Cycle ! ( Marathi )

आमचे आई बाबा म्हातारे होतात...!

      वर्षे अशीच सरतात.. आमचे संसार फुलू लागतात..
आणि बघता बघता...
आमचे आई बाबा म्हातारे होतात...!

      हौसमजा, जेवणखाण आतां कमी होत चाललंय..
पण फोनवर सांगतात  अगदी उत्तम चाललंय..
अंगाला सैल होणारे कपडे, गुपचूप घट्ट करून घेतात..
वर्षे अशीच सरतात.. बघता बघता..
आमचे आई बाबा म्हातारे होतात...!

     कोणी समवयस्क “गेल्या”च्या बातमीने हताश होतात..
स्वत:च्या पथ्यपाण्यांत, आणखीन थोडी वाढ करतात..
आमच्या ‘खाण्यापिण्याच्या’ सवयींवर  नाराज होतात..
वर्षे अशीच सरतात.. बघता बघतां..
आमचे आई बाबा म्हातारे होतात...!

      आधार कार्ड, पॅन कार्ड जीवापाड सांभाळतात..
इन्कम टॅक्सच्या भीतीने कावरे बावरे होतात..
मॅच्युर झालेली एफडी नातवासाठी रिन्यू करतात..
वर्षे अशीच सरतात.. बघता बघता..
आमचे आई बाबा म्हातारे होतात...!

      पाठदुखी, कंबरदुखीच्या तक्रारी एकमेकांकडे करतात..
अॅलोपाथीच्या साइड इफेक्टची वर्णने करतात..
आयुर्वेदावरचे लेख वाचतात, होमिओपॅथीच्या गोळ्या खातात..
वर्षे अशीच सरतात.. बघता बघता..
आमचे आई बाबा म्हातारे होतात...!

       कालनिर्णयची पानं उलटत येणाऱ्या सणांची वाट बघतात..
एरवी न होणाऱ्या पारंपारिक पदार्थांची जय्यत तयारी करतात..
आवडीने जेवणाऱ्या नातवाकडे भरल्या डोळ्याने पहातात..
वर्षे अशीच सरतात.. बघता बघता..
आमचे आई बाबा म्हातारे होतात...!

         माहित आहे हे सगळं.. आता लवकरच संपणार
जाणून आहोंत.. हे दोघेंही आता एका पाठोपाठ जाणार..
कधीतरी हा अटळ प्रसंग येणार..काळ असाच पळत रहाणार.. वर्षे अशीच सरत रहाणार..

          बघता बघतां आम्ही देखिल असेच आमच्या मुलांचे म्हातारे आई बाप होणार..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Today’s tip !! Lessons for Old !!

When wrinkles bloom and joints protest,   Don’t teach the world—just give it rest.   Even if you're right (and you often are),   Unsolic...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!