मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

मंगलवार, 13 अगस्त 2019

Dharm & Darshan !! ( MARATHI ){KAVITA }

*प्रिय आई बाबा…*
*थोडं बोलावसं वाटलं ...!*

आज थोडं एकटं एकटं वाटलं ...
नकळतच डोळ्यात थोडसं पाणी
साचलं..
बाकी काही नाही,बस तुमची
आठवण आली म्हणून
*थोडं बोलावसं वाटलं ...!*

जन्म माझा झाला,
कुशीत घेऊन पूर्ण दवाखाना
मिरवत होतात...
चालायला लागल्यावर तुम्हीच
पहिला हात दिला होतात...
आता मी मोठा झालो जणू
आजूबाजूला धुक्याचं आभाळच
दाटलं...
आज स्वतःच्या पायावर उभा
असलो तरी धडपडल्या सारखं
वाटलं ...
बाकी काही नाही,बस तुमची
आठवण आली म्हणून
*थोडं बोलावसं वाटलं ...!*

जेवताना काऊ चिऊ शिवाय
कधी घास पोटात गेला नाही..

मी जेवल्याशिवाय तुमचं पोट
कधी भरलच नाही...
आता तर चिऊ बघायला सुद्धा
मिळत नाही...
काऊ चिऊ साठी पुन्हा रुसावसं
वाटलं ...
बाकी काही नाही,बस तुमची
आठवण आली म्हणून
*थोडं बोलावसं वाटलं ...!*

लहानपणी तुमच्यासोबत
पावसात भिजताना खूप मज्जा
वाटायची...
फाटका रेनकोट तुटकी छत्री
असूनही ती दोघांना पुरायची...
मी भिजायला नको म्हणून
तुमच्या जीवाची घालमेल
व्हायची...
आज नवी कोरी छत्री असूनही
पावसात भिजावसं वाटलं ...
बाकी काही नाही,बस तुमची
आठवण आली म्हणून
*थोडं बोलावसं वाटलं ...!*

एकदा घरात एकटा असताना
सर्व घर रडून डोक्यावर घेतलं
होतं...
घर खायला उठलं होतं आणि
डोळ्यात पाणी साचलं होतं...
पण तुम्ही धावत पळत येउन मी
आहे असं सांगितलं होतं...
आज स्टेशनच्या गर्दीत सुद्धा
एकटं एकटं वाटलं ...
बाकी काही नाही,बस तुमची
आठवण आली म्हणून
*थोडं बोलावसं वाटलं ...!*

आठवतंय...एकदां मी पडलो
होतो, मला खूप लागलं होतं..
माझी जखम कमी,पण तुमचं
तर काळीजच फाटलं होतं...
त्या दिवशी तर पूर्ण आभाळ
तुमच्यां डोळ्यात दाटलं होतं...
आज उगाचच अडखळून
पडावसं वाटतंय...
बाकी काही नाही,बस तुमची
आठवण आली म्हणून
*थोडं बोलावसं वाटलं ...!*

रात्री झोपताना तर तुमचा खांदा
माझी उशी असायची...
तुम्ही नसताना आईच्या खुशीत
पण झोप नसायची...
कारण तुम्ही सोबत नसतांना ती
रात्र भयाण वाटायची...
आज पुन्हा एकदा तुमच्या कुशीत
झोपावंस वाटलं ...
बाकी काही नाही,बस तुमची
आठवण आली म्हणून
*थोडं बोलावसं वाटलं ...!*

तुमचा हात सोडून शाळेत जाणे
नकोसे वाटायचे...
तुमचीच वाट बघत डोळे वाटेवर
असायचे...
पण तोच हात पकडून घरी
जाताना मात्र कसलेच भान
नसायचे...
आता मी मोठा झालो तरी पुन्हां
तो हात पकडून चालावसं
वाटलं ...
बाकी काही नाही,बस तुमची
आठवण आली म्हणून
*थोडं बोलावसं वाटलं ...!*

तुमची आठवण कधीच मनातून
जाऊ शकणार नाही...
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत
त्याला कोणीच काढू शकणार
नाही...
आज दुनियेभरचा भार एकटाच्
सांभाळतोय.
पण माझ्या पाठीवरून फिरणा-या
त्या तुमच्या हाताची सर
कशालाच् येणार नाही

आज भरलेल्या आभाळा बरोबर
डोळ्यात पाणी दाटल्यासारखं
वाटलं ..
कारण तुम्ही मला आजवर
तळहाताच्या फोडा सारखं
जपलं.
बाकी काही नाही बाबा..
...बस तुमची आठवण आली
म्हणून थोडं बोलावसं वाटलं ...!
*थोडं बोलावसं वाटलं ...!


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharm & Darshan !! Karpur Gauram !!

कर्पूर आरती का अर्थ और महत्व* कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्।* *सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानीसहितं नमामि।।"* मंदारमा...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!