खुप वर्षांनी पुन्हा तो आयुष्यात डोकावला
माझ्यावीना आयुष्य कसं वाटलं?
कानाशी पुटपूटला,
छानच की , मी म्हटलं
संसाराच्या गाड्यात सहाजिकच
तुझं विस्मरण झालं
अस्तित्वावर बोट ठेवायला पुन्हा
का येणं केलंस?
रोजच्या धावपळीत स्वतःलाच
विसरले होते
संघर्ष कुठंच नव्हता म्हणून
हळूवार तुझे बोट सोडले होते
शाळाकॉलेजमध्ये तू सोबत होतास म्हणून
अशक्य ते शक्य झालं
मेहनतीने का असेना,
यशाचं शिखर गाठता आलं
आता संसारात मुलांसाठी
मन मारावं लागतं
एवढ करुनही आईला काही येत नाही
असं त्यांना वाटतं
दोन पुस्तक शिकून
मुलं गर्व करूं लागतात
पहिला गुरु आई
हेच नेमकं विसरतात
नवऱ्याच्या पाठीशी बायको खंबिरपणे उभी रहाते
पण प्रशंसा सोडून,
'वेंधळीच आहेस बघ'
हेच ऐकायची सवय होते
तू होतास तेव्हां आयुष्य होतं छान
सुधारीत जगात जगताना
नवरा, मुलांशिवाय हलत नाही पान
मी मात्र मागे राहिले
स्वतःसाठीचं जगायच विसरले
मित्रा आता तरी घे हातात हात
आजन्म दे तूच आता साथ
तो म्हणाला, मला मिळवण्यासाठी
कणखर व्हावं लागतं
नवा दिवस उजाडावा तर पृथ्वीलाच
सूर्याभोवती फिरावं लागतं
हसून विचारलं त्याला
आहेस कोण एवढा खास?
तोही हसला...म्हणाला
ओळखलं नाहीस अजून..?
मी आहे तुझाच..
आत्मविश्वास
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें