मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

रविवार, 19 मार्च 2023

Dharm & Darshan !! Padar — Marathi !!

 " स्त्रीचा पदर "

*खुप छान मेसेज नक्की वाचा...*


     *पदर  काय  जादुई  शब्द  आहे  !! हो  मराठीतला !!*


*काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार  नाही.  एक  सरळ  तीन अक्षरी  शब्द.*


*पण  केवढं विश्व सामावलेलं  आहे त्यात....!!*


 *किती  अर्थ, किती  महत्त्व...*

 *काय  आहे  हा  पदर......!?* 


*साडी नेसणाऱ्या  स्त्रीच्या  खांद्यावर रुळणारा  मीटर  दीड मीटर  लांबीचा भाग..!*


*तो   स्त्रीच्या  " लज्जेचं रक्षण" तर करतोच. सगळ्यात  महत्त्वाचं हे कामच त्याचं..!* 

*पण,आणखी   ही बरीच  "कर्तव्यं" पार  पाडत  असतो..!* 


 *या पदराचा उपयोग  स्त्री केव्हा, कसा  अन्‌  कशासाठी  करेल  ते  सांगताच  येत  नाही..!?*


*सौंदर्य  खुलवण्यासाठी "सुंदरसा" पदर असलेली " साडी" निवडते..! सण-समारंभात   तर   छान-छान पदरांची जणू स्पर्धाच लागलेली असते.*

*सगळ्या  जणींमध्ये चर्चाही तीच. .....!!*


*लहान  मूल  आणि*

*" आईचा  पदर "*

*हे अजब नातं आहे.!* 

*मूल  तान्हं असताना आईच्या पदराखाली जाऊन  " अमृत  प्राशन" करण्याचा हक्क बजावतं......!!*


*जरा  मोठं  झालं,  वरण-भात  खाऊ लागलं, की त्याचं  तोंड पुसायला आई पटकन तिचा  " पदर " पुढे  करते..!* 


*मूल   अजून   मोठं   झालं.,   शाळेत जाऊ  लागलं,  की  रस्त्यानं  चालताना  आईच्या " पदराचाच आधार " लागतो..!* 

*एवढंच   काय...! जेवण  झाल्यावर  हात  धुतला, की  टाॅवेल ऐवजी  "आईचा  पदरच" शोधतं आणी  आईलाही  या  गोष्टी   हव्याहव्याशा वाटतात  मुलानं पदराला  नाक जरी पुसलं तरी ती रागावत नाही..!* 


*त्याला  बाबा  जर रागावले, ओरडले तर मुलांना पटकन लपायला " आईचा पदरच " सापडतो.....!!*


*महाराष्ट्रात  तो  " डाव्या खांद्या  वरून " मागे सोडला जातो.....!!*


*तर  गुजराथ, मध्य प्रदेशात उजव्या खांद्यावरून पुढं मोराच्या पिसाऱ्यासारखा फुलतो..!* 


*कांही कुटुंबात मोठ्या माणसांचा मान  राखण्यासाठी सुना पदरानं चेहरा  झाकून  घेतात..!* 

 *तर  काही  जणी  आपला लटका राग दर्शवण्यासाठी मोठ्या फणकाऱ्यानं " पदरच " झटकतात..!*


 *सौभाग्यवतीची "ओटी "भरायची ती  पदरातच  अन्‌  "संक्रांतीचं वाण "लुटायचं ते " पदर "  लावूनच..!* 


*बाहेर जाताना " उन्हाची दाहकता " थांबवण्यासाठी  पदरच  डोक्यावर ओढला  जातो.!* 

*तर  थंडीत  अंगभर पदर लपेटल्यावरच " छान  ऊब " मिळते....!!*


*काही  गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पदरालाच  " गाठ "  बांधली   जाते..* 

*अन्‌ नव्या नवरीच्या*

*" जन्माची गाठ " ही नवरीच्या   पदरालाच.*

*नवरदेवाच्या  उपरण्यासोबतच बांधली   जाते.....!!*


*पदर हा शब्द किती अर्थांनी  वापरला  जातो  ना...!?*


*नवी नवरी नवऱ्याशी बोलताना पदराशी चाळे करते..!* 

*पण संसाराचा राडा दिसला..!  की  पदर कमरेला  खोचून कामाला लागते..!* 


*देवापुढं आपण चुका कबूल  करताना म्हणतोच  ना .....?*

*माझ्या चुका  " पदरात "  घे..!* 


*मुलगी मोठी  झाली, की "आई " तिला साडी   नेसायला   शिकवते, पदर सावरायला शिकवते   अन्‌   काय म्हणते  अगं.! चालताना  तू  पडलीस तरी  चालेल..! पण,  " पदर "  पडू   देऊ   नकोस !*

*अशी आपली भारतीय संस्कृती...!*


 *अहो  अशा  सुसंस्कृत आणी सभ्य मुलींचा " विनयभंग " तर  दूरच ती रस्त्यावरून चालताना लोकं तिच्याकडे वर नजर करून  साधे पाहणार ही नाहीत..!* 

 *ऊलटे तिला वाट देण्यासाठी  बाजुला सरकतील एवढी  ताकत  असते  त्या पदरात..* 


*ही आहे आपली भारतीय संस्कृती...* 






कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller ( 172)

  When Suresh finally decided he thought of convey it to Nirmal. He was ready for the office but it’s very early so he decided to go to Nirm...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!