मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

मंगलवार, 21 मार्च 2023

Save Environment !! ( Marathi )

........चिमणीचं घरटं.........                         लहानपणी चिमण्यांना कधीच दारात बोलवावं लागले नाही... संध्याकाळच्या वेळी आई सुपात धान्य घेऊन पाखडायला लागले की आपोआप चिमण्या सगेसोयरे घेऊन दारात किलबिलाट करत धान्य , तांदूळ टिपायच्या...आई पण मुद्दामच थोडं धान्य सुपातून बाहेर जाऊ द्यायची...रोज संध्याकाळी हा खेळ रंगायचा... ही देवाणघेवाण काय होती हे कधीच आम्हाला कळले नाही... रात्री जेवताना एक घास चिऊचा,एक घास काऊचा हे बडबड गीत प्रत्येक उंबरठ्यावर ऐकू यायचं... त्यानंतर एक होती चिमणी, एक होता कावळा ...कावळ्याचं घर शेणाचं अन् चिमणीचं घर मेणाचं ...मग जो पाऊस यायचा तो ऐकतच आम्ही झोपी जायायचो...कावळा खेळातील गारीगोटी उचलायचा म्हणून राग यायचा आणि काल ऐकलेल्या गोष्टीत येणारा पाऊस जोरात पडावा आणि त्याचं शेणाचं घर वाहून जावं असं वाटायचं.. पण चिमणी खास आवडती नसली तरी तिच्या चिवचिवाट व शांत स्वभावानं बरी वाटायची..ती यायची दाणं टिपायची अन् भुर्रकन उडून जायायची... इथं इथं बस रे मोरा ,बाळ घालतंय चारा गाण्यात मोर भुर्रकन कसा उडून जातो हे आजवर कळलं नाही...पण चिमण्या एकसाथ भुर्रकन उडून गेलेले पहाण्यात वय कधी उडून गेलं ते ही कळलं नाही पण प्रत्येक वयात चिमणीचा वेगळा संदर्भ येत राहिला...आणि चिमणा चिमणीचा संसार बघत राहिलो...खरंतर दुरदर्शनचा नुकताच सामान्य जीवनात प्रवेश झाला होता...त्यात  एक चिड़िया, अनेक चिड़ियाँ…. असं बोल असणारं गाणं कितीवेळा ऐकलं याला हिशोब नाही... त्यामुळे एकीचे बळ,देशात एकता असणे किती महत्त्वाचे वगैरे वगैरे उमजू लागले...जगण्याची मजा चिमणा चिमणीने शिकवले ....पण चिमण्या माणसाने शिवलेल्या तिच्या बाळाला (पिल्याला) मारून टाकतात... त्यामुळे या अस्पृश्यता जपतात असं वाटू लागलं...आणि हे दृश्य पाहिलो त्यावेळी हा समज गडद झाला ...त्या असं का वागतात हे कळलं नाही... चिमण्या आकर्षक नसल्या तरी त्यांचं घरटं प्रचंड आवडायचं...विहिरी काठच्या बाभळीवर भरपूर घरटी असायची ...काट्याच्या फांद्या बाजुला करत ती घरटी काढून आमच्या घराच्या कौलावर बांधायचो चिमण्यांना रहाता येईल म्हणून...वेडेपणा  होता तो ...मुळ जागा सोडून...दूरवर त्यांचं घर बांधले आहे हे त्यांना कसे कळणार...त्या चिमण्या कधी घरावर बांधलेल्या घरट्यात आल्याचं नाहीत...पण आई ,अंगण आणि चिमण्या यांचं नातं मात्र अबाधित राहिलं....आणि आमचं वय वाढेल तसे चिमण्यांचं दिसणं कमी झालं...लहानपणी बघितलेली पिवळ्या गळ्याची चिमणी तर गायबचं झाली.,..नंतर काळी चिमणी शोधणारा फॅंड्री तला जब्या दिसला .... माळरानावर फिरणाऱ्या आमच्या पिढीला चिमणी आठवली...आता आमची पोरं चिमण्या ऐवजी डोरेमॉन बघत मोठी होत होती...आणि आमच्या घराला घरटं बांधायचं राहून गेलं होतं...मुलांना चिमण्यांची गोष्ट सांगायचं राहून गेलं...जॅक ॲन्ड जिल..., एबीसीडी ईएफजी असली गाणी पोरांच्या तोंडांत आली....अंगणचं उरलं नाही तर पाखडणं आणि पाखरं कोठून येणार..... ? माणसाचं मन व घर सिमेंटचं झालं आणि चिमणीचं मेणाचं घर आमच्या पिढीतच वितळून गेलं...कावळ्याचं शेणाचं घर तर हद्दपार झालं...एका पिढीला संस्कार देणारी ही पक्षीनिती काळाच्या पडद्याआड गेली... इसापनीती वाचणं बंद झालं आणि पक्ष्यांचं महत्त्व सिमेंटच्या जंगलात हरवून गेलं....आमच्या काळातील निरागस पक्षी आज ॲंग्री बर्ड होऊन हिंसक बनली...कावळा श्राध्दापुरता व चिमणी चित्रापुरती उरली .....आज चिमणीचं घरटं झाडावर दुर्मिळ दिसतं....शहरात व ग्रामीण भागात चिमणीचे अस्तित्व धोक्यात आलं हे आता कळतं....काही वर्षांपूर्वी रजनीकांत व अक्षयच्या रोबोट २.० मध्ये चिमणीसह पक्ष्यांचं बंड बघायला मिळालं... खरचं पक्ष्यांनी असं बंड माणसाविरोधात केलं तर माणसाचं अस्तित्व उरेल का???... निरागस ते हिंसक चिमणीची कथा मानवीकरणास फारशी चांगली नाही...आता चिमण्या ही स्वतः मध्ये बदल करून मानवाला जवळ करत आहेत..निसर्ग बदलतो गरजेनुसार हे खरं आहे... कृत्रिम घरट्यात, मानवाच्या हातात चिमण्या येत आहेत..पण त्यांचा निसर्गवास टिकविणे गरजेचे.. ....एक घास चिऊचा एक घास काऊचा...ऐकत मोठी झालेली आपली पिढी चिमण्यांसह इतर पक्ष्यांच्या अस्तित्वासाठी झटली नाहीतर भविष्यात फार मोठी जीवयंत्रणेची साखळी तुटणार आहे...चिमणी दिवस साजरा करताना...इतका विचार जरी करता आलं तरी पुरेसं आहे ...कारण शेवटी आठवते ती चिमणीचीच गोष्ट .... जंगलात आग लागली त्यावेळी ..सारे पशुपक्षी स्वतः ला वाचविण्यासाठी पळू लागले त्यावेळी एक चिमणी तलावात भिजून पंखात पाणी घेऊन आग विझविण्यासाठी धडपडत होती..,.हा चिमणी प्रयत्न आपणही केला पाहिजे... पर्यावरण वाचविण्यासाठी...एक चिडियां.. अनेक चिडियां हे गाणं जगण्याचा अर्थ आजही समजावून सांगतं... 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller ( 172)

  When Suresh finally decided he thought of convey it to Nirmal. He was ready for the office but it’s very early so he decided to go to Nirm...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!