*बोधकथा*
आजची बोधकथा ही सत्यकथा असून त्यात खाली नाव व तारीख ही दिली आहे. गुरूवर नितांत श्रद्धा ठेवली तर असे अनुभव येतात. जशी प्राप्त तशीच पोस्ट करीत आहे
गुरुश्रद्धा
माझा छोटा भाऊ गजानन महाराजांचा भक्त. जीवनातील अनेक चढउतार त्यांने पाहिले पण तो कधी विचलित झालेला मी बघितला नाही. अतिशय शांतपणे आलेल्या संकटांना धीराने तोंड देत मार्ग काढणे हे त्याचे कसब, कौशल्य. त्याच्या सवडीनुसार तो दिवसातून केव्हाही एक वेळा जपाची माळ ओढतो. त्याचे वास्तव्य ठाण्याला त्याची नोकरी ठाण्याला. आता निवृत्तीचा काळ. कंपनीत असताना पहिल्या वा दुसर्या सत्रात त्याला काम करावे लागे.त्याच्या मनात आले की महिन्या दोन महिन्यांनी तो अधूनमधून शेगावला महाराजांच्या दर्शनाला जातो. अतिशय गाढ श्रद्धा आहे त्याची महाराजांवर. एकदा एका बुधवारी
कंपनीतून कामावरून घरी आला आणि आपली नेहमीची शबनम बॅग भरली .वहिनीच्या लक्षात आली स्वारी शेगावला निघाली आहे. तिने कधीही आत्तापर्यंत त्याला अडविले नाही, उलट तिकडे जायची सगळी तयारी अगत्याने करून ती देते.
भावाच्या मनात आलं की तो शेगावला जातो त्यामुळे रिझर्वेशन ची व्यवस्था असतेच असे नाही. याही वेळेला रिझर्वेशन नव्हतेच.
बरेच वर्ष नोकरी सांभाळून तो रत्नागिरी हापूसआंब्याचा व्यवसाय करतो. गुढीपाडव्याला त्याच्या दुकानाचे उद्घाटन असते. पाडव्याच्या तीन-चार दिवस आधी सवडीनुसार आंब्याची एक पेटी घेऊन तो महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी जातो. तेथे पूजापाठ करून आंब्याचा नैवेद्य दाखवून त्यातील प्रसाद आम्हा सर्व कुटुंबियांना देतो. हा त्याने आंब्याचा धंदा सुरू केल्यापासून चा प्रघात आहे.
........ अशीच आंब्याची पेटी घेऊन तो त्या दिवशी प्रवासाला निघाला दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्यामुळे शेगावच्या गाडीला तुफान गर्दी होती. शबनम बॅग खांद्याला अडकवून व आंब्याची पेटी सांभाळत तो जेमतेम गाडीत घुसला, आणि गाडी सुरु झाली. एका सहप्रवाशाने आंब्याचा बॉक्स त्याच्या बाकाखाली ठेवला... नंतर अख्खा शेगाव पर्यंतचा सगळा प्रवास रात्रभर उभ्याने करून पहाटे शेगावला पोहोचला..
प्रातर्विधी आटपून, हातात आंब्याचा बॉक्स घेऊनआणि शबनम खांद्याला अडकवून त्याने महाराजांच्या दर्शनासाठी मंदिर आवारात प्रवेश केला... अरे बापरे???? केवढी मोठी रांग भक्तांची!!! तसा त्या रांगेत उभा राहून लुंगी, बॉक्स सावरत त्याने पिशवी खांद्याला अडकवली आणि उभ्या उभ्याने पोथी वाचायला सुरुवात केली. दुपारच्या आरतीनंतर महाप्रसाद घेऊन परत गाडी पकडायचा त्याचा इरादा.. कारण दुसऱ्या दिवशी कामावर हजर व्हायचे होते. दर्शनार्थींची रांग हळूहळू पुढे सरकत होती. सुहास चा नंबर आला गण गण गणात बोते हा मंत्रम्हणून त्याने आंब्याची पेटी महाराजांच्या चरणांशी पुजाऱ्यांना ठेवायला दिली. मनोभावे नमस्कार केला .महाराजांचे ते सगुण -साकार रूप डोळ्यात साठवत आणि आंब्याच्या प्रसादाची झोळी घेऊन तो आता महाप्रसादाच्या रांगेत येऊन उभा राहिला. परतीची गाडी मिळेल ना अशी शंका त्याच्या मनात आली... आणि पाठीमागून काही भक्त आपापसात बोलत होते अरे आज गाडी उशिराने धावणार आहे असा निरोप सांगितलाय माझ्या मित्राने. काय माहिती खरे की खोटे !सुहासने सहजच घड्याळात पाहिले . ठीक आहे .मग आपल्याला प्रसाद मिळेल द्रोणातला पिठलं -भाकरी ,शिरा..... रांगेत उभे राहून त्याचा मुखाने जप सुरू होता ..गण गण गणात बोते...
प्रसादासाठी सुहास चा नंबर आला .तो प्रसाद घेऊन परतीच्या रस्त्याला लागला. वाटेत दोन मिनिटं थांबून त्याने नामस्मरण करून थोड्या प्रसादाचे भक्षण केले. रस्त्यातील फळवाल्यां कडून पेरू, द्राक्षं आणि थोडा प्रसाद पुडा घेऊन तो झपाझप स्टेशनाच्या दिशेनेचालू लागला. बाहेरच्या रणरणत्या उन्हामुळे घामाच्या धारा लागलेल्या, त्या पुसत ,पुसत तो फलाटावर पोहोचला. गाडी माणसांनी तुडुंब भरलेली.
एवढ्यात खिडकीतून एका दाढीवाल्या सद्गृहस्थाने हाक मारली. ए बाबा, ये लवकर .कधीपासून वाट पाहतोय तुझी. सुहास ला आश्चर्य वाटले गर्दीतून वाट काढत तो त्या खिडकी पर्यंत पोहोचला. एक दाढीवाला, गोरापान उंचापुरा बाबा खिडकीतल्या सीटवरून पटकन् ऊठला आणि सुहास च्या हाताला धरून अदबीने त्याने त्याला त्याच्या जागेवर बसवले. सारे सहप्रवासी टकामका दोघांकडे पाहत होते. बाबाने सुहासचे सामान सीट खाली नीट लावून दिले. प्रसाद मिळाला ना बाबा तुला असे अगत्याने विचारले. कालपासून उभ्याने प्रवास करून दमला आहेस आज आता तुझा प्रवास सुखाचा होवो .तुझ्याच साठी कधीपासून ही सीट सांभाळून ठेवली होती रे बाळा असे म्हणून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तुझा प्रवास सुखाचा होऊ दे.तुझे कल्याण होवोअसे हातात हात घेऊन त्याने म्हटले आणि तो माणूस गर्दीतून, गाडीतून खाली उतरला..
... हा बाबा कोण आपल्या ओळखीचा ना पाळखीचा. सुहास विचार करतच फलाटावर त्याचा शोध घेत होता. खिडकीतून वाकून, वाकून फलाटावर तो बाबा उतरला असेल, आपण त्याला धन्यवाद देऊया, नमस्कार करू या म्हणून गाडी सुटेपर्यंत नव्हे तर ती स्टेशनातून बाहेर पडेपर्यंत अधाश्यासारखा भिरभिरत्या नजरेने सुहास त्या बाबा चा शोध घेत होता. पण त्या फलाटावरील जनसमुदायात तो कुठे हरवलाअसेल कोण जाणे?????
..... खिडकीशेजारी मिळालेल्या सीटवर बसून सुहास चा प्रवास सुरू झाला थकलेल्या भागलेल्या त्या जिवाला कधी झोप लागली ते कळलेच नाही.........
आपल्याला गाडीत जागा मिळवून दिलेला तो बाबा कोण हे प्रश्नचिन्ह घेऊनच सुहास घरी परतला.
दोन दिवसांनी पाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही सारे कुटुंबीय आंब्याच्या दुकानाचे उद्घाटन करण्यासाठी एकत्र जमलो तेव्हा श्री क्षेत्र शेगावचा प्रसाद देताना सुहासने आम्हाला ही गोष्ट सांगितली. आणि आम्ही साऱ्यांनी त्याला ठामपणे सांगितले अरे ते दुसरे तिसरे कोणी नसून ते प्रत्यक्ष तुझे श्री गजानन महाराजच होते. त्यांनी तुझी परीक्षा पाहिली आणि परीक्षेत तू उत्तीर्ण झाल्याची तुला पावती दिली.
मनी असे भाव तर देवा मला पाव असं म्हणतात ना ते खरोखरच आहे.महाराज, तुझ्या अंतरीचा भक्तिभाव पाहून तुला दर्शन देऊन गेले.
मी त्याला म्हटले सुहास,
तुझ्या अंतरीचा भाव पाहूनी महाराज सुखावले.... तेज:पुंज रूप आपुले त्यांनी भक्तास आपुल्या दावले
गेले चाळीस वर्षे आमचा आंबा व्यवसाय ठाण्याला नौपाडा विभागात सुरू आहे . पाडव्याला शेगावच्या आंबा पेटी चा प्रसाद कधीही चुकला नाही. परंतु मागच्या यावर्षी करोनाच्या संकटामुळे या प्रथेमध्ये खंड पडला.. पण भाऊ विचलित झाला नाही शांतपणे म्हणाला ही महाराजांची इच्छा. आपण आपल्या घरातील महाराजांच्या फोटो समोर आंब्याची पेटी ठेवून तो प्रसाद शेगावचा आहे असे समजून वाटुन घेऊ या. आणि आम्ही त्या प्रमाणेच घरात पेटी प्रसाद करून सर्वांना वाटला .
......... पण काय आश्चर्य!!!
विश्वास ठेवायचा का नाही श्रद्धा का अंधश्रद्धा???
पाडव्याला येणाऱ्या मुहूर्ताच्या ग्राहकांमध्ये प्रत्यक्ष शेगाव निवासी गजानन नामक व्यक्ती आंबा खरेदीला आले मागल्या वर्षी .आणि माझ्या भावाची श्रद्धा अधिकच दृढ झाली....मागच्या वर्षी आलेले गजाननराव यांचे मूळ गाव शेगाव परंतु कित्येक वर्ष नोकरी निमित्ताने ते ठाण्यात स्थिरावलेले.... त्यांनी एक डझन आंबे खरेदी केले आणि त्यातील एक आंबा गणगण गणात बोते असा मंत्र म्हणून सुहासला दिला... आणि तो महाराजांचा प्रसाद म्हणून सुहासने भक्तिभावाने स्वीकारला.
....
.. यावर्षी मार्चच्या अखेरीस लाक डाऊन शिथील केले होते त्याच वेळेला माझा भाऊ पेटी प्रसाद करून आला..
आंब्याच्या दुकानात लावलेला गजानन महाराजांचा सुंदर फोटो पाहून तुम्ही गजानन महाराजांचे भक्त का असे विचारले जाते आणि मग गुरुबंधू, गुरु सखा म्हणून परिचय होऊन जातो...
आहेना विलक्षण योगायोग!!!
माझा भाऊ गुरूंच्या बाबत नेहमी म्हणतो,
गुरु भक्ती अपार, गुरु शक्ति अपार....
गुरु श्रद्धा अपार.... गुरु विश्वास अपार.. गुरु दर्शने
नाही आनंदा पारावार...
गुरु वर माझा भरोसा,
संकटांचा होई खुलासा.... देती मज ते नक्की दिलासा,
देती मज ते पक्का दिलासा....
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें