मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

गुरुवार, 1 जून 2023

Dharm & Darshan !! Kundalini !!

 *!! कुंडली  !!  !! कुंडलिनी  !!*

       


*एकदा नागपंचमीला डॉ. श्री. अशोक भट यांना आम्ही भेटायला  गेलो होतो. १९९९ साली! त्यावेळी गारुडी नाग टोपलीत घेऊन फिरत असत.आम्ही बोलत होतो, तेव्हा खिडकीतून  सहज खाली पाहिलं तर, एका  गारुड्याने  टोपलीतून नाग काढला व बाहेर ठेवला. वेटोळे मारलेला नाग फणा काढून बसला होता. डॉ. मला म्हणाले या बसण्याला कुंडली मारून बसणं म्हणतात.*

  

*मी विचारलं यात काय वेगळं आहे?आणि कुंडली का म्हणतात? कुंडली म्हणजे कुंड असलेली! कुंड म्हणजे अग्नीचा स्रोत जिथं निर्मित असतो, ती जागा म्हणजे कुंड! आणि अशा अग्नीचे जी शीर वहन करते ती वाहिनी म्हणजे कुंडलिनी.*

*कुंड(अग्नी)+असलेली+वाहिनी म्हणजेच जिच्यातून अग्नी वहातो ती असलेली जागा म्हणजे कुंडलिनी.*

 

*आपण पहातो, सध्या कुंडलिनी जागृत कशी करायची यावर चर्चा होताना दिसते. कुठं असते याचं द्वार? मला म्हणाले विचार करा  व  सांगा. पण मला काही सांगता आलं नाही. तसं मला डॉक्टरांनी शुभं करोती म्हणा अस म्हणाले. ज्या ठिकाणी "कानी कुंडल "आलं तिथं थांबा म्हणाले.*

 

*कुंडल म्हणजेच जिथं ती घातली जातात. ती कानातील जागा! म्हणजे त्या कुंडाची नियंत्रित करणारी वाहिनी जिथं येते, तिथं कुंडल घालतात. म्हणजेच घरातील गॅस चे  बंद करायचं बटण म्हणजे कुंडल. बघा गॅसचा बर्नर म्हणजे कुंड झालं त्यात गॅस वाहून कोण नेतं तर वाहिनी आणि त्या नळीतील गॅसला म्हणजेच बर्नरमधली ज्योत कमीजास्त कोण करतं तर, ते बटण म्हणजेच कुंडल. म्हणजे मनुष्याच्या शरीरातील अग्नी नियंत्रण हे कानातील त्या पाळीतून होत जिथं कुंडलं अडकवली जातात.आता हे कसं होत हे पाहू.* 

 

*मूलं जन्माला येतं पण त्या देहातील अग्नी नियंत्रित करण्यासाठी पहिले कान टोचतात. शरीरातील दुसरा कुठला अवयव टोचतात का? तर नाही कारण प्रत्येकाच्या शरीरातील अग्नी नियंत्रण हे कानातील त्या ठिकाणाहून होते जिथं कुंडल घालतात म्हणजे पाळी!*  


*शाळेत शिक्षा करताना शिक्षक कान पकडतात. नाक, हात, डोकं पकडतात का? जसा कान पिळला, मुलगा लगेच आई गं करतो म्हणजे काय होतं तर शरीरातील ऊर्जा कान पिळल्यामुळे ढवळली जाते व वेदना होतात. जसा इकडे कान पिळला  की  गुदद्वाराशी वेदना होतात. तिथंच का होतात तर मूलाधार चक्राच तोंड तिथं येतं.  जेव्हा लहान बाळाचे कान टोचतात तेव्हाच त्याचे  मूलाधार जागृत होत व अग्नीची पहिली वेदना ती बाळाला जाणवते. थोडक्यात शरीरातील अग्निकुंड तेव्हा प्रज्वलित  होतं म्हणून पूर्वीचे पुरुषसुद्धा कानात कुंडल घालायचे.  लग्नात सुध्दा कान पिळतात. आवाज कुठं काढतात तर कानाखाली,पहिली कुठलीही कम्पनं कोण खेचतं तर कान. कानामागून आली आणि तिखट झाली."सर्व गोष्टींमध्ये कान हे संयुक्त आहे कारण एकच मनुष्याच्या शरीराची ऊर्जा ही कान नियंत्रित करते.माणसास चक्कर येते तर ती का? कानाशी संबंध येऊन ठेपतो. बायका पहा हातातल्या बांगड्या जेव्हढ्या प्रेमानं दाखवत नाहीत तेव्हढं कानातील दाखवतात कारण पूर्ण देहाचा कुंडलिनीचा नियंत्रण हा कान करत असतो सांगायला लागत नाही आपोआप कानाची स्तुती होतेच.* 

 

*आपण जुनी मंदिरं पहातो! बाहेर कुंड असतं!  का? हातपाय धुण्यासाठी नाही, तर त्या मंदिरातील ऊर्जेचा स्रोत त्या कुंडातून नियंत्रित होत असतो. हा स्रोत किती आहे हे त्या कुंडात मध्ये उभारलेल्या खांबावरून कळत  म्हणजेच तो खांब त्या कुंडात कुंडली मारून बसलेला असतो आणि त्याकरवी त्या मंदिरातील ऊर्जा नियंत्रित होत असते.कधी कोकणात गेलात तर हमखास पहा जे कुंड स्वच्छ ते मंदिर पण आतून स्वच्छच  असतं. मुद्दाम पहा. कर्णाची कवचकुंडल काढून घेतली तेव्हा त्याची ऊर्जा संपली.  कुंडलीत दोष आहे म्हणजे काय? तर पत्रिकेतील ग्रहांची ऊर्जा तेव्हढी चांगली नाही म्हणून दोष. अस्थीविसर्जन कुंडात, गणपती विसर्जन कुंडात, गौरी विसर्जन कुंडात, म्हणजेच ऊर्जेच्या स्रोताशी एकरूप होणं!* 

  

*माणसाच्या शरीरातील या कुंडास कुंडलिनी म्हणतात व  ती जागृत ठेवायची असेल तर कानावर लक्ष द्या.मला डॉ. म्हणाले आता नागाची कुंडल कुठं आहेत  पहा. नागाचे जे वेटोळे असते  ही त्याची ऊर्जेचा स्रोत असतात, पण हीच वेटोळी दुसर्याच्या घरात किंवा अंगावर बसलं तर त्या घराची किंवा माणसाची सर्व ऊर्जा संपवून टाकते आणि विष ओकते. पत्रिकेतील कालसर्प योग हे त्याचंच उदाहरण आहे. जिथे वेटोळे घातलेला नाग असतो तिथंच त्याच पूजन होते. वास्तविक पूजन नागाचे नाही तर त्यांच्यातील ऊर्जास्रोत म्हणजेच कुंडलीचे  होते. जे कालसर्प पूजन करून आले असतील त्यांनी पाहिलं असेल नाग हा वेटोळे मारलेला असतो.तो गारुडी  जेव्हा त्या वेटोळ्यावर हात मारतो तसा नाग फणा काढतो म्हणून शेपटावर पाय देऊ नये.* 

 

*प्रत्येक माणसांत कुंडलिनी जागृत असते म्हणून तो जिवंत आहे. फक्त ती जेव्हा नियंत्रणात येते तेव्हा मूलाधार जागृत होतो, पण या वर  सहजासहजी   नियंत्रण मिळत नाही.* 


*आपले कान दोन्ही हाताने झाका व डोळे बंद करा! स्वत:तील ऊर्जा कशी वाहाते हे तुमचे तुम्हीच अनुभवा. माणूस चुकतो देवासमोर जातो कान धरतो म्हणजेच स्वत:तील ऊर्जा नियंत्रित करतो.* 

*प्रत्येक कृतीला शास्त्रीय अर्थ आहे त्याची अंधश्रद्धा होऊ नये...*


ॐ श्री गुरुदेव दत्त 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller (171) Apradh !!

That very day Suresh phoned his old classmate , Dr. Sushma Mundara . She was surprised to talk to Suresh. She was unmarried and practising i...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!