An interesting linguistic article about Marathi!
Palindrome म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार , वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना जी शेवटाकडून सुरूवातीकडे वाचत गेलं तरी बदलत नाही.
इंग्रजीत Palindrome ची रेलचेल शेकड्याने आहे. पण मराठीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. लहानपणी तर दोन तीनच माहित होते.
१) चिमा काय कामाची
२) ती होडी जाडी होती.
३) रामाला भाला मारा.
पण अलिकडे कळलं की मराठीत Palindrome ला 'विलोमपद' असा शब्द आहे, आणि मराठीतली विलोमपदे देणारं चक्कं एक Android app (Marathi Palindromes नावाचं) सुद्धा आहे.
ही म्हणजे हाईट झाली, मराठीची इंग्रजीशी लय भारी फाईट झाली.
मराठी धावत नसली तरी एक एक 'पाऊल पडते पुढे' हे, तुम्ही काही म्हणा, पण अगदी Like करण्यासारखं आहेच.
आता ही मराठी विलोमपदे बघा
१) टेप आणा आपटे.
२) तो कवी ईशाला शाई विकतो.
३) भाऊ तळ्यात ऊभा.
४) शिवाजी लढेल जीवाशी.
५) सर जाताना प्या ना ताजा रस.
६) हाच तो चहा
वा वा, हे ताजे मराठी पॉलिनड्रोम्स, आय मीन, विलोमपदे वाचून मजा आली. आणखी काही विलोमपदे, आय मीन, पॉलिनड्रोम्स माहित आहेत का कोणाला?
Very Interesting
तं भूसुतामुक्तिमुदारहासं वन्दे यतो भव्यभवं दयाश्रीः ||१||
श्रीयादवं भव्यभतोयदेवं संहारदामुक्तिमुतासुभूतं ||२||
या श्लोकामध्ये पहिल्या चरणात श्रीरामाची स्तुती आहे आणि दुसर्या चरणात श्रीकृष्णाची . या श्लोकाचे वैशिष्ठ्य असे की यातले दुसरे चरण पहिल्या चरणाच्या उलट्या क्रमात आहे .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें