*आमच्या आया। तुमच्या आया*
आश्चर्य वाटते मला माझ्या
आईसारख्या सत्तरीतल्या बायका
इतक्या कशा छान जगल्या....
कर्तव्य संसाराच्या जंजाळातही
किती या संयमी वागल्या....
बहुतेक सगळ्या जणी
होत्या सुगरण,
कुणाला काय आवडते
कशा ठेवायच्या आठवण....
सर्वांना तृप्त करण्यातच
रमल्या अन्नपूर्णा..
गोठ्यातील गाय दारातले कुत्रे
सर्वांबद्दल यांना करुणा...
स्विगी झोमॅटो यांच्या हातात
काहीच नव्हते..
अचानक येणारे दीर जावा
मस्त जेवून जात होते...
माणसेच नाहीतर देव-देवता
यायची पाहुणी...
गणपती भाऊ आणि गौराई
यांच्या माहेरवाशिणी.....
गौरींच्या स्वागताची
आठ आठ दिवस तयारी..
कितीही दमल्या तरी
रांगोळी हवीच दारी...
लाडू करंज्या मिठाया
आणि पाच पक्वान्ने...
हळदीकुंकवाला शालू नेसून
स्वागत हसतमुखाने...
उपासतापास व्रतवैकल्ये करूनही
नव्हत्या अंधश्रद्धाळू..
कठोर निर्णयही घ्यायच्या
पण आतून कनवाळू...
यांची सारी धडपड
घरासाठी मुलांसाठी...
थकलेल्या दिसल्याच नाही
जरी उलटली साठी..
छोटे छोटे आनंद होते
अपेक्षा नव्हत्याच फारशा..
स्त्री-स्वातंत्र्य स्पेस हवी
माहितीच नव्हत्या दिशा..
पन्नाशी पर्यंत त्यांच्या
एखादा वृद्ध असायचा घरात...
पण कोणी चौकशीला
दिसला नाही वृद्धाश्रमाच्या दारात..
रिटायर झाल्यावरही यांचा
मजेत जातो वेळ...
नातवंडांबरोबर कुठलाही
खेळतात खेळ...
गरज असेल तर आकंठ बुडतील
चटकन होतील अलिप्त...
परदेश किंवा पंढरपुर वारी
दोन्हीकडे रमतात मस्त...
पार्ट्या करतात ट्रिपा काढतात
तरी जगण्याला एक आहे शिस्त...
म्हणूनच आमच्या पेक्षा यांचे आयुष्य
आहे निवांत आणि स्वस्थ ..
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें