कविता
---------------------------------------
*दोन शब्द जगण्याविषयी* 🕊
*कुणाला* आपला कंटाळा येईल
इतकं जवळ जाऊ नये,
*चांगुलपणाचे* ओझे वाटेल
इतके चांगले वागू नये,
*कुणाला* गरज नसेल आपली,तर
तिथे रेंगाळत राहू नये,
*नशीबाने* जुळलेली नाती जपावी,
पण स्वतःहून तोडू नये,
*गोड बोलणे गोड वागणे*,
कुणास अवघड वाटू नये,
*जवळपणाचे* बंधन होईल
इतके जवळचे होऊच नये,
*सहजच* विसरून जावे सारे
सल मनात जपू नये,
*नकोसे* होऊ आपण
इतके आयुष्य जगूच नये,
*हवे हवेसे* असतो तेव्हाच
पटकन दूर निघून जावे,
*आपले नाव* दुसऱ्याच्या ओठी
राहील इतकेच करून जावे.
*कारण*
जीवनाच्या वाटेवर
*साथ* देतात,
*मात* करतात,
*हात* देतात,
*घात* करतात,
*ती ही असतात..... माणसं !*
*संधी* देतात,
*संधी* साधतात,
*आदर* करतात,
*भाव* खातात
*ती ही असतात..... माणसं !*
*वेड* लावतात,
*वेडं* ही करतात,
*घास* भरवतात,
*घास* हिरावतात
*ती ही असतात..... माणसं !*
*पाठीशी* असतात,
*पाठ* फिरवतात,
*वाट* दाखवतात ,
*वाट* लावतात
*ती ही असतात..... माणसं !*
*शब्द* पाळतात,
*शब्द* फिरवतात,
*गळ्यात* पडतात,
*गळा* कापतात
*ती ही असतात ...... माणसं !*
*दूर* राहतात,
*तरी* जवळचीच वाटतात,
*जवळ* राहून देखील,
*परक्या* सारखी वागतात
*ती ही असतात ...... माणसं !*
*नाना* प्रकारची अशी
*नाना माणसं!*
ओळखायची कशी
*सारी असतात आपलीच माणसं* !
*एक आशयपुर्ण कविता*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें